Tuesday, September 30, 2025

पनवेल -उरणचे बाहुबली रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी सन्मानाने राष्ट्रवादीत...

 


राष्ट्रवादी काँग्रेसला पनवेल उरण मतदारसंघात आता अच्छे दिन येणार

पनवेल/खलील सुर्वे :- पनवेल,उरण विधानसभा मतदारसंघात सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात बाहुबली ठरलेले रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी यांनी सन्मानाने मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि हजारो समर्थक उपस्थित होते.

        या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, माजी आमदार मुश्ताक अंतुले, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सन्मानाने स्वागत केले. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत नरिमन पॉईंट येथे संपन्न झाला. 

      पनवेल उरणसह रायगड जिल्ह्याचा विकास हा संकल्प नजरेसमोर ठेवून रुपेशदादा पाटील आणि तेजसभाई डाकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली . जनतेची कामे करण्यासाठी रुपेशदादा आणि तेजसभाई यांनी योग्य निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. रुपेश दादा पाटील आणि तेजस भाई डाकी हे पनवेल ,उरण मधील बाहुबली आहेत राजकीय, सामाजिक क्षेत्रात या दोघांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच होणार आहे. पनवेल उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अत्यंत कमी आहे...मात्र आता या दोघा बाहुबलींच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसला पनवेल उरणमध्ये अच्छे दिन येणार आहेत. रुपेश दादा आणि तेजसभाई यांच्या एकत्रित येण्याने पनवेल उरण मधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सद्यस्थितीत पनवेल उरणमध्ये जनतेच्या बाजूने आक्रमकतेने बोलण्याची गरज या दोघांमुळे पूर्ण होणार आहे. 

              हा पक्षप्रवेश जरी मुंबईत झाला असला तरी या पक्ष प्रवेशाचे राजकीय पडसाद पनवेल, उरणमध्ये उमटत आहेत. प्रस्थापितांच्या राजकारणाला यामुळे हादरा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

फुड माॅल मधे काम करणाऱ्या महिलांसाठी महिला सक्षमीकरण विषय सत्र आयोजित केले

 

खालापुर/सुधीर देशमुख - रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे सर यांच्या निर्देशनानुसार खोपोली–खालापूर फूड मॉल येथे कार्यरत असलेल्या महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण विषयक सत्र आयोजित करण्यात आले.

या सत्रामध्ये महिलांना महत्वाचे काही मुद्दे सांगण्यात आले हनी ट्रॅप, फेसबुक स्कॅम, शिक्षण, सायबर क्राईम, ऑनलाईन होणारी फसवणूक, सोशल मीडिया चा वापर कमीत कमी करणे. डायल ११२ वुमन हेल्प लाईन, सायबर सुरक्षा हेल्प लाइन १०९ या सर्व विविध उपाययोजना कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. खोपोलीतील तळागाळातील महिलांना अशा मार्गदर्शनामुळे जागरूकता व आत्मनिर्भरतेचा नवा दृष्टिकोन मिळाला.

कार्यक्रमाला खोपोली पोलीस ठाण्याचे अमलदार महिला पोलिस हवलदार संजना चव्हाण व पोलीस कॉस्टेबल सुषमा खाडे तसेच खोपोली पोलीस ठाणे महिला दक्षता समितीच्या सदस्या इशिका शेलार व वर्षा मोरे उपस्थित होत्या.या उपक्रमासाठी सर्व महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फुड मॉलचे मुख्य कार्यकारी मोहम्मद रमीझ रजा व अभिजीत लक्ष्मण राऊत यांनी खोपोली पोलीस ठाण्याचे विशेष आभार मानले व यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लागलेले सर्व एसी अनाधिकृत

 

नागरिकांच्या कराच्या पैशातून एसीचे बिल भरू नका सर्व एसी काढा अथवा आंदोलन करणार : आम आदमी पार्टी

खोपोली /खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनाधिकृत आहेत. तसेच एसी लावण्याकरिता नगर परिषदेने प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. तसेच सदर एसी लावण्याकरिता नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागितले असता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही असे अजब उत्तर नगर परिषदेने माहितीच्या अधिकाराखाली आम आदमी पार्टीला दिलेले आहे.

खोपोली शहरात प्रचंड समस्या असताना नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरण्यात येत असून शहरात नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शहरात विविध ठिकाणी विजेचे खांबांची आवश्यकता आहे, रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे, गटारे नाहीत साफसफाई चे तीन तेरा वाजलेले आहेत. या सर्व सुविधा पुरवण्याकरिता आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे नगरपरिषदेमार्फत नेहमी उत्तर दिले जात आहे. नगर परिषदेमार्फत निधीचा अपव्यय केला जात असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचे सोडून नगर अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशाने आरामात एसी  मध्ये बसून मज्जा करत आहेत. 

नगरपरिषद इमारतीतील ब वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सुद्धा नगर परिषदेने एसी लावलेले आहेत व सदर एसी लावण्याकरिता नगर परिषदेने कोणतेही खर्च केलेले नाही असे उत्तर नगर परिषदेने माहितीचे अधिकारातील खाली दिलेले आहे. नागरिकांच्या कराचे पैसे वाया घालवू नये व एसीचे बिल नागरिकांच्या करातून भरू नये अशी मागणी आम आदी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण यांनी केली आहे. 

नगरपरिषदेने इमारतीतील सर्व एसी काढावे तथा एसीचे बिल अधिकाऱ्यांच्या पगारातून घेण्यात यावे अन्यथा आम आदी पार्टी तर्फे नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी दिला आहे.

Monday, September 29, 2025

कर्जत मध्ये सुसज्ज BPHU युनिटचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न....

 

कर्जत/नरेश जाधव :- आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक महत्वाचे पाऊल उचलत उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (BPHU) उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारलेल्या या युनिटचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा पुरवणे, सार्वजनिक आरोग्यासाठी उपाययोजना करणे, प्रयोगशाळा बळकट करणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उत्तम उपचार उपलब्ध करून देणे हे या युनिटचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, “कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे युनिट महत्वाची भूमिका बजावणार आहे. अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर्जेदार सेवा दिली जाणार असून, डॉक्टरांनी आपल्या अडचणी वेळेत प्रशासनासमोर मांडल्यास त्या दूर करून अधिक प्रभावी सेवा देता येईल.” त्यांनी ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ सारख्या उपक्रमांचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्यसेवा हा महत्त्वाचा आधार असल्याचेही सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे सरचिटणीस दीपक बेहेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, शासकीय रुग्णालय कशेळे येथील डॉ. बालाजी फाळके, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, रायगड मेडिकल कॉलेजचे व्यवस्थापक कुशाग्र पटेल यांच्यासह आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या युनिटच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवीन बळ मिळणार आहे.


शिवसेनेत नवी ताकद, नवा जोश!

 


कर्जत /नरेश जाधव :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बॉबी शेठ वाघमारे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार श्री. महेंद्र थोरवे साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले आणि

"निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात आपण एकत्र काम करून शिवसेना आणखी बळकट करू," असा शब्द दिला. 

या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲड संकेत भासे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसादजी थोरवे ,कर्जत शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे, कर्जत उपशहर प्रमुख श्री दिनेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते



खोपोली पोलिसांची काटरंग भागातील बंगल्यावर धाड

 


विविध राजकीय पक्षांतील १७ जणांना ताब्यात, ४.३० लाखांची रोकड जप्त

 पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या पथकाची पहाटे कारवाई

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली पोलिसांनी काटरंग भागात एका बंगल्यावर गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत विविध राजकीय पक्षांशी संबंधित १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जुगारासाठी वापरलेली तब्बल ४ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 गुप्त माहितीवरून धाड :- पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तुषार अहिर यांच्या मालकीच्या बंगल्यावर छापा टाकला. बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळ सुरू असल्याचे उघड झाले.

 अटक केलेले आरोपी :- या कारवाईत अजय सोनवणे, संतोष सूर्यवंशी, भालचंद्र कदम, दत्ता बावधने, उमेश ओव्हाळ, रुपेश वाघमारे, महेश कर्णूक, प्रशांत साळुंखे, स्वप्नील चौधरी, प्रदीप कर्णूक, सुजात डेबनाथ, अमोल जाधव, अविनाश कदम, नबी शेख, राजेश पारठे आणि अल्पेश थुरपुडे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपींचा राजकीय व सामाजिक प्रभाव लक्षात घेता परिसरात या कारवाईची मोठ्या प्रमाणावर चर्चा. सुरू आहे.



Sunday, September 28, 2025

सर्कल सेक्रेटरी, जयराम जाधव तीन दिवसाच्या नागपूर क्षेत्रीय दौर्‍यावर..

 


नागपुर / जावेद अहमद :- ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र परिमंडळ सचिव मा.जयराम जाधव हे बुधवार 1 ऑक्टोबर पासून नागपूर क्षेत्राच्या दौर्‍यावर आहेत. सदर दौऱ्यात सकाळी 11 वा.यवतमाळ हेड पोस्ट ऑफिस मध्ये नामफलक अनावरण करणार आहेत तसेच विभागीय अधिकाऱ्यां सोबत मीटिंग आयोजित करण्यात आली आहे, त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतील. 

दुपारी 1.30 वा.वर्धा टपाल विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट असून विभागीय अधिकारी, सभासद आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी ६.३० वा.नागपूर दीक्षा भूमिवर होणार्‍या ६९ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करून या निमित्ताने अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सत्कार सोहोळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मेडिकल कॅम्प च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती दाखवतील अशी माहिती नागपूर क्षेत्राचे परिमंडळ सचिव मा.गौतम मेश्राम यांनी दिली आहे.

नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशनचा उपक्रम..

 

खालापूर नगर पंचायतच्या मा. नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते शुभारंभ

खालापुर/सुधीर देशमुख :- सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदीकिनारी नदी पूजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.सुरुवातीस सामूहिक नदी पूजन व आरती नंतर सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचे औक्षण करून तसेच सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये प्रिती सावंत या विजेत्या ठरल्या.विजेत्या महिलेस सहज सेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन केदार व खोपोली नगरपालिकेच्या मा.नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशन या नवीन महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा शुभारंभ खालापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्षा निलम विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी कार्य करण्याच्या उपक्रमाला सुरूवात करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार,महिला अध्यक्षा निलम पाटील,सह सचिव नम्रता परदेशी,युवा अध्यक्षा सागरिका जांभळे आणि मार्गदर्शिका सीमा त्रिपाठी ,वेदा साखरे,मुस्कान सय्यद,अंजली शर्मा,संगिता शुक्ला,रेखा भालेराव,मीनल गायकर, आश्विनी कुलकर्णी यांनी अथक सक्रिय मेहनत घेतली.

या उपक्रमातील लकी ड्रॉ साठी पैठणी साडी प्रायोजक म्हणून द्वारकाधीश साडी सेंटर, शीळफाटा यांचे सहकार्य लाभले असून, वाढदिवस केकसाठी द केक शॉप, खोपोली (संचालिका शिल्पा भाविक शेडगे) यांचे योगदान आहे.

दर महिन्याला नदी पूजन व आरती सोबत खालापूर तालुक्यातील महिलांचा सामूहिक वाढदिवस या माध्यमातून साजरा होणार असल्याने या अभिनव उपक्रमात स्थानिक पातळीवर महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा तसेच सहज महिला फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी भरीव कार्य व्हावे अशा शुभेच्छा शिवानी जंगम यांनी दिल्या आहेत.

Saturday, September 27, 2025

विश्व आयुर्वेदिक दिनानिमित्त श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर येथे आयुर्वेद दिन साजरा!

 

भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप,रोपण

पाली/प्रतिनिधी :- राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष भारत मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर व भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप व रोपण करण्यात आले.

 दहाव्या विश्व आयुर्वेद दिनानिमित्त दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम 25 सप्टेंबर 2025 रोजी उद्धर रामेश्वर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात आयुर्वेद शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे वाटप व रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यतः चार हजार बेल व एक हजार अर्जुनाच्या औषधी वनस्पतींचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दिगंबर मोकाट यांच्या संकल्पनेतून एक गाव एक औषधी वृक्ष यानुसार उद्धर- रामेश्वर येथे बेल व अर्जुन या वनस्पतींची लागवड करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी उद्धर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजन श्री रामेश्वर महादेव देवस्थान व भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांचे वतीने करण्यात आले होते.

 श्री रामेश्वर महादेव देवस्थानच्या हद्दीत शंभर एकराची देवराई आहे. हे उद्धर गावचे भूषण आहे. या देवराईत सीता अशोक, केवडा, हादगा, अर्जुन,बेल व आंबा इत्यादी प्रकारच्या नैसर्गिकपणे वाढलेल्या वनौषधी आहेत. परंतु बऱ्याच प्रकारच्या वनौषधींची नागरिकांना माहिती नाही. या करिता देवस्थानच्या वतीने पुढाकार घेऊन काही वनौषधींचा परिचय व औषधी वनस्पतींची पुढील कालावधीत मागणी पाहता लागवड करावी या उद्देशाने देवस्थानने ४००० प् बेलाची व १००० अर्जुनाच्या वृक्षांची मागणी विद्यापीठाकडे केली होती.

 या कार्यक्रमात डॉ. दिगंबर मोकाट सरांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत विविध वनौषधींची माहिती प्रत्यक्ष जंगलात जाऊन करून दिली. तसेच या औषधांचा उपयोग आपण व्यवहारात कसा करू शकतो याविषयी देखील मार्गदर्शन केले. आपल्याकडील असलेल्या शेतीमध्ये विविध कृषीवानिकी पद्धतीचा अवलंब करून वनवृक्ष लागवडीसाठी एक महत्त्वाची मोहीम समजून त्यासाठी प्रचंड काम होणे आवश्यक आहे. उपवानांची निर्मिती करणे आवश्यक आहे. भविष्यात येऊ घातलेली घातक संकटे कमी करण्यास यामुळे निश्चित मदत होणार आहे. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धना बरोबरच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा. हा मूळ हेतू होता .

  या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या पाली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीमती हेमलता शेरेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व थोडक्यात सांगितले. या वनऔषधीमुळे आपले गाव जगात ओळखले जाईल. तसेच यामुळे आपल्याला रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे.असे म्हटले.

 या कार्यक्रमासाठी डॉ. दिगंबर मोकाट औषधी वनस्पती क्षेत्रीय सह सुविधा केंद्र पश्चिम विभाग ( राजस्थान गुजरात महाराष्ट्र व गोवा ) तसेच इर्जिक फाउंडेशन चे जनरल मॅनेजर मा.श्री. नितीनजी पाटील, पाली सुधागड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मा.श्रीमती हेमलता शेरेकर, भारतीय किसान संघ रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री प्रमोद लांगी तसेच भा. कि. संघ रायगड जिल्हा महिला प्रमुख रसिका फाटक उपस्थित होत्या.

रायगडच्या पवित्र भूमीवर लेडीज बार व अवैध धंद्यांचा धुमाकूळ

 


खालापूर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत लेडीज बार सुरू

अवैध धंदे बंद झाले नाही तर आमरण उपोषण - पॅंथर आर्मीचा इशारा

 खालापुर/सुधीर देशमुख :-छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमीत आज अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे, अशी गंभीर परिस्थिती समोर आली आहे.

     खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि लेडीज बार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः खालापूर तालुक्याच्या हद्दीत असलेला ‘समुद्र लेडीज बार’ हा थेट महामार्गालगत सुरू असून, रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता कायम असते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बारमध्ये महिलांशी संबंधित चुकीचे व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

     या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करत स्वराज्य संविधान रक्षक सेना (पॅंथर आर्मी) यांनी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या पवित्र रायगड जिल्ह्यातील युवकांच्या भवितव्याशी खेळणारे हे धंदे थांबणार नसल्यास संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल वसंत नेहुल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

        संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल.”

      यावेळी संघटनेचे पदाधिकारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष पँथर आशिष भाई खंडागळे, रायगड जिल्हा सचिव पँथर आदित्य भाई कदम, तालुका उपाध्यक्ष भूषण भाई गायकवाड आणि तालुका संघटक मंगेश भाई शेंडे उपस्थित होते.

Friday, September 26, 2025

मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेला कर्जत नगरपालिकेकडून सुरुवात

 

आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्याला यश

कर्जत/सुधीर देशमुख :-नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अखेर अमलात येत असून कर्जत नगरपरिषदेत मालमत्ता करावरील शास्ती माफी (अभय योजना) लागू करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना कर्जत नगरपालिकेत प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरपरिषदेकडून घरपट्टी (मालमत्ता कर) आकारणी नियमित केली जाते. मात्र एखाद्या वर्षी किंवा अनेक वर्षे कर न भरल्यास थकबाकीवर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो. कोरोनाच्या काळातील आर्थिक संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि बिकट परिस्थितीमुळे अनेक नागरिक कर भरू शकले नाहीत, परिणामी थकबाकी आणि त्यावरील शास्ती मोठ्या प्रमाणात वाढली. राज्य शासनाने १९ मे २०२५ रोजी परिपत्रक काढून मालमत्ता करावरील दंड माफ करण्याच्या सूचनांसह अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कर्जत नगरपरिषदेत या योजनेची अंमलबजावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. या विलंबाबाबत संकेत भासे यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत पाठपुरावा केला.

शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा विषय वरिष्ठ पातळीवर नेण्यात आला आणि कर्जत नगरपरिषद प्रशासनाने योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नगरपरिषद कर विभागात अर्ज स्वीकारले जाणार असून १९ मे २०२५ पर्यंतच्या मालमत्ता करावरील थकबाकीवरील शास्ती पूर्णपणे माफ केली जाणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, वेळेत अर्ज करून थकबाकी निकाली काढावी, असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे व माजी नगरसेवक संकेत भासे यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर येथे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

 


स्थानिक मान्यवर, पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती

खालापूर / सुधीर माने:- खालापूर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सोहळा गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह शाळेचे माजी विद्यार्थी, पालकवर्ग आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती :- या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गलांडे (यू. एस. विभाग प्रमुख, रायगड ठाणे मुंबई पालघर संपर्क प्रमुख) उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून युवा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शेखर हरीभाऊ पिंगळे हे उपस्थित राहिले.

सोहळ्यास मुख्याध्यापक एस. आर. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती व सल्लागार समिती पदाधिकारी, नगरपंचायत समिती सदस्या मंदा लोते, राष्ट्रवादी कार्यकर्त्या संजीवनी अनिल पिंगळे, कार्यकर्ते दशरथ लोते, पुंडलिक लोते, शरद लोते, सुरेखा जगताप, निशा पिंगळे, महेश पिंगळे, प्रमिला पिंगळे आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला.

तसेच द्रेवेंद्र पिंगळे, मंगेश पिंगळे, हरिश्चंद्र सासे, सुरेखा सासे, विनोद बैलमारे, विजया बैलमारे, ॲड. रमेश जनार्दन पाटील, सरपंच अमित पाटील, सागर पांडुरंग पाटील, संजय बळीराम पाटील, बळीराम गोविंद पाटील यांच्यासह घोडिवली व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला मंडळ व बचत गटाचा सहभाग :- या सोहळ्यास महिला बचत गट व महिला मंडळ घोडिवली यांचा मोठा सहभाग होता. मंदा पालडे, ज्योत्स्ना पाटील, गुलाब पाटील, संजीवनी पाटील, ॲंड. कल्याणी पाटील, चौधरी मंजुळा, बनुबाई लोखंडे, किर्ती चौधरी, सुशिला जगताप या कार्यकर्त्या विशेषत्वाने उपस्थित होत्या.

 निमंत्रक व आयोजक :- या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रक मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाळा व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, माता-पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मंडळ घोडिवली हे होते.

 भूमिदाते व गुरुवर्यांचा सन्मान :- या सोहळ्यात शाळेसाठी जागा उपलब्ध करून देणारे अशोक जगताप (मामा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आदरणीय गुरुवर्य पी. डी. मंडावळे यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली.

 उत्साहपूर्ण वातावरण :- शाळेच्या प्रवेशद्वाराच्या भूमिपूजनाने विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. माजी विद्यार्थी आणि स्थानिकांचा सहभाग पाहता हा सोहळा खरोखरच गावाचा सामुदायिक सोहळा ठरला.

Thursday, September 25, 2025

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - जावेद अहेमद

 

 शासनाने तात्काळ मदत करण्याची ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

देगलूर/ प्रतिनिधी:- मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नागरिकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक अनेक भागात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्‍याचे पिकाचे नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे गावचे हजारो हेक्टर जमीन पुरातच बुडुन गेली आहे. या आसमानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. गुरे ढोरे व माणसाचा देखील यामध्ये जीव गेले आहेत.जमिनी नापीक झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाईची आवश्यकता आहे.

        शासनाने केलेली आर्थिक मदत ही तुटपुंजी स्वरूपाची आहे. नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. शेतकरी बांधवावर आस्मांनी संकट आले आहे. त्यामुळे शेतकर्‍याना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहमद यानी इमेल द्वारे मुख्यमंञी साहेबांकडे केली आहे. 

Wednesday, September 24, 2025

आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांची वावोशी गावाला भेट

 


नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

  खालापुर/सुधीर देशमुख :- खालापूर तालुक्यातील वावोशी गावाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, ४० वर्षे मुंबई शेअरबाजार (BSE), सेबी, NSDL सारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळणारे आणि ३५ पुस्तके, ८७ आवृत्त्या, तब्बल ४९०० व्याख्यानांचा विक्रम करणारे श्री. चंद्रशेखर टिळक यांनी काल (दि. २३ सप्टेंबर २०२५) वावोशीतील नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. 

 नरसिंह राव, अटलजी व डॉ. मनमोहनसिंग यांसारख्या तीन माजी पंतप्रधानांच्या विशेष निमंत्रणावरून धोरणात्मक चर्चेत सहभागी झालेले, तसेच हर्षद मेहता व केतन पारेख यांसारख्या गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावलेले टिळक यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे.

 “आमचे टिळक घराण्याचा आज सार्थ अभिमान वाटतो, मी भरून पावलो!” अशा शब्दांत नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांनी आपला भावनिक आनंद व्यक्त केला.

वावोशीसारख्या छोट्याशा गावातून जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ घडले, हीच खरी गावाच्या संस्कृतीची व परंपरेची जमेची बाजू असल्याचे ग्रामस्थांनीही गौरवोद्गार काढले.

निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांचा वडवळ येथे किशोरवयीन मुलींसाठी MHM किटचे वाटप व जागरूकता सत्राचे आयोजन



खालापुर/सुधीर देशमुख :-निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त संयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त किशोरवयीन मुलींसाठी MHM (Menstrual Hygiene Management) किट वितरण व जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमात एकूण ६४ मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व तसेच दैनंदिन आहारातील पोषणमूल्य याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. मार्गदर्शक म्हणून निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या प्रोग्राम ऑफिसर सौ. दीप्ती मथुरे उपस्थित होत्या. त्यांनी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत MHM विषयाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलींमध्ये जागरूकता वाढली व आत्मविश्वास निर्माण झाला.

 या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ. वृशाली देशमुख, सौ. करुणा बोम्बे व सौ. हर्षाली काळे यांच्या हस्ते मुलींना MHM किटचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास निरामय हेल्थ फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री. मंगेश भंडारे, तसेच हेल्थ वर्कर्स सौ. दर्शना मरागजे, सौ. पौर्णिमा गायकवाड व सौ. प्रतीक्षा सावंत उपस्थित होते.

Tuesday, September 23, 2025

पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची मोठी कामगिरी


चेन्नईतून लाखो रुपयांचे मौल्यवान विदेशी पक्षी हस्तगत ; दोन चोरटे अटकेत

खोपोली/ खलील सुर्वे :- कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरी गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत पोलिसांना यश आले आहे. चेन्नई, तामिळनाडूतून हे पक्षी हस्तगत करतांना दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. कर्जत पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 गुन्हा आणि आरोपी :- १७ जुलै २०२५ रोजी रात्री १.१९ वाजता दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक १८४/२०२५ अंतर्गत आरोपींनी ७ आफ्रिकन ग्रे पॅरट, १ ब्ल्यू-गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव असे एकूण नऊ दुर्मिळ विदेशी पक्षी चोरीस नेले होते. या पक्ष्यांची बाजारातील किंमत तब्बल ११ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.

- आफ्रिकन ग्रे पॅरट (प्रत्येकी ७५ हजार) – बुद्धिमत्ता पाच वर्षांच्या मुलाइतकी ; संवादक्षम व ४० वर्षांचे आयुष्य

- ब्ल्यू-गोल्ड मकाव (२ लाख) – उत्तम शब्दसंग्रह व ६०-७० वर्षांचे आयुष्य

- स्कार्लेट मकाव (४ लाख) – आकर्षक, बोलक्या स्वभावाचे, संग्रहालयातही मागणी

अशा मौल्यवान पक्ष्यांची चोरी केल्याप्रकरणी अनिल रामचंद्र जाधव (१९, वावंढळ, खालापूर) व राजेशसिंग माही ऊर्फ समशेरसिंग (४३, महिपालपूर, दिल्ली) या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 तपासाची शृंखलाबद्ध मोहीम :- गुन्ह्याच्या सुरुवातीला घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, तपास पथकाने घटनास्थळाच्या आसपासच्या असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपींची छायाचित्रे हाती आली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने ओळख पटवून, आरोपी अनिल जाधवला २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. अखेर चेन्नईहून चोरी गेलेले सर्व पक्षी हस्तगत करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई पथकाचे नेतृत्व कर्जत पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले. या पथकात सहा. पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, पो.उ.नि. किरण नवले, सुशांत वरक, समीर भोईर, स्वप्नील येरुणकर, प्रविण भालेराव, केशव नागरगोजे, विठ्ठल घावस या पोलिसांचा समावेश होता.

जनतेस आवाहन :- कर्जत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मौल्यवान वस्तू, प्राणी किंवा पक्ष्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच हॉटेल, फार्महाऊस किंवा व्यावसायिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे डीव्हीआर (DVR) सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत आहेत का, याची वेळोवेळी खात्री करणे ही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

Sunday, September 21, 2025

भारत भूषण पुरस्कारप्राप्त तटकरे दाम्पत्याचा कर्जत येथे भव्य नागरी सत्कार

पोलिस मैदानावर सोहळा ; पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

 आगामी निवडणुकांची चाहूल ; डॉं. सुनिल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार

सुधाकर घारे यांचे आवाहन : नगरपालिका असो वा जिल्हा परिषद, राष्ट्रवादी नंबर वन राहील

प्रफुल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंढे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक घटकांचा मोठा सहभाग 

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

कर्जत / मानसी कांबळे :- रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकमत समुहाचा 'भारत भूषण' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल दत्तात्रेय तटकरे व सौ. वरदा तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आज कर्जत येथे पार पडला. पोलिस मैदानावर झालेला हा भव्यदिव्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत चांगलाच रंगला.

नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर आली असतानाच हा कार्यक्रम झाल्याने कर्जत-खोपोली परिसरात चांगलीच राजकीय रंगत आली आहे. विशेष म्हणजे, खोपोलीच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे डॉं. सुनिल गोटीराम पाटील यांनी शिवसेना शिंदे गट सोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या राजकीय समीकरणांत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील यांच्यासह भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजपा खोपोली शहर अध्यक्ष राहुल सखाराम जाधव, शिवसेना अल्पसंख्यांक रायगड जिल्हा महिला अध्यक्षा जैबूनिसा शेख, अनिता जितेंद्र शहा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या सोहळ्यात रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, कर्जत नगर पालिका, खोपोली नगर पालिका, पंचायत समिती वा जिल्हा परिषद कोणतीही निवडणूक असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील याची खात्री बाळगा.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सचिव भरतभाई भगत, प्रदेश सरचिटणीस दत्तात्रेय मसुरकर, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उमा मुंढे, युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वैशाली जाधव, माजी नगरसेवक रमेश जाधव, युवा नेते अल्पेश थरकुडे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमात कर्जत, खोपोली, माथेरान नगर परिषद, खालापूर नगर पंचायत तसेच ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, सभापती, उपसभापती, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीतील कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला बहुआयामी रंगत आली.


या सोहळ्यात तटकरे दाम्पत्यांचा भव्य नागरी सत्कार होताच, परंतु त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुणूकही या कार्यक्रमातून दिसून आली.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिस ठाणे येथे बैठक संपन्न

 

पोलिस प्रशासनाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष यांना दिल्या सूचना

कर्जत/नरेश जाधव :- आगामी होत असलेल्या नवरात्र उत्सव - 2025 अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे हद्दतील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष यांची दिनांक 19/09/2025 रोजी 17.40 ते 18.30 या दरम्यान मिटिंग घेण्यात आली सदर मिटिंग करीता 45 ते 50 मंडळ आध्यक्ष व सदस्य उपस्थित राहिले होते. त्यांना सणाचे अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

1) सर्व मंडळ आध्यक्ष यांनी "आपले सरकार " या online side वरून उत्सव साजरा करण्या बाबत परवागी अर्ज सादर करावा.

2) कोणीही मंडळ जबरदस्ती ने वर्गणी गोळा करणार नाही.

3) देवींची मूर्ती व मंडपाचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंडळाचे स्वयंसेवक 24 तास उपलब्ध करून ठेवणे 

4) मंडपामध्ये करण्यात येणारे देखावे या मुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अथवा कोणत्याही विशिष्ठ समाजाच्या भावना दुःखावणार नाही असे फलक, पताके लावणार नाहीत.

5) हजर मंडळाचे आध्यक्ष यांना ध्वनी प्रदूषणाबाबत सूचना देण्यात आल्या.

6) मंडळ परिसरात पुरेसा प्रकाश असावा तसेच त्या ठिकाणी करण्यात येणारी रोशनायी / light याची mseb मार्फत रीतसर परवाणगी घेण्यात यावी.

7) गरबा ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक नेमण्यात यावे व त्यांना ओळखपत्र देण्यात यावे.

8) गरबा खेळण्या करीता धातूच्या दांडियाचा वापर करू नये.

9) गरबा खेळण्या करीता स्थानिक महिला पुरुष यांचा समावेश असावा बाहेर व्यक्तींना प्रवेश देऊ नये.

10) गरबा दांडिया खेळण्या करीता कोणी दारू अथवा इतर नशा केली असल्याची दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाणेत माहिती कळवावी.

11) गरबा दांडिया ठिकाणी शक्य असल्यास cctv कॅमेरे बसाविण्यात यावे.

12) ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे आश्या ठिकाणी पर्यायी मार्ग नेमावा तसेच गरबा खेळण्या करीता आलेले लोक यांचे वाहन पार्किंग करीता पार्किंगची सुविधा करावा जेणे करून वाहतूक कोंडी होणार नाही.

13) गरबा दांडिया ठिकाणी आक्षेपार्य देखावे / पोस्टर /फलक /अथवा गाणी लावणार नाही याची दक्षता मंडळ आध्यक्ष घेतील.

14) गरबा ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण महिला वर्ग उपस्थित राहणार असल्या कारनाने त्या ठिकाणी महिलांची छेड छाड होणार नाही.

Saturday, September 20, 2025

होनाड येथे राष्ट्रीय पोषण अभियान 2025 उत्साहात साजरा



खालापूर/सुधीर देशमुख : -
ग्रुपग्रामपंचायत होनाड अंतर्गत अंगणवाडी केंद्र होनाड येथे राष्ट्रीय पोषण अभियान हा कार्यक्रम घेण्यात‌ आला. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या. टेभेंवाडी, होनाड, आडोशी, चिंचवली गोहे, आतकरगाव ,ह्या गावांचा कार्यक्रमा मध्ये समावेश होता. गावातील महिला, किशोर वहीन मुली, लहानमुले, तसेच गरोदर मातांचा ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती होती. पोषण आहारामध्ये विविध पोषक आहार व गरोदर मातांना देण्यात येणारे आहार व त्यांच्या लहान मुलांचे संगोपन या विषयी माहिती अंगणवाडी शिक्षिका यांनी दिली. 

कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका सौं अर्चना देशमुख, सौं आरती देशमुख, सौं वनिता देशमुख, सौं कल्याणी देशमुख, सौं गीता पाटील आणि त्याच बरोबर मदतनीस तसेच गावातील महिला यांची मोलाची साथ मिळाली म्हणून हा कार्यक्रम खूप छान झाला.

कारगाव ग्रामस्थांचा पुढील पिढीसाठी कंपनी व खालापूर प्रशासनाविरुद्ध अस्तित्वाची लढाई

 


खालापूर/सुधीर देशमुख :- कारगावचे ग्रामस्थ हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त असून त्यांना शासनानी दिलेल्या जागेतील वाहिवाटीस असलेल्या मौजे कारगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील खाजगी जमिनीतून पावसाळी वाहणारा ओढा व पाण्याचे झरे हे पुढे जाऊन पिण्याच्या पाण्याच्या चार विहिरी व एक बोरिंग च्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ पूर्वीपासुन आजपर्यंत वापर करत आहेत .सदरील गाव हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन केलेले गाव असून त्या गावाला विहिरी व बोरिंग शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून बांधून दिलेले आहे. खोपोली पाली रोड वरील कारगाव गावाच्या शेजारी जवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेली उबरखिंड हे नाजिकच आहे व परिसरात घनदाट जंगल व झाडे, वनस्पती, औषदी झाडे व शुद्ध हवामान आहे. नैसर्गिक वारसा असलेल्या जागेवर भविष्यात गावाजवळ केमिकल कंपनी,"ब्राईट इनव्हायरनमेंट सोल्युशन्स या नावाची कंपनी आपले केमिकल कंपनीसाठी जागा घेऊन वातावरण व लोकांच्या आरोग्याची हानी कंपनीमुळे होणार आहे.

 सदर मिळकतीचे पुर्वीचे मालक निमीत हंसराज बाफना यांनी ग्रामस्थांची फसवणुक गेली २०१५ पासुन केली आहे, भुमी अभिलेख, तलाठी,ग्रामपंचायत ने अहवाल ग्रामस्थांच्या बाजुने देऊन फसवणुकी चा गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.कारगाव ग्रामस्थांचा ह्या कंपनी विरोधात पूर्णपणे एकजुटीने विरोध करीत आहेत. सद्या जागा घेतल्याबरोबर कंपनीने प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता कोणतीही NOC न घेता उत्खनन केल्याने जे पाण्याचे स्तोत्र ओढे, नाले ह्यामध्ये गढूळ पाणी जाऊन हे पाणी धूळ व माती मिश्रित गढूळ पाणी झाले आहे. पुढे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो वातावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो. आता थांबवले नाही तर पुढे लोकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार. खालापूर शासनातील अधिकारी, प्रशासन व पोलीस यांना हाताशी धरून कंपनी कारगाव ग्रामस्थांनवर्ती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. सदर कंपनीचे हस्तक कंपनीचे नुकसान करून ग्रामस्थांवर आळ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बेकायदेशीर बांधकाम, मातीचा भराव, करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कडून नोटीस देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी खालापूर प्रशासनाकडे व जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असताना देखील प्रशासन काना डोळा करत आहे व कंपनीला झुकते माप देत आहे, व ग्रामस्थांवर अन्याय करत आहे. कंपनी व प्रशासनाविरुद्ध ,एकजुटीने कारगाव ग्रामस्थ हे उभे राहिले आहे कोणत्याही परिस्तितीत कारगाव ग्रामस्थ आपल्या पाण्याच्या विहिरी, बोरवेल, नेसर्गिक संपती, झाडे व स्वच्छ हवामान खराब होऊ देणार नाही. त्यासाठी जरुरत पडली तर ग्रामस्थ ह्या कंपनी विरोधात एकजुटीने तीव्र आंदोलन व उपोषणाच्या तयारीत देखील आहेत अशी ग्वाही कारगावचे ग्रामस्थ श्री राजाराम गोविंद मुसळे, श्रीरंग दगडू मुसळे, केशव बाबाजी मुसळे, किशोर सखाराम शिंदे, शांताराम कोंडीबा मुसळे, स्वप्नील महादेव मुसळे, प्रशांत प्रकाश मुसळे, सुनिल शंकर मुसळे, नरेंद्र राजाराम मुसळे, नागेश गंगाराम मुसळे, दिनकर हरिबा मुसळे, महेंद्र नारायण मुसळे, हे ग्रामस्थ ह्यावेळी उपस्तित होते.

तांबटी येथे राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा

 


 खालापुर/सुधीर देशमुख: - तांबाटी गावात ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी सभाग्रुहात निरामय हेल्थ फाऊंडेशन आणि गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त संयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आयरन युक्त रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास तांबटी ग्राम पंचायतचे सरपंच श्री. अविनाश आमले, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक CSR श्री. तानाजी चव्हाण, ICDS च्या सुपरवायझर सौ. अर्चना मॅडम, निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या CEO डॉ. क्षमा निकम मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी या उपक्रमात ५६ महिलांनी स्वतः बनवलेल्या आयरन युक्त पौष्टिक रेसिपी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच ICDS अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी आहाराचे महत्त्व अधोरेखित झाले. विजेता महिलांची नावे : पहिला क्रमांक सौ मनाली संजय कुंभार, दुसरा क्रमांक सौ भारती शुभम सकपाळ, तिसरा क्रमांक सौ सुधा एकनाथ मालकर प्रथम उत्तेजनार्थ सौ जयश्री लहू महाराजे द्वितीय उत्तेजनार्थ सौ वर्षा गणेश तांडेल सर्वांचे अभिनंदन!!!

Thursday, September 18, 2025

लालपरीची बससेवा खोपोलीकरांसाठी डोकेदुखी

 


 खोपोली–पनवेल मार्गांवरील एसटी बससेवा प्रवाशांसाठी त्रासदायक अनुभव 

प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथून खालापूर, पनवेल, वाशी या मार्गांवर सुरू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बससेवा प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शहर व ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज या बससेवेवर अवलंबून असले तरी बस वेळेवर न येणे, चालक-वाहकांची अरेरावी, प्रवाशांना वाईट वागणूक, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद असे अनेक गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

 वेळेवर न येणाऱ्या बसेस :- प्रवाशांच्या मते, खोपोली ते पनवेल दरम्यानच्या बसेसकडून वेळापत्रकाचे पालन होत नाही. बसेस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येतात किंवा काही वेळा अजिबात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळा–कॉलेजला उशीर होतो तर नोकरदार वर्गांलाही दररोजच्या प्रवासात प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते.

 चालक–वाहकांची मनमानी :- या मार्गांवर कार्यरत असलेले काही चालक व वाहक प्रवाशांशी मनमानी वर्तन करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. थांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबवली जात नाही. बस पुढे निघून गेल्यामुळे महिला, लहान मुले आणि वयस्कर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही वेळा प्रवाशांनी विनंती केली तरी चालक–वाहक वाद घालणे, अरेरावी करणे व शिवीगाळ करणे असे प्रकार घडतात.

 सुट्ट्या पैशांवरून वाद :- भाडे घेताना सुट्ट्या पैशांवरून वारंवार वाद निर्माण होतात. वाहक प्रवाशांना सुट्टे देण्याऐवजी उलट त्यांच्यावर दबाव आणतात. प्रवाशांकडे सुट्टे नसल्यास त्यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते.

 महिला कंडक्टरकडूनही अरेरावी :- प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही वेळा महिला कंडक्टरही आपल्या पदाचा गैरफायदा घेत प्रवाशांशी उद्धटपणे वागतात. महिला प्रवाशांशी सौजन्याने वागण्याऐवजी कठोर शब्दांत बोलणे, दुर्लक्ष करणे यामुळे प्रवासी नाराज आहेत.

 गावोगाव थांबे न देण्याचा प्रकार :- खोपोली ते पनवेल मार्गांवर अनेक लहान गावे व वाड्या–वस्त्या आहेत. येथे प्रवासी बस थांबविण्याची विनंती करतात. मात्र, चालक–वाहक बहुतेक वेळा बस थांबवत नाहीत. यावरून प्रवाशांशी वाद घालणे, अगदी शिवीगाळ करणे यासारखे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 प्रवाशांचा संताप आणि मागणी :- या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे व सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

प्रवाशांची मागणी :- एस.टी. प्रशासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष द्यावे. बस वेळेवर सोडल्या जाव्यात. चालक व वाहकांना प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण द्यावे. सुट्ट्या पैशांवरील वाद कायमस्वरूपी थांबवावेत. गावोगाव थांबे देण्याबाबत स्पष्ट धोरण आखावे.

प्रशासन व जनप्रतिनिधींनी घ्यावी दखल :- या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री, रायगड जिल्ह्याच्या मंत्री आदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ थोरवे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच खोपोलीतील आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, खालापुरातील आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा, तालुका व खोपोली शहरातील नेते, तसेच सामाजिक संघटना यांनी तातडीने पुढाकार घेऊन प्रवाशांना न्याय द्यावा, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. प्रवाशांचा इशारा आहे की, संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर या अन्यायाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.

खोपोलीच्या विकासासाठी डॉं. सुनील पाटील हवेच!

 


 खोपोली नगराध्यक्षपदी डॉं. सुनील गोटीराम पाटील हेच एकमेव पर्याय

खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. खोपोलीच्या गल्लोगल्ली, चौकाचौकांत चर्चा रंगू लागली आहे की, आगामी नगराध्यक्ष कोण? इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. परंतु खोपोली शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत गेल्या दोन दशकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेले नाव म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील...नगरसेवक, गटनेते, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवितांना त्यांनी खोपोलीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असून नागरिकांमध्ये, खोपोलीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व कोण ? या प्रश्नाचे एकच उत्तर ठळकपणे पुढे येत आहे, ते म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील!

 भूतकाळातील उल्लेखनीय कार्य :-

डॉं. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात खोपोली शहराने खर्‍या अर्थाने विकासाची गती पकडली होती. रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट्स, शौचालये, बागबगीचे (गार्डन), पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. खोपोलीच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे नेऊन देत नागरिकांना "खऱ्या अर्थाने विकास" अनुभवायला मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बेरोजगार तरुण यांच्यासाठी स्वतंत्र योजना राबवून सर्वांगीण विकास साधला. शहराच्या सुशोभिकरणात, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे खोपोलीची ओळख "प्रगतशील शहर" म्हणून निर्माण झाली. यामुळेच आज खोपोलीच्या विकासाचा पाया मजबूत करण्यामध्ये डॉं. सुनील पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सर्वमान्य आहे.

 जनतेच्या मनातील विश्वास :- 

डॉं. पाटील हे फक्त नेता नाहीत, तर खोपोलीकरांच्या घराघरातले आपले व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांना ते सहज भेटतात, समस्या समजून घेतात, तत्काळ उपाय काढतात, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य. म्हणूनच आज प्रत्येक नागरिक ठामपणे सांगतो, आमचे नगराध्यक्षपदाचे स्वप्न म्हणजे डॉं. सुनील पाटील!

 सध्याची परिस्थिती व नागरिकांची नाराजी :-

 मागील काही वर्षांत खोपोलीतील विकासकामांचा वेग मंदावला आहे. रस्त्यांची दुर्दशा, पाण्याचा प्रश्न, अपुऱ्या सुविधा या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना असे वाटत आहे की, खोपोलीचा विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी डॉं. सुनील पाटील यांच्यासारखा सक्षम आणि अनुभवी नेता पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होणे आवश्यक आहे.

 आगामी निवडणुकीतील समीकरणे :- 

खोपोली नगर परिषद निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. राजकीय इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असली तरी खोपोलीकरांच्या मनातील सर्वात मजबूत आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील...त्यांचा अनुभव, लोकसंग्रह आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ही त्यांची मोठी ताकद आहे. "काम हेच धर्म" या ब्रीदवाक्याने त्यांनी केलेली सेवा नागरिकांना आजही आठवते. कट्टर शिवसैनिक, निष्ठावान कार्यकर्ता, कार्यसम्राट नगरसेवक ही त्यांची ओळख असून, त्यामागे लोकांचा विश्वास हा त्यांचा सर्वात मोठा भांडवल आहे.

 खोपोलीकरांची अपेक्षा :- 

खोपोलीकर आता फक्त आश्वासनांवर समाधानी नाहीत. त्यांना पाहिजे आहे काम करणारा, उपलब्ध असणारा आणि नागरिकांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देणारा नगराध्यक्ष. या सर्व गुणांचा संगम म्हणजे डॉं. सुनील पाटील...नागरिकांमध्ये ठाम मत तयार होत आहे की, खोपोलीचे नेतृत्व पुन्हा सक्षम हातात द्यायचे असेल, तर एकमेव पर्याय म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील!

 खोपोलीकरांची एकच मागणी :-

 निवडणुकीची चाहूल लागली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पण नागरिकांची एकच मागणी स्पष्ट आहे, विकास हवा असेल, तर नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील हवेत...आश्वासने नकोत, काम करणारे हात हवे आहेत!

खोपोलीकरांचा नारा :- 

🔥 विकास हवा – तर सुनील पाटील हवा!

🔥 खोपोलीचा खरा विकासपुरुष – डॉं. सुनील पाटील!"

🔥 जनतेच्या मनातील नगराध्यक्ष – सुनील पाटील!

 निष्कर्ष :- 

खोपोलीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी, खोपोलीकरांच्या विकासाच्या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी आणि शहराला खर्‍या अर्थाने "आदर्श शहर" बनविण्यासाठी येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत डॉं. सुनील गोटीराम पाटील हेच खोपोलीकरांच्या मनातील पहिले व सर्वात योग्य उमेदवार ठरणार आहेत, यात शंका नाही.

Wednesday, September 17, 2025

महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक संपन्न

 


बागवान समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 100 व्यक्तींचा सन्मान करणार 

पुणे /प्रतिनिधी :- पुण्यातील शासकीय विश्रामगृह क्रमांक दोन, आमदार निवास येथे महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील बागवान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांनी भूषवले. सुरुवातीला आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून समाजाच्या प्रगतीसाठी कमिटीची ध्येयधोरणे आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, महाराष्ट्रातील बागवान समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 100 मान्यवरांचा पुण्यात सन्मान केला जाणार आहे. डॉंक्टर, वकील, सरकारी अधिकारी, अभियंते, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. या सर्वांचा मुख्यमंत्री, आमदार-खासदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉंफी, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांत पार पडणार आहे.

बैठकीला सातारा येथील उपाध्यक्ष शाकिर बागवान, नासिर बागवान, अ‍ॅंड. जैद अकबर अली, अब्दुल बाकी बागवान छत्रपती संभाजीनगर, समद बागवान, गफ्फार भाई चौधरी, सोलापूर येथील हाजी फिरोज तुळजापुरे, हाजी मुस्ताक बागवान (मोहोळ), मतीन बागवान (पटेल), डॉं. सलीम बागवान, ए. आर. बागवान, रफिक बागवान (ससून), सलीम बशीर बागवान, शौकत बशीर, मॅरेज ब्युरोचे कासीम इस्माईल चौधरी नांदेड, अब्दुल गफार बागवान चिखली, हाजी समद पिरन बागवान मुंशी चिखली यांच्यासह सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बुलढाणा, सोलापूर, पुणे, नांदेड आणि इतर जिल्ह्यांमधून मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी साकिर बागवान आणि डॉं. अकबर बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी डॉं. शरीफ बागवान यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही समाजहितासाठी असेच सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रॉयल्टीचोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रातांधिकारी यांना निलंबित करा!

 


चौथास्तंभ पोखरला गेला असल्याचे संकपाळ यांचे मत

 रॉयल्टीचोरांवर कार्रवाई करण्यास दाखवली असमर्थता

आरटीआय कार्यकर्ते गावडे करणार कार्रवाईची मागणी

अवैध उत्खनन व भराव करणाऱ्यांवर कार्रवाईबाबत अधिकाऱ्याची डोळ्यावर पट्टी, कानावर हात ?

कर्जत / खलील सुर्वे :- तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, निवासी नायब तहसीलदार (महसूल) व तहसिलदार कामात कसूर करीत असतील...शासनाचे नुकसान करीत असतील... भ्रष्टाचार करीत असतील, सर्वसामान्यांना न्याय देत नसतील तर त्याबाबत प्रातांधिकारी अर्थात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाते, परंतु कर्जत-खालापूर तालुक्यात तर प्रातांधिकारी हेच कामात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर राज्य शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतांना मला काय करायचे...मला तर पगार आणि *** मिळत आहे ना ? शासनाचे नुकसान झाले तर झाले, ज्यांना शासनाचा पुळका आला असेल ते पाहतील...अवैध उत्खनन व भराव विरोधात तक्रार, आंदोलन, निवेदन, उपोषण, आत्मदहन केले तरी मी कार्रवाई करणार नाही, मी कार्रवाई करू शकत नाही, अशी भुमिका कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. 

न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टीस या मानवाधिकार संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष खलील सुर्वे, स्थानिक पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता सुरेश गावडे आदींनी प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांची भेट घेत अवैध उत्खनन व भराव करणाऱ्यांवर कार्रवाईबाबत चर्चा केली असता, प्रातांधिकारी संकपाळ यांनी अवैध उत्खनन व भराव करणाऱ्यांवर कार्रवाई करण्यास असमर्थता दर्शवली. उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचे काम प्रातांधिकारी यांनी केले. कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन व पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्यासोबत केलेले संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करण्यात आले असून सदर रेकॉर्डींग कोर्टात सादर करण्याची तैयारी देखील न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (एनजेए) चे रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र जाधव यांनी दाखवली आहे. 

खालापूर व कर्जत तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून भरमसाठ अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन भू-माफियांकडून करण्यात येत आहे. नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रासचे अवैध गौण खनिज उत्खनन व भराव केले जात आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, निवासी नायब तहसीलदार (महसूल), तहसिलदार व प्रातांधिकारी यावर कार्रवाई करीत नसल्याने रॉयल्टी चोर व मातीचोरांचे फावले आहे. दरम्यान, सदर चोरी ही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याच आशिर्वादाने होत असून लहानातील लहान कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी यांचे रेटकार्ड ठरले असून रोख स्वरूपात, एजंटमार्फंत हा व्यवहार होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हमाम में सब नंगे... असल्यानेच रॉयल्टी चोरी, अवैध उत्खनन व भराव विरोधात कार्रवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. 

नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रासचे अवैध गौण खनिज उत्खनन व भराव करणाऱ्या भू - माफियांना चाप बसविण्यासाठी चौथास्तंभ मानले जाणारे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून पर्यावरणाला हानी होऊ नये, राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होवू नये... रॉयल्टी व दंडाच्या रकमेतून शासनाच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी तसेच अवैध उत्खनन व भरावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भू-माफिया 100 - 200 ब्रासची रॉयल्टी भरून तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, निवासी नायब तहसीलदार महसूल, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या डोळ्यांदेखत शासनाचे आर्थिक नुकसान करीत आहेत. पण या रॉयल्टीचोरांवर कार्रवाई करण्यापेक्षा तहसील कार्यालयात तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांना व्हिव्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असते...चहापाणी केली जाते...शासनाचे नुकसान होत असतांना अनेकांचे खिसे भरले जात असल्याने रॉयल्टीचोर बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. 

वारंवार तक्रारी करून...निवेदन देवून... आंदोलन, उपोषण करूनही कार्रवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. अवैध उत्खनन व भराव करणाऱ्यांवर कार्रवाई करण्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी डोळ्यांवर पट्टी, कानावर हात ठेऊन बसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार यांनी केला आहे. खालापूर सेतू विभाग..कर्जत पुरवठा विभागात सुरू असलेला कारभार तसेच कर्जत-खालापूर तालुक्यात होणाऱ्या अवैधरित्या उत्खनन व भरावाबाबत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून निवेदन व तक्रारी अर्ज दिल्यावर पंचनामे केले जातात, पण ही गोपनीय माहिती देणाऱ्यांची नावे,  मोबाईल नंबर, घराचा पत्ता हा भू-माफियांना दिला जातो. त्यांना संबधित अर्जदाराला भेटून परस्पर सेटलमेंट करण्यास सांगितले जाते. खालेल्या मिठाला जागण्यासाठी महसुलातील अनेक भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी रॉयल्टीचोरांना तक्रारदाराची माहिती पोहचवितात आणि गोपनीय माहिती देणाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करतात. त्यावर आपण वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करता असा प्रश्न विचारताच कर्जतचे प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी उत्तर देतांना सांगितले की,  तुम्ही तुमचे नाव देवू नका, दुसऱ्याचे नाव द्या...टेन्शन कशाला घेताय...असे व्हिडीओ कोणीही काढते आणि पाठविते...तुमच्या रोजच तक्रारी असतात....मी काय कार्रवाई करणार...तुम्ही तुमचा जीव कशाला धोक्यात घालता...पत्रकार तर लोकशाहीचा चौथास्तंभ मानला जातो... पण आता पहिला स्तंभ, चौथा स्तंभ राहिलेले नाहीत, सगळे पोखरले गेले आहेत...प्रातांधिकाऱ्याचे हे उत्तर ऐकल्यावर प्रांत साहेब आपल्याकडून मिळालेल्या उत्तरानुसार लोकशाही संपली की काय असा प्रश्न मला पडला ? असे माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला...पहिला स्तंभ, चौथा स्तंभ राहिलेले नाही...मी काय कार्रवाई करू...मी कार्रवाई करू शकत नाही..अशा भाषेचा वापर प्रातांधिकारी करीत असतील तर इतर अधिकाऱ्यांची भाषा काय असणार ? त्यामुळे कर्जत व खालापूर तालुका वाचविण्यासाठी...लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी 'प्रांत हटाव कर्जत-खालापूर तालुका बचाव' अशी मागणी करण्यात आली आहे. कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांना निलंबित करण्यात यावे, त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी...कर्जत येथे रूजू झाल्यापासून त्याच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली आहे...रॉयल्टीचोरांसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केली आहे. दरम्यान, कर्जत प्रातांधिकारी संकपाळ यांच्यावर कार्रवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी देखील सांगितले. 

वरिष्ठ अधिकारीच भ्रष्टाचारात बडबडले असतील तर खालच्या अधिकाऱ्यांची अवस्था काय असणार ? शासनाचा लाखो-करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या भू-माफियांवर कार्रवाई होत नसेल व अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शासनाचे नुकसान होत असेल तर अशा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ? अशी मागणी पत्रकारांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे




पत्रकारितेत उत्कृष्ट योगदानासाठी संपादक फिरोज पिंजारी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

 


खोपोली/मानसी कांबळे :- ज्येष्ठ पत्रकार व संपादक फिरोज बशीर पिंजारी यांना पत्रकारिता व जनसंचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी International Journalism Council तर्फे “Certificate of International Recognition in Journalism & Mass Communication” या आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

पत्रकार फिरोज पिंजारी हे केपी न्यूज ग्रुपचे प्रमुख असून, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, KP News Spark, KP News Nation, KP Khandesh Plus News, KP Mystery Cast, कोकण प्रवाह आणि KP News खोपोली अशा अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक आहेत.

ते DK Foundation and Freedom and Justice चे महाराष्ट्र राज्य डिप्टी चीफ ऑब्झर्व्हर तसेच News Journalist Association चे संस्थापक अध्यक्ष आहेत. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत समाजातील प्रश्न निडरपणे मांडले असून, 2023 मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘चौथास्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.


त्यांचा हा सन्मान त्यांच्या नेतृत्वक्षमतेची आणि पत्रकारितेतल्या उत्कृष्ट योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.

अखेर बेपत्ता नौसैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश

 


 पाली भुतवली डॅम परिसरातील जंगल भागात आढळले शव !

 सह्याद्री रेस्कीव टीम व नेरळ पोलिस पथकांच्या प्रयत्नांना यश ! 

कर्जत /नरेश जाधव :- मुंबई कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलातील कार्यरत जवान सूरजसिंग चौहान हा काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता होता. सदर जवानाचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपूरी रेल्वे स्थानक ते पाली भुतिवली डॅम परिसरातील जंगल भागात दिसून येत होते. 33 वर्षीय सुरजसिंग अमरपालसिंग चौहान हे भिवानी, राजस्थान येथील रहिवासी असून ते मुंबई येथील कुलाबा डॉकर्याड एफटीटीटी नौदल विभागामध्ये मास्टर चीफ इएआर क्लास दोन या पदावर सेवेत कार्यरत होते. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ते घरामधून निघून गेले होते. त्याचा नौदलाच्या जवानांनी सकाळपासून शोध घेतला व त्यांच्या फोनवर संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाने कफ परेड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सदर बेपत्ता जवान सुरजसिंग अमरपालसिंग चौहान यांच्या फोनचे लोकेशन हे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिवपूरी रेल्वे स्थानकांच्या ते पाली भूतिवली धरण परिसरातील जंगल भागामध्ये दाखवत होते. नौदल व नेरळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. 

या मोहिमेत वैभव नाईक यांच्या सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम, एमएमआरसीसी रेस्क्यू सदस्य व ग्रामस्थांनीही सहभाग घेत भिवपूरी रेल्वे स्टेशन परिसरातील व रहदारीच्या ठिकांणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच धरण परिसर, जंगल, डोंगर भागात या पथकांद्वारे गेली सात ते आठ दिवस शोध मोहीम सुरू होती. 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास या जंगल परिसरात एक बॉडी दिसल्याची माहिती ही मुंबई येथील ट्रेकर व सायकलींग करणारे अर्थव घाटे (वय वर्ष 22) यांनी नेरळ पोलिस ठाण्यात देताच दुसऱ्या दिवशी अर्थात 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शोधमोहीमे दरम्यान सह्याद्री मित्र आपतकालीन संस्था माथेरान, नेरळ पोलिस टीम व नौदलाच्या टीमला या बेपत्ता जवानाचा मृतदेह हा सापडून आला. सदर जवानाचा मृतदेह हा संध्याकाळी मुंबई येथील जे.जे हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. या शोधमोहिमेमध्ये नेरळ पोलिस टीमला व नौदलाच्या टिमला सह्याद्री मित्र आपतकालीन संस्था माथेरानचे सदस्य वैभव विकास नाईक, संदीप रघुनाथ कोळी, धीरज वालेंद्र, किशोर कांबळे, महेश काळे, सुनील कोळी, सुनील ढोले, चेतन कळंबे यांची मोलाची मदत लाभली. या शोध मोहिमेत कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल गायकवाड व नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलिस टीमने अथक मेहनत घेतली.

Monday, September 15, 2025

भारत भूषण खासदार सुनील तटकरे यांचा कर्जतमध्ये होणार ऐतिहासिक भव्य सत्कार सोहळा!

 

वावोशी येथील आढावा बैठकीत उत्साहाची लाट – कार्यकर्त्यांचा निर्धार ठाम

 खालापुर/सुधीर देशमुख :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे भाग्यविधाते खासदार सुनीलजी तटकरे यांना लंडन येथे भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या अभूतपूर्व सन्मानाने संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने उजळून निघाला असून, आता त्यांच्या सत्काराचा ऐतिहासिक सोहळा 21 सप्टेंबर रोजी कर्जत येथे भव्य थाटात साजरा होणार आहे.

       या संदर्भात वावोशी येथे झालेल्या आढावा बैठकीत उत्साहाची लाट उसळली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, “हा सत्कार आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने यात सहभागी होऊन इतिहास घडवावा,” असे ठाम आवाहन केले. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी विशेष मार्गदर्शन करत, “हा सोहळा रायगडच्या जनतेचा आहे. कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा,” असे सांगून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुनील शेळके, महिला नेत्या रूपालीताई चाकणकर, आदितीताई तटकरे, खासदार आनंद परांजपे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती निश्चित झाली आहे. त्यामुळे हा सोहळा राजकीय सोहळ्यापेक्षा अधिकच रायगडवासीयांच्या भावनांचा मोठा उत्सव ठरणार आहे. या बैठकीत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि शरद कदम यांनी कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी देखील “सुनील तटकरे यांचा हा सत्कार जितका भव्य तितकाच तोलामोलाचा झाला पाहिजे. तोच आपला अभिमान आहे,” असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी देखील सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीत नवे प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचेही स्वागत करण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 यामध्ये विशेषतः खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंढे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्षा सुरेख खेडकर, विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, ओबीसी सेल अध्यक्ष बंधू मलबारी, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर मानकावले, प्रमोद जाधव, खालापूर महिला अध्यक्षा प्राची पाटील, संजीवनी पिंगळे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, खालापूर युवक अध्यक्ष अमर मानकावळे, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, खालापूर शहर युवक अध्यक्ष रोशन खराळ, कुणाल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी रायगडभरातून उसळणारा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि भव्य नियोजन यामुळे 21 सप्टेंबरचा हा सोहळा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Sunday, September 14, 2025

तहसील पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट ?

 


कर्जतच्या पुरवठा विभागात भोंगळ कारभार

 सर्वसामान्य नागरीकांची होतेय आर्थिक लूटमार

अधिकारी करतात जाणीवपूर्वक डोळेझाक

तहसिलदारांकडे तक्रारीनंतर पत्रकाराच्या घरी धाव

कर्जत / विशेष प्रतिनिधी :- रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते. कर्जतच्या तहसील विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत असून या ठिकाणी अनधिकृतपणे काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करीत असल्याचे समोर आले आहे. सरकारी टेबलवर बसणाऱ्या खासगी व्यक्तींना त्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली असून त्याच्या वरकमाईत आर्थिक समभाग असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.

काही सामान्य व्यक्ती रेशनकार्ड संदर्भात पुरवठा विभागात गेल्यास अपुऱ्या कागदपत्रामुळे अधिकारी वर्गांकडून माघारी पाठविण्यात येते. यावेळी मात्र तेथील टेबलवर काम करणारे लोक अधिकाऱ्यांची नजर चुकवून या लोकांचा पाठलाग करून माझ्याकडे एवढे पैसे व कागदपत्रे द्या, मी तुमचे काम करून देतो असे सांगण्यात येते. यामुळे पुरवठा विभागात अपुरी कागदपत्रे असले तरी देखील पैशांच्या जोरावर कामे करून दिली जात आहेत. असंख्य नागरिकांना रेशनकार्डसाठी आर्थिक लूटमार होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या नागरिकांनी माहिती दिली. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाची तात्काळ चौकशी करून अशा दलाल व कर्मचाऱ्यांना वेसन घालण्याची नितांत गरज भासू लागली आहे. तसेच ताबडतोब रेशन कार्ड मिळविण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागत असून पैसे दिले नाहीत तर 'तारीख पे तारीख' मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्रशासकीय भवनातील पुरवठा विभागात रेशनकार्डच्या विविध कामांसाठी हजारो रुपये उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. तर पुरवठा विभागात शासकीय नेमणूक नसतांना देखील खासगी व्यक्तीला अनधिकृतपणे टेबल समोर काम करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य नागरिकांची लुटमार केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर पुरवठा विभागात किरकोळ कामकाजासह रेशनकार्ड काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे सांगून सर्वसामान्य लोकांकडून हजारो रुपये घेतले जातात. यामुळे कर्जतच्या प्रशासकीय भवनात सध्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रेशनिंगचे विभक्त, दुबार, नाव कमी करणे, नाव वाढविणे यासाठी कामे घेऊन येत असतात. मात्र, कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी हजारो रुपये लुटले जातात, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर जे पैसे देतील त्या नागरिकांना तातडीने रेशन कार्डाची कामे करून दिली जातात, तर पैसे न देणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक खेटे घालण्यासाठी भाग पाडले जात आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेची हेळसांड व लुटमार करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.

पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार आर. पी. दळवी यांना रेशनकार्ड किती दिवसांत मिळतो आणि त्यासाठी शासनाच्या नियमानुसार किती पैसे भरावे लागतात याची माहिती विचारली असता नवीन रेशन कार्डसाठी 20 रुपये आणि दुय्यमसाठी 40 रुपये लागतात व एक ते दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिने लागू शकतात. कारण कर्जत तालुका खूप मोठा आहे आणि आम्हाला ही खूप काम असते. आता तुम्ही मला माहिती विचारता त्यामुळे किती वेळ गेला, दिवसभर असे किती लोक येतात त्यामुळे वेळ मिळत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत दळवी यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.

एका व्यक्तीला अंदाजे अर्ज करून वर्ष झाला तरी रेशन कार्ड मिळाला नसून अर्ज ही पुरवठा विभागात मिळत नसल्याची तक्रार पत्रकारांकडे केली आहे. तसेच तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. पत्रकार तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी तहसिलदार व संबधित अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे. पुरवठा विभागाच्या एका लोकसेवकाने पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या घरी जावून मी पैसे घेतले नाही असे सांगितले. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती द्यायची की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा बेजबादार..काम शून्य...कामचुकार अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कार्रवाई करतील का ? की भ्रष्टाचाराच्या गंगेत सर्वांनीच आंघोळ केली आहे का ? असा संतप्त सवाल पत्रकार राजेंद्र जाधव यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई प्रादेशिक कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न.....

 

मुंबई/प्रतिनिधी :- दि.14 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, मुंबई क्षेत्र च्या वतीने मुंबईतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर आज दास बंगला टिटवाळा कल्याण येथे आयोजित करण्यात आले.सदर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा राज्याचे संघटनेचे सर्कल सेक्रेटरी मा.जयराम जाधव यांनी केले. आपल्या उद्घाटन पर भाषणात श्री. जाधव यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना संघटनेचे महत्व आणि या निमित्ताने आपली एकजुट किती आवश्यक आहे याचे महत्व पटवून दिले..आपल्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते हीच माझी ताकत आहे. त्यामुळे संघटनेच्या पाठी आपण एकदिलाने उभे रहा. मुंबई क्षेत्रातील बारा डिव्हिजन तसेच शेजारील ठाणे, नवी मुंबई ,कराड डिव्हिजन मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.के. आर.शिलवंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्कल उपाध्यक्ष सर्वश्री, तानाजी कांबळे, नवी मुंबई रिजनल सेक्रेटरी संजय जाधव, ठाणे डिव्हिजनचे सेक्रेटरी प्रविण जाधव, सर्कल ऑर्गनायझेशन सेक्रेटरी प्रविण बनसोडे, दिगंबर सोनवले,असी.सर्कल खजिनदार सुरेश रोडेवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई प्रांतातील सर्व डिव्हिजनल सेक्रेटरी यांची तसेच पदाधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजनल सेक्रेटरी पीराजी सदावर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बुद्धभुषण सैनदाणे यांनी केले.

Saturday, September 13, 2025

खोपोली शहरातील महिलांनी घेतला नृत्य स्पर्धेचा आस्वाद

 



 आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित नारी वैभव भारत दर्शन उत्साहात साजरा

खोपोली / मानसी कांबळे :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी आयोजित नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा कार्यक्रम शनिवार, 13 सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे पार पडला. भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती आपल्या नृत्य शैलीतून सादर करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य अविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य स्पर्धेचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रातील कोकणी, कोळी, लावणी, आदिवासी, धनगर नृत्य, लोक नृत्य तसेच गुजरात, राजस्थान, आसाम, गोवा, केरळ, पंजाब, काश्मीर कर्नाटक आदी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून उपस्थित होत्या. 

 

यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना रोख रुपये 15000/- तर द्वितीय क्रमांक दुर्गा क्लब खोपोली राजस्थानी नृत्य यांना रोख रुपये 11000/- व तृतीय क्रमांक ओम साई महिला ग्रुप यांना आदिवासी नृत्यासाठी रोख रुपये 7000 /- देण्यात आले तसेच सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व सहभागी, नृत्य सादर करणाऱ्या महिला ग्रुप यांना रोख 5000 रूपये देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया रुपवते व माजी नगरसेविका जीनी सॅम्युअल यांनी केले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मिनाताई महेंद्र थोरवे, माजी नगरसेविका वनिता काळे, माधवी रिठे, अर्चना पाटील, रुपाली जाधव, महिला शहर अध्यक्षा प्रिया प्रविण जाधव, कांचनताई जाधव, जयश्री अनिल मिंडे, सोनिया मुकेश रूपवते, अनिता वायकर, जीनी सॅम्युअल, जैबुनिस्सा शेख, भावना सूर्यवंशी, पल्लवी देसाई तसेच खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील, शिवसेना नेते डॉं. सुनील गोटीराम पाटील, मोहन औसरमल, कुलदीप शेंडे, राजू गायकवाड, संतोष मालुसरे, अनिल मिंडे, गणेश खानविलकर, दिनेश थोरवे, प्रथमेश रोकडे, हरिश काळे, मंगेश मोरे, डॉं. राजू थोरवे, मुकेश रूपवते, लक्ष्मण (तात्या) रिठे व खोपोली शहरातील असंख्य महिला, खोपोली शहर महिला पदाधिकारी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने 140 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 


वाशी येथे पार पडला भव्य सत्कार समारंभ....

 खालापुर/सुधीर देशमुख:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजातील 300 कर्तृत्ववान आणि समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याचा तिसरा टप्पा नुकताच नवी मुबंई वाशी येथे पार पडला आहे.

   अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया नगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धनगर समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या कर्तृत्ववान महिलांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नुकताच कराड येथे आयोजित कार्यक्रमात 146 महिलांचा, पुणे 90 येथे महिलांचा आणि आता वाशी येथे 140 अश्या एकूण 300 महिलांचा सत्कार करून अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली.

     यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रामहरी रुपणवर, मुबंई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वासराव मोटे, कृगर व्हेन्टीलेशन कंपनीचे जनरल मॅनेजर संपतराव शेडगे, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी शंकरराव वीरकर, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे उधोजक संजय वाघमोडे, कुर्ला बँकेचे संचालक बाळासाहेब पुकळे, भूमी अभिलेख अधिकारी उल्हासराव वाघमोडे, सिडकोचे अधिकारी नितीन वीरकर, वर्ष लॉजिस्टिक कंपनीचे अधिकारी सचिन बुरुंगळे, प्रकाश पार्टे, अक्षय जानकर, आदित्य वाघमोडे, दयानंद ताटे, रामचंद्र पुकळे, आनंदराव कचरे, अनंता हिरवे, अक्षय चोपडे, शिवाजी दातीर, जगन्नाथ काकडे शरद काकडे नितीन काकडे अभिषेक शिंदे, नवलराज काळे,अण्णासाहेब वावरे नानासाहेब वाघमोडे शंकरराव कोळेकर मिलिंद मोटे लक्ष्मण गोरड विकास जानकर प्रमेश झंजे भास्कर यमगर नयन सिद नानासाहेब मगदूम राजाराम गोरे संजय गोरड पिराजी गोरड मारुती गोरड ओंकार कुचेकर राजाराम हुलवान वामन भानुसे शहाजी पाटील नवनाथ बिडगर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर आभार प्रदर्शन नवलराज काळे यांनी मानले.

Friday, September 12, 2025

आरपीआय वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीला लागा !

 

 मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांचे कायकर्त्यांना आवाहन

कर्जतमध्ये वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न 

 कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांना शाबासकीची थाप

नूतन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे यांचा सत्कार 

कर्जत/नरेश जाधव :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा 68 वा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होत असून यंदा या सोहळ्याचा मान रायगड जिल्ह्याला मिळाला आहे. महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड नगरीत राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. त्याच अनुषंगाने कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील शेळके बँक्वेट हॉल किरवली येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत शहर व तालुका कार्यकारिणीची बैठक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा आढावा बैठक व रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी राहुल सोनावळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सहसचिव कोकण प्रदेश जयप्रकाश पवार, जेष्ठ नेते अशोक गोतारणे, अलिबाग विधानसभा अध्यक्ष सुनील सप्रे, पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष प्रभू जाचव, पनवेल विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड, पनवेल महानगरपालिका प्रभारी मोहनीश गायकवाड, कोकण जनता विकास परिषद सरचिटणीस अमित तांबे, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, विधानसभा अध्यक्षा वर्षा चिकणे, कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे, आदिवासी विकास परिषद पनवेल तालुका अध्यक्ष अँड. लक्ष्मी विनोद साबळे, माया गौतम कांबळे, पनवेल विधानसभा सरचिटणीस गौतम विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.

कर्जतमध्ये तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'न भुतो न भविष्यती' अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. तालुकाध्यक्ष गायकवाड यांचे नियोजन पाहून मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांन हिरामण गायकवाड यांना शाबासकीची थाप दिली. ऐवढेच नव्हे तर या आढावा बैठकीत सर्वांनी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या सक्षम नेतृत्वात झालेल्या या सभेचे कौतुक केले. हिरामण गायकवाड यांनी या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत तालुक्यातून 10 बस काढणार असल्याचे जाहीर करीत पक्षवाढीसाठी तनमनधन लावण्याचा संदेश दिला.

यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, तालुका महासचिव अशोक गायकवाड, तालुका संपर्क प्रमुख किशोर गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड, उमरोली वॉंर्ड अध्यक्ष निलेश गायकवाड, कडाव उपसरपंच सुभाष शिंदे, अमित जाधव, दहिवली उद्योजक रोहित दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते महेश भगत, भावेश गायकवाड, सुधागड पाली संदेश भालेराव, नेरळ शहर अध्यक्षा मनिषा जाधव, नेरळ अध्यक्ष दिनेश आढाव, मांडवणे सरपंच प्रकाश भालेराव, राजू इंगळे, पनवेल रवी मोहिते, कोंदिवडे शाखा अध्यक्ष सुरेंद्र जाधव यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका, शहर, कार्यकारिणी व महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस सुरू करा!

 


 
अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन करणार 

 मागील चार महिन्यापासून पोस्ट ऑफिस बंद

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे पावसाळ्यात पाण्याच्या गळतीमुळे बंद करण्यात आलेले असून शिळफाटा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना खोपोली शहरात आपल्या पोस्टाच्या कामाकरीता करण्याकरीता जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. 

पोस्ट ऑफिस हे गळत असल्याकारणाने बंद करण्यात आलेले असून आम्ही नवीन जागा शोधत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे. 

शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे मागील चार महिन्यापासून बंद आहे व त्यामुळे सर्व नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तरी सदर पोस्ट ऑफिस तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी दिला आहे.