Wednesday, September 24, 2025

आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांची वावोशी गावाला भेट

 


नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

  खालापुर/सुधीर देशमुख :- खालापूर तालुक्यातील वावोशी गावाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, ४० वर्षे मुंबई शेअरबाजार (BSE), सेबी, NSDL सारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळणारे आणि ३५ पुस्तके, ८७ आवृत्त्या, तब्बल ४९०० व्याख्यानांचा विक्रम करणारे श्री. चंद्रशेखर टिळक यांनी काल (दि. २३ सप्टेंबर २०२५) वावोशीतील नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. 

 नरसिंह राव, अटलजी व डॉ. मनमोहनसिंग यांसारख्या तीन माजी पंतप्रधानांच्या विशेष निमंत्रणावरून धोरणात्मक चर्चेत सहभागी झालेले, तसेच हर्षद मेहता व केतन पारेख यांसारख्या गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावलेले टिळक यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे.

 “आमचे टिळक घराण्याचा आज सार्थ अभिमान वाटतो, मी भरून पावलो!” अशा शब्दांत नामवंत उद्योजक रवींद्र टिळक यांनी आपला भावनिक आनंद व्यक्त केला.

वावोशीसारख्या छोट्याशा गावातून जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ घडले, हीच खरी गावाच्या संस्कृतीची व परंपरेची जमेची बाजू असल्याचे ग्रामस्थांनीही गौरवोद्गार काढले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home