खोपोली शहरातील महिलांनी घेतला नृत्य स्पर्धेचा आस्वाद
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित नारी वैभव भारत दर्शन उत्साहात साजरा
खोपोली / मानसी कांबळे :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी आयोजित नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा कार्यक्रम शनिवार, 13 सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे पार पडला. भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती आपल्या नृत्य शैलीतून सादर करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य अविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य स्पर्धेचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रातील कोकणी, कोळी, लावणी, आदिवासी, धनगर नृत्य, लोक नृत्य तसेच गुजरात, राजस्थान, आसाम, गोवा, केरळ, पंजाब, काश्मीर कर्नाटक आदी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना रोख रुपये 15000/- तर द्वितीय क्रमांक दुर्गा क्लब खोपोली राजस्थानी नृत्य यांना रोख रुपये 11000/- व तृतीय क्रमांक ओम साई महिला ग्रुप यांना आदिवासी नृत्यासाठी रोख रुपये 7000 /- देण्यात आले तसेच सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व सहभागी, नृत्य सादर करणाऱ्या महिला ग्रुप यांना रोख 5000 रूपये देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया रुपवते व माजी नगरसेविका जीनी सॅम्युअल यांनी केले.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मिनाताई महेंद्र थोरवे, माजी नगरसेविका वनिता काळे, माधवी रिठे, अर्चना पाटील, रुपाली जाधव, महिला शहर अध्यक्षा प्रिया प्रविण जाधव, कांचनताई जाधव, जयश्री अनिल मिंडे, सोनिया मुकेश रूपवते, अनिता वायकर, जीनी सॅम्युअल, जैबुनिस्सा शेख, भावना सूर्यवंशी, पल्लवी देसाई तसेच खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील, शिवसेना नेते डॉं. सुनील गोटीराम पाटील, मोहन औसरमल, कुलदीप शेंडे, राजू गायकवाड, संतोष मालुसरे, अनिल मिंडे, गणेश खानविलकर, दिनेश थोरवे, प्रथमेश रोकडे, हरिश काळे, मंगेश मोरे, डॉं. राजू थोरवे, मुकेश रूपवते, लक्ष्मण (तात्या) रिठे व खोपोली शहरातील असंख्य महिला, खोपोली शहर महिला पदाधिकारी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home