शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस सुरू करा!
अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन करणार
मागील चार महिन्यापासून पोस्ट ऑफिस बंद
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे पावसाळ्यात पाण्याच्या गळतीमुळे बंद करण्यात आलेले असून शिळफाटा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना खोपोली शहरात आपल्या पोस्टाच्या कामाकरीता करण्याकरीता जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
पोस्ट ऑफिस हे गळत असल्याकारणाने बंद करण्यात आलेले असून आम्ही नवीन जागा शोधत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे.
शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे मागील चार महिन्यापासून बंद आहे व त्यामुळे सर्व नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तरी सदर पोस्ट ऑफिस तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी दिला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home