फुड माॅल मधे काम करणाऱ्या महिलांसाठी महिला सक्षमीकरण विषय सत्र आयोजित केले
खालापुर/सुधीर देशमुख - रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल यांच्या आदेशानुसार व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे सर यांच्या निर्देशनानुसार खोपोली–खालापूर फूड मॉल येथे कार्यरत असलेल्या महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण विषयक सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रामध्ये महिलांना महत्वाचे काही मुद्दे सांगण्यात आले हनी ट्रॅप, फेसबुक स्कॅम, शिक्षण, सायबर क्राईम, ऑनलाईन होणारी फसवणूक, सोशल मीडिया चा वापर कमीत कमी करणे. डायल ११२ वुमन हेल्प लाईन, सायबर सुरक्षा हेल्प लाइन १०९ या सर्व विविध उपाययोजना कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. खोपोलीतील तळागाळातील महिलांना अशा मार्गदर्शनामुळे जागरूकता व आत्मनिर्भरतेचा नवा दृष्टिकोन मिळाला.
कार्यक्रमाला खोपोली पोलीस ठाण्याचे अमलदार महिला पोलिस हवलदार संजना चव्हाण व पोलीस कॉस्टेबल सुषमा खाडे तसेच खोपोली पोलीस ठाणे महिला दक्षता समितीच्या सदस्या इशिका शेलार व वर्षा मोरे उपस्थित होत्या.या उपक्रमासाठी सर्व महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फुड मॉलचे मुख्य कार्यकारी मोहम्मद रमीझ रजा व अभिजीत लक्ष्मण राऊत यांनी खोपोली पोलीस ठाण्याचे विशेष आभार मानले व यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
.jpg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home