कारगाव ग्रामस्थांचा पुढील पिढीसाठी कंपनी व खालापूर प्रशासनाविरुद्ध अस्तित्वाची लढाई
खालापूर/सुधीर देशमुख :- कारगावचे ग्रामस्थ हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त असून त्यांना शासनानी दिलेल्या जागेतील वाहिवाटीस असलेल्या मौजे कारगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील खाजगी जमिनीतून पावसाळी वाहणारा ओढा व पाण्याचे झरे हे पुढे जाऊन पिण्याच्या पाण्याच्या चार विहिरी व एक बोरिंग च्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ पूर्वीपासुन आजपर्यंत वापर करत आहेत .सदरील गाव हे कोयना धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन केलेले गाव असून त्या गावाला विहिरी व बोरिंग शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून बांधून दिलेले आहे. खोपोली पाली रोड वरील कारगाव गावाच्या शेजारी जवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेली उबरखिंड हे नाजिकच आहे व परिसरात घनदाट जंगल व झाडे, वनस्पती, औषदी झाडे व शुद्ध हवामान आहे. नैसर्गिक वारसा असलेल्या जागेवर भविष्यात गावाजवळ केमिकल कंपनी,"ब्राईट इनव्हायरनमेंट सोल्युशन्स या नावाची कंपनी आपले केमिकल कंपनीसाठी जागा घेऊन वातावरण व लोकांच्या आरोग्याची हानी कंपनीमुळे होणार आहे.
सदर मिळकतीचे पुर्वीचे मालक निमीत हंसराज बाफना यांनी ग्रामस्थांची फसवणुक गेली २०१५ पासुन केली आहे, भुमी अभिलेख, तलाठी,ग्रामपंचायत ने अहवाल ग्रामस्थांच्या बाजुने देऊन फसवणुकी चा गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.कारगाव ग्रामस्थांचा ह्या कंपनी विरोधात पूर्णपणे एकजुटीने विरोध करीत आहेत. सद्या जागा घेतल्याबरोबर कंपनीने प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता कोणतीही NOC न घेता उत्खनन केल्याने जे पाण्याचे स्तोत्र ओढे, नाले ह्यामध्ये गढूळ पाणी जाऊन हे पाणी धूळ व माती मिश्रित गढूळ पाणी झाले आहे. पुढे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो वातावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो. आता थांबवले नाही तर पुढे लोकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार. खालापूर शासनातील अधिकारी, प्रशासन व पोलीस यांना हाताशी धरून कंपनी कारगाव ग्रामस्थांनवर्ती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. सदर कंपनीचे हस्तक कंपनीचे नुकसान करून ग्रामस्थांवर आळ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बेकायदेशीर बांधकाम, मातीचा भराव, करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कडून नोटीस देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी खालापूर प्रशासनाकडे व जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असताना देखील प्रशासन काना डोळा करत आहे व कंपनीला झुकते माप देत आहे, व ग्रामस्थांवर अन्याय करत आहे. कंपनी व प्रशासनाविरुद्ध ,एकजुटीने कारगाव ग्रामस्थ हे उभे राहिले आहे कोणत्याही परिस्तितीत कारगाव ग्रामस्थ आपल्या पाण्याच्या विहिरी, बोरवेल, नेसर्गिक संपती, झाडे व स्वच्छ हवामान खराब होऊ देणार नाही. त्यासाठी जरुरत पडली तर ग्रामस्थ ह्या कंपनी विरोधात एकजुटीने तीव्र आंदोलन व उपोषणाच्या तयारीत देखील आहेत अशी ग्वाही कारगावचे ग्रामस्थ श्री राजाराम गोविंद मुसळे, श्रीरंग दगडू मुसळे, केशव बाबाजी मुसळे, किशोर सखाराम शिंदे, शांताराम कोंडीबा मुसळे, स्वप्नील महादेव मुसळे, प्रशांत प्रकाश मुसळे, सुनिल शंकर मुसळे, नरेंद्र राजाराम मुसळे, नागेश गंगाराम मुसळे, दिनकर हरिबा मुसळे, महेंद्र नारायण मुसळे, हे ग्रामस्थ ह्यावेळी उपस्तित होते.
.jpg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home