खोपोलीच्या विकासासाठी डॉं. सुनील पाटील हवेच!
खोपोली नगराध्यक्षपदी डॉं. सुनील गोटीराम पाटील हेच एकमेव पर्याय
खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. खोपोलीच्या गल्लोगल्ली, चौकाचौकांत चर्चा रंगू लागली आहे की, आगामी नगराध्यक्ष कोण? इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. परंतु खोपोली शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत गेल्या दोन दशकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेले नाव म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील...नगरसेवक, गटनेते, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवितांना त्यांनी खोपोलीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असून नागरिकांमध्ये, खोपोलीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व कोण ? या प्रश्नाचे एकच उत्तर ठळकपणे पुढे येत आहे, ते म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील!
भूतकाळातील उल्लेखनीय कार्य :-
डॉं. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात खोपोली शहराने खर्या अर्थाने विकासाची गती पकडली होती. रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट्स, शौचालये, बागबगीचे (गार्डन), पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. खोपोलीच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे नेऊन देत नागरिकांना "खऱ्या अर्थाने विकास" अनुभवायला मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बेरोजगार तरुण यांच्यासाठी स्वतंत्र योजना राबवून सर्वांगीण विकास साधला. शहराच्या सुशोभिकरणात, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे खोपोलीची ओळख "प्रगतशील शहर" म्हणून निर्माण झाली. यामुळेच आज खोपोलीच्या विकासाचा पाया मजबूत करण्यामध्ये डॉं. सुनील पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सर्वमान्य आहे.
जनतेच्या मनातील विश्वास :-
डॉं. पाटील हे फक्त नेता नाहीत, तर खोपोलीकरांच्या घराघरातले आपले व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांना ते सहज भेटतात, समस्या समजून घेतात, तत्काळ उपाय काढतात, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य. म्हणूनच आज प्रत्येक नागरिक ठामपणे सांगतो, आमचे नगराध्यक्षपदाचे स्वप्न म्हणजे डॉं. सुनील पाटील!
सध्याची परिस्थिती व नागरिकांची नाराजी :-
मागील काही वर्षांत खोपोलीतील विकासकामांचा वेग मंदावला आहे. रस्त्यांची दुर्दशा, पाण्याचा प्रश्न, अपुऱ्या सुविधा या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना असे वाटत आहे की, खोपोलीचा विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी डॉं. सुनील पाटील यांच्यासारखा सक्षम आणि अनुभवी नेता पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होणे आवश्यक आहे.
आगामी निवडणुकीतील समीकरणे :-
खोपोली नगर परिषद निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. राजकीय इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असली तरी खोपोलीकरांच्या मनातील सर्वात मजबूत आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील...त्यांचा अनुभव, लोकसंग्रह आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ही त्यांची मोठी ताकद आहे. "काम हेच धर्म" या ब्रीदवाक्याने त्यांनी केलेली सेवा नागरिकांना आजही आठवते. कट्टर शिवसैनिक, निष्ठावान कार्यकर्ता, कार्यसम्राट नगरसेवक ही त्यांची ओळख असून, त्यामागे लोकांचा विश्वास हा त्यांचा सर्वात मोठा भांडवल आहे.
खोपोलीकरांची अपेक्षा :-
खोपोलीकर आता फक्त आश्वासनांवर समाधानी नाहीत. त्यांना पाहिजे आहे काम करणारा, उपलब्ध असणारा आणि नागरिकांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देणारा नगराध्यक्ष. या सर्व गुणांचा संगम म्हणजे डॉं. सुनील पाटील...नागरिकांमध्ये ठाम मत तयार होत आहे की, खोपोलीचे नेतृत्व पुन्हा सक्षम हातात द्यायचे असेल, तर एकमेव पर्याय म्हणजे डॉं. सुनील गोटीराम पाटील!
खोपोलीकरांची एकच मागणी :-
निवडणुकीची चाहूल लागली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पण नागरिकांची एकच मागणी स्पष्ट आहे, विकास हवा असेल, तर नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील हवेत...आश्वासने नकोत, काम करणारे हात हवे आहेत!
खोपोलीकरांचा नारा :-
🔥 विकास हवा – तर सुनील पाटील हवा!
🔥 खोपोलीचा खरा विकासपुरुष – डॉं. सुनील पाटील!"
🔥 जनतेच्या मनातील नगराध्यक्ष – सुनील पाटील!
निष्कर्ष :-
खोपोलीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी, खोपोलीकरांच्या विकासाच्या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी आणि शहराला खर्या अर्थाने "आदर्श शहर" बनविण्यासाठी येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत डॉं. सुनील गोटीराम पाटील हेच खोपोलीकरांच्या मनातील पहिले व सर्वात योग्य उमेदवार ठरणार आहेत, यात शंका नाही.
.jpeg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home