महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक संपन्न
बागवान समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 100 व्यक्तींचा सन्मान करणार
पुणे /प्रतिनिधी :- पुण्यातील शासकीय विश्रामगृह क्रमांक दोन, आमदार निवास येथे महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील बागवान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांनी भूषवले. सुरुवातीला आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून समाजाच्या प्रगतीसाठी कमिटीची ध्येयधोरणे आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, महाराष्ट्रातील बागवान समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 100 मान्यवरांचा पुण्यात सन्मान केला जाणार आहे. डॉंक्टर, वकील, सरकारी अधिकारी, अभियंते, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. या सर्वांचा मुख्यमंत्री, आमदार-खासदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉंफी, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांत पार पडणार आहे.
बैठकीला सातारा येथील उपाध्यक्ष शाकिर बागवान, नासिर बागवान, अॅंड. जैद अकबर अली, अब्दुल बाकी बागवान छत्रपती संभाजीनगर, समद बागवान, गफ्फार भाई चौधरी, सोलापूर येथील हाजी फिरोज तुळजापुरे, हाजी मुस्ताक बागवान (मोहोळ), मतीन बागवान (पटेल), डॉं. सलीम बागवान, ए. आर. बागवान, रफिक बागवान (ससून), सलीम बशीर बागवान, शौकत बशीर, मॅरेज ब्युरोचे कासीम इस्माईल चौधरी नांदेड, अब्दुल गफार बागवान चिखली, हाजी समद पिरन बागवान मुंशी चिखली यांच्यासह सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बुलढाणा, सोलापूर, पुणे, नांदेड आणि इतर जिल्ह्यांमधून मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी साकिर बागवान आणि डॉं. अकबर बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी डॉं. शरीफ बागवान यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही समाजहितासाठी असेच सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home