खालापूर/सुधीर देशमुख : - ग्रुपग्रामपंचायत होनाड अंतर्गत अंगणवाडी केंद्र होनाड येथे राष्ट्रीय पोषण अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या. टेभेंवाडी, होनाड, आडोशी, चिंचवली गोहे, आतकरगाव ,ह्या गावांचा कार्यक्रमा मध्ये समावेश होता. गावातील महिला, किशोर वहीन मुली, लहानमुले, तसेच गरोदर मातांचा ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती होती. पोषण आहारामध्ये विविध पोषक आहार व गरोदर मातांना देण्यात येणारे आहार व त्यांच्या लहान मुलांचे संगोपन या विषयी माहिती अंगणवाडी शिक्षिका यांनी दिली.
कार्यक्रमामध्ये अंगणवाडी शिक्षिका सौं अर्चना देशमुख, सौं आरती देशमुख, सौं वनिता देशमुख, सौं कल्याणी देशमुख, सौं गीता पाटील आणि त्याच बरोबर मदतनीस तसेच गावातील महिला यांची मोलाची साथ मिळाली म्हणून हा कार्यक्रम खूप छान झाला.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home