खोपोली पोलिसांची काटरंग भागातील बंगल्यावर धाड
विविध राजकीय पक्षांतील १७ जणांना ताब्यात, ४.३० लाखांची रोकड जप्त
पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या पथकाची पहाटे कारवाई
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली पोलिसांनी काटरंग भागात एका बंगल्यावर गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत विविध राजकीय पक्षांशी संबंधित १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जुगारासाठी वापरलेली तब्बल ४ लाख ३० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून धाड :- पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तुषार अहिर यांच्या मालकीच्या बंगल्यावर छापा टाकला. बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळ सुरू असल्याचे उघड झाले.
अटक केलेले आरोपी :- या कारवाईत अजय सोनवणे, संतोष सूर्यवंशी, भालचंद्र कदम, दत्ता बावधने, उमेश ओव्हाळ, रुपेश वाघमारे, महेश कर्णूक, प्रशांत साळुंखे, स्वप्नील चौधरी, प्रदीप कर्णूक, सुजात डेबनाथ, अमोल जाधव, अविनाश कदम, नबी शेख, राजेश पारठे आणि अल्पेश थुरपुडे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपींचा राजकीय व सामाजिक प्रभाव लक्षात घेता परिसरात या कारवाईची मोठ्या प्रमाणावर चर्चा. सुरू आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home