राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना मदत....
विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली....
खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अश्वपरीस फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रथमच आनंद शाळा, खोपोली – शीळ फाटा येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आनंद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली.
आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून, ही शैक्षणिक फी पूर्णतः आपल्याच समाजातील मदतीच्या हातांनी भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील विविध घटकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मदत ही केवळ जबाबदारी नसून, समाजाप्रती असलेली जाणीव व कर्तव्य आहे, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच भविष्यातही अशाच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्राला सक्षम बनविण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे या ध्येयाने अश्वपरीस फाऊंडेशन सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमास आनंद शाळेच्या आसावरी दंडवते मॅडम, मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी मॅडम, तसेच अश्वपरीस फाऊंडेशनच्या बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक नायकर, निजल खान व मुस्तफा खान यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा सामाजिक कार्याची आवश्यकता अधोरेखित केली.
अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे भविष्यातही शिक्षण, आरोग्य व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.jpg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home