Monday, September 15, 2025

भारत भूषण खासदार सुनील तटकरे यांचा कर्जतमध्ये होणार ऐतिहासिक भव्य सत्कार सोहळा!

 

वावोशी येथील आढावा बैठकीत उत्साहाची लाट – कार्यकर्त्यांचा निर्धार ठाम

 खालापुर/सुधीर देशमुख :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे भाग्यविधाते खासदार सुनीलजी तटकरे यांना लंडन येथे भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या अभूतपूर्व सन्मानाने संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने उजळून निघाला असून, आता त्यांच्या सत्काराचा ऐतिहासिक सोहळा 21 सप्टेंबर रोजी कर्जत येथे भव्य थाटात साजरा होणार आहे.

       या संदर्भात वावोशी येथे झालेल्या आढावा बैठकीत उत्साहाची लाट उसळली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून, “हा सत्कार आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने यात सहभागी होऊन इतिहास घडवावा,” असे ठाम आवाहन केले. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी विशेष मार्गदर्शन करत, “हा सोहळा रायगडच्या जनतेचा आहे. कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा,” असे सांगून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुनील शेळके, महिला नेत्या रूपालीताई चाकणकर, आदितीताई तटकरे, खासदार आनंद परांजपे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती निश्चित झाली आहे. त्यामुळे हा सोहळा राजकीय सोहळ्यापेक्षा अधिकच रायगडवासीयांच्या भावनांचा मोठा उत्सव ठरणार आहे. या बैठकीत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि शरद कदम यांनी कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी देखील “सुनील तटकरे यांचा हा सत्कार जितका भव्य तितकाच तोलामोलाचा झाला पाहिजे. तोच आपला अभिमान आहे,” असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी देखील सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीत नवे प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचेही स्वागत करण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 यामध्ये विशेषतः खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंढे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्षा सुरेख खेडकर, विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, ओबीसी सेल अध्यक्ष बंधू मलबारी, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर मानकावले, प्रमोद जाधव, खालापूर महिला अध्यक्षा प्राची पाटील, संजीवनी पिंगळे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, खालापूर युवक अध्यक्ष अमर मानकावळे, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, खालापूर शहर युवक अध्यक्ष रोशन खराळ, कुणाल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी रायगडभरातून उसळणारा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि भव्य नियोजन यामुळे 21 सप्टेंबरचा हा सोहळा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home