निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांचा वडवळ येथे किशोरवयीन मुलींसाठी MHM किटचे वाटप व जागरूकता सत्राचे आयोजन
खालापुर/सुधीर देशमुख :-निरामय हेल्थ फाऊंडेशन व गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त संयोगाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त किशोरवयीन मुलींसाठी MHM (Menstrual Hygiene Management) किट वितरण व जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमात एकूण ६४ मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व तसेच दैनंदिन आहारातील पोषणमूल्य याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. मार्गदर्शक म्हणून निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या प्रोग्राम ऑफिसर सौ. दीप्ती मथुरे उपस्थित होत्या. त्यांनी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत MHM विषयाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलींमध्ये जागरूकता वाढली व आत्मविश्वास निर्माण झाला.
या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ. वृशाली देशमुख, सौ. करुणा बोम्बे व सौ. हर्षाली काळे यांच्या हस्ते मुलींना MHM किटचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास निरामय हेल्थ फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक श्री. मंगेश भंडारे, तसेच हेल्थ वर्कर्स सौ. दर्शना मरागजे, सौ. पौर्णिमा गायकवाड व सौ. प्रतीक्षा सावंत उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home