मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - जावेद अहेमद
शासनाने तात्काळ मदत करण्याची ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन
देगलूर/ प्रतिनिधी:- मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नागरिकांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक अनेक भागात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्याचे पिकाचे नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे गावचे हजारो हेक्टर जमीन पुरातच बुडुन गेली आहे. या आसमानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. गुरे ढोरे व माणसाचा देखील यामध्ये जीव गेले आहेत.जमिनी नापीक झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाईची आवश्यकता आहे.
शासनाने केलेली आर्थिक मदत ही तुटपुंजी स्वरूपाची आहे. नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आणि तणाव वाढला आहे. शेतकरी बांधवावर आस्मांनी संकट आले आहे. त्यामुळे शेतकर्याना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहमद यानी इमेल द्वारे मुख्यमंञी साहेबांकडे केली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home