रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे गणेशोत्सव
खोपोली / मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.
या गणेशोत्सवाला माजी नगरसेवक आनंद नायडू, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत आठवले, उपाध्यक्ष संतोष नायडू, सनी पुजारी, सूरज परदेशी, प्रकाश मचकुरे, सुजल गायकवाड, भीमा मचकुरे, इरफान शेख, तुषार साळुंखे, उस्मान शेख, सतीश साळुंखे, निखिल शितोळे, ओंकार पवार, सत्यम गिरी, गणेश गोसावी, ऋषिकेश लोखंडे, फैयाज खंडुलवाले, संजय कुमावत, शंकर पवार, शिवा पुजारी, राहुल पालांडे, समीर मचकुरे, अशपाक शेख, अंज्या दोडमणी, रवी दोडमणी, निलेश परदेशी यांनी आयोजन केले असून त्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनास येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




.jpeg)













.jpeg)























