प्रत्येक घरातून उभा राहिला पाहिजे नवा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' – आमदार श्री महेंद्र थोरवे
खालापुर/ सुधीर देशमुख :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि प्रत्येक घरातून नवे 'डॉ. कलाम' घडावेत या उद्देशाने आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कळंब (कर्जत) येथे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा (ई-लर्निंग क्लासरूम) चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा. ग्रामीण भागातील मुलेच देशाचे भविष्य आहेत. आज केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावांत दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे. त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉ. कलाम घडवा.” तसेच कळंब शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत आहे तसेच ही रायगड जिल्हा परिषदेची आदर्श केंद्र शाळा आहे व भविष्यात राहील असा व्यक्त केला.
कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे, केंद्रप्रमुख माधुरी पाटील, मुख्याध्यापक एच. के. लोहकरे, जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रविंद्र बदे,विधानसभा संघटक शिवराम बदे, माजी सभापती राहुल विशे, सरपंच प्रमोद कोंडिलकर, यांच्यासह मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ व शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर आमदारांचे स्वागत केले, तर विद्यार्थ्यांनी ‘पहेलगाम हादसा’ आणि ‘मिशन सिंधूर’ या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले कलागुण सादर केले. तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांचा आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home