Wednesday, August 13, 2025

रायगडचा तिरंगा अदिती तटकरेच्या हाती! राज्य सरकारचा भरतशेठना झटका, शिवसेना संतप्त

 


रायगडच्या ध्वजारोहणावरून शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने

राज्य सरकारचा धक्का, आदिती तटकरेच फडकावणार तिरंगा

 खालापुर/सुधीर देशमुख:- रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पेटलेला शिवसेना विरुद्ध अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार, या प्रश्नावर येऊन ठेपला होता. अखेर राज्य सरकारच्या एका परिपत्रकाने हा वाद थेट ‘धगधगत्या’ टप्प्यावर पोहोचवला आहे.

         15 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे हा मान मिळेल, अशी आतुरतेने वाट पाहणारे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना जबर धक्का बसला आहे. शिवसेनेतील अनेक नेते व मंत्री “भरतशेठच फडकावतील रायगडचा तिरंगा” असा जाहीर सूर लावून बसले होते. पण, शासनाच्या या निर्णयाने त्यांची स्वप्ने क्षणात चुराडा झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पालकमंत्रिपदावर स्थगिती दिल्याने, "स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार?" या प्रश्नावर संपूर्ण रायगडची नजर होती. मात्र सरकारच्या या परिपत्रकाने तिरंगा तटकरे यांच्या हाती दिला आणि शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाचा ज्वालामुखी आणखी भडकवला आहे. रायगडमध्ये आता स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाइतकाच राजकीय स्फोटाचा काउंटडाऊन सुरू झाला आहे!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home