खालापूर शहरात तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन...
खोपोली / खलील सुर्वे :- देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठू नामाच्या गजरात व भारत मातेच्या जयघोषात खालापूर शहरात वातावरण न्हाऊन निघाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती चे औचित्य साधत पालखीचे आयोजन करण्यात आले.
विठुरायची पालखी व हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रे दरम्यान विठू नामाच्या गजर व भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय हिंदच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
या रॅलीत खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे, सभापती किशोर पवार, नगरसेविका लता लोते, नगरसेविका उज्ज्वला निधी, नगरसेविका सुनीता पाटील, नगरसेवक राजेश पारठे, मुख्याधिकारी कोमल कराळे, नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, पोलिस निरीक्षक सचिन पवार, प्रणित भोसले नगरपंचायत रचना सहाय्यक, जितेंद्र यादव नगरपंचायत कार्यालय अधीक्षक, अक्षय तोंडे करनिरीक्षक, सिद्धेश देशमुख लेखापाल व लेखापरीक्षक, दिलीप गायकवाड स्वच्छता निरीक्षक,अशोक सुसलादे सहाय्यक महसूल अधिकारी, गणेश मुंढे, योगराज महाजन, मंडल अधिकारी सचिन वाघ, मंडल अधिकारी भरत सावंत, दिपाली पवार, कविता साळवी, अमोल वाघ, एस आर पाटील मुख्याध्यापक, रोकडे सर, म्हेत्रे सर, माळी सर, सतीश राणे सर, रेश्मा मोटे मुख्याध्यापक, स्वाती शिंदे मॅडम, रामकृष्ण घाडगे सर, अतिश कांबळे सर, सम्यक गायकवाड सर, दिनेश भोईर पोलिस हवालदार, किरण शेळके पोलीस हवालदार, रमेश उघडा पोलिस हवालदार, अश्विनी पापल पोलिस हवालदार, स्वाती चीरमे पोलिस शिपाई, आशिष पाटील पोलीस शिपाई, उद्योजक महेश राठी यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी, खालापूर नगर पंचायत कर्मचारी वर्ग, स्वामी खालापूर तहसील कर्मचारी, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर खालापूर शाळा, जी जे इंग्रजी मिडीयम हायस्कूल खालापूर, खालापूर पोलिस स्टेशन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home