Monday, August 25, 2025

सौ.आश्विनी खंडागळे ठरल्या पहिल्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या पैठणी विजेत्या..

 

खोपोलीत महिलांसाठी अनोखा उपक्रम : पाताळगंगा नदी पूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा संपन्न.

खालापूर/दिपक जगताप :- सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदीकिनारी नदी पुजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.सुरुवातीस सामूहिक नदी पूजन व आरती करण्यात आली. यानंतर ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांना सौ. रेखा भालेराव यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचा सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये आश्विनी खंडागळे या विजेत्या ठरल्या.विजेत्या महिलेस खोपोली नगरपालिकेच्या मा.नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून, सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.

या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर, खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार,महिला अध्यक्षा निलम पाटील,सह सचिव नम्रता परदेशी,युवा अध्यक्षा सागरिका जांभळे आणि मार्गदर्शिका सीमा त्रिपाठी तसेच दमयंती कोळी,मनीषा नरांगळे,हरजिंदरकौर धंजल,प्रविणा बुटाला,वेदा साखरे,मुस्कान सय्यद,अंजली शर्मा,संगिता शुक्ला,रेखा भालेराव,सुनील घावटे यांनी अथक सक्रिय मेहनत घेतली.

या उपक्रमातील लकी ड्रॉसाठी पैठणी साडी प्रायोजक म्हणून द्वारकाधीश साडी सेंटर, शीळफाटा यांचे सहकार्य लाभले असून, वाढदिवस केकसाठी द केक शॉप, खोपोली (संचालिका शिल्पा भाविक शेडगे) यांचे योगदान आहे.

दर महिन्याला नदी पूजन व आरती सोबत खालापूर तालुक्यातील महिलांचा सामूहिक वाढदिवस या माध्यमातून साजरा होणार असल्याने या अभिनव उपक्रमात स्थानिक पातळीवर महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील व मार्गदर्शक सीमा त्रिपाठी यांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home