Wednesday, August 13, 2025

नारंगी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांची बोंबा बोंब......

 

तरीही सरपंचाला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार..... मिळाला कसा ?

 खालापूर/सुधिर देशमुख:- नारंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर व आदिवासी वाडी येथील नागरिकांनी आज सकाळी गावात जाणारा रस्ता अडवून

 बैठा आंदोलन वृध्द ,महिला ,तरुण वर्ग व गावातील रहिवाशी यांनी मिळून नारंगी ग्रामपंचायतिच्या विरोधात घोषणा दिल्या ,पंचशिल नगर भागातील मुख्य रस्ता मंजूर होऊन एक वर्ष व सात महिने झाले अनेक वेळा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन म्हणून एकवीस नारळ आजपर्यंत फुटले .आजच्या घडीला रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे पावसाळ्यात चिखल आणि खड्या मुळे रहदारी ही मोठे आव्हान बनली आहे शाळकरी मुले, वृध्द, आणि महिला वर्गाना प्रचंड त्रास होत आहे.तसेच संपूर्ण परिसरात रोड वर लाईट न चालू असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे अपघात,चोरी, आणि महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न गंभीर झाला आहे.गावकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.स्थानिक ग्रामस्थांचा विशेष करून महिलांचा उद्रेग दिसून आला.यावेळी प्रशासनाविरोधात बोलताना लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या,प्रशासन नेहमी तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांना आश्वासन रुपी चॉकलेट दाखवतात व नागरिकांना पुढील तीन दिवसात काम चालू होईल अशी ग्वाही देतात.

नारंगी ग्रामपंचायतीचे स्थानिक वॉर्ड सदस्य हे प्रशासनाविरोधात नागरिकांबरोबर आंदोलनात दिसून आले.नारंगी ग्रामपंचायत जनतेला रस्ते, वीज, स्वच्छ पाणी,ह्यासारख्या मूलभूत गरजा व सुविधा देऊ शकत नाही आणि त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचाला दोन वर्षाचा कालावधी झाला नाही तरीही उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार कोणत्या गुणवत्तेवर व कामांवर देण्यात आला असा गंभीर सवाल आंदोलनातील नागरिकांनी बोलून दाखविले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home