मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे वृक्ष तहसीलदार अभय चव्हाण , खालापूर नगरपंचायत आणि हेल्प फाउंडेशन यांच्या मदतीने हटविले..
तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह नागरिक भाऊक
खालापूर दिपक जगताप :- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला असून अशा परिस्थितीमध्ये काळजीवाहू तहसीलदार अभय चव्हाण ॲक्शन मोड मध्ये कार्यरत असून सतत फोन कॉल, व्हॉट्सॲप मेसेज यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणची अपडेट घेऊन प्रसंगी स्वतः उपस्थित राहून जनतेला धीर देत सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. आज खालापूर शहरामध्ये असणारा प्राचीन शंकर मंदिरालगत 200 वर्षापूर्वी पासून असलेले पिंपळाचे झाड पडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली असता स्वतः निर्णय घेत खालापूर नगरपंचायत,हेल्प फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन व खालापूर नागरिक यांच्या मदतीने 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड बाजूला करण्याचे उत्तम प्रकारे केले. खूप वर्षे जुने असलेले पिंपळाचे झाड कसे तोडायचे हा विचार सर्वांच्या मनात येत असताना दुसरीकडे बाजूला असलेल्या नागरिकांची घरे व लगत असलेले भगवान श्री शंकराचे मंदिर यांचे मोठे नुकसान होऊ नये या साठी तहसीलदार अभय चव्हाण यांनी नागरिकांच्या विनंती वरून ते झाड बाजूला करण्याचे उत्तम काम केले. यावेळी तहसीलदार यांच्यासह नागरिक भाऊक झालेले पहायला मिळाले.रात्रीमध्ये ते झाड पडणार अशी खात्री जाणकार व्यक्त करत होते.यावेळी खालापूर नागरिकांनी तहसीलदार यांच्या कामावर समाधान व्यक्त करत आभार मानले. विशेषता जे काम दिवसा शक्य नाही ते काम रात्रीच्या वेळी भर पावसात, वादळ वाऱ्याची तमा न बाळगता काम करणारा बाळू आखाडे याचेही खालापूर नागरिकांनी यावेळी आभार मानले.सर्वत्र जनतेची सेवा करणारे हेल्प फाउंडेशन चे गुरुनाथ साठीलकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे यावेळी सहकार्य लाभले.
यावेळी तहसीलदार अभय चव्हाण,नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी संदेश पानसरे, अशोक सुसलादे,मुख्याधिकारी कोमल कराळे, प्रवीण शेडगे सहायक अभियंता महावितरण,नगराध्यक्षा रोशना मोडवे, सभापती किशोर पवार, नगरसेवक किशोर पवार, जितेंद्र यादव कार्यालय अधीक्षक, प्रणित भोसले रचना सहाय्यक, अक्षय लोंढे कर निरीक्षक,माजी नगरसेवक अवधूत भुर्के, उमेश पडवकर, नितीन पाटील, हेमलता चिंबूलकर, नंदकुमार लोहार, दत्ता लोहार, पत्रकार दिपक जगताप , गुरुनाथ साठीलकर व त्यांची संपूर्ण हेल्प फाउंडेशन ग्रुप, महावितरण कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी , पोलिस प्रशासन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home