Tuesday, August 12, 2025

भावी नगरसेवकासाठी सक्षम कार्य व नेतृत्व गुण

 


नागरिकांच्या समस्येला धावून जाणारा " शिवसेना ठाकरे गटाचा कट्टर शिवसैनिक " प्रमोद दादा खराडे !  

मुद्रे ( खुर्द ) परिसरात विश्वसनीय जनसंपर्क......

कर्जत/प्रतिनिधी :- नागरिकांच्या " समस्येला " धावून जाणारा व " सामाजिक बांधिलकीची " जाणीव ठेवणारा अतिशय नम्र स्वभावाचे , सर्वांचा आदर ठेवणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे खुर्द येथील " प्रमोद दादा खराडे " लोकप्रतिनिधी होण्यासाठी विश्वसनीय जनसंपर्क व सक्षम गुण असलेला " शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे " पक्षाचे कट्टर " शिवसैनिक " आहेत , हे त्यांच्या आजवरच्या कार्यावरून दिसत आहे. 

          प्रमोद दादा खराडे हे तरुण पणापासून " शिवसेनेचे " कट्टर शिवसैनिक आहेत. " हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे " यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या " ज्वलंत अग्निकुंडात " त्यांनी झेप घेत २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करत कट्टर शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत.सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याची धडपड त्यांनी आपल्या प्रभागा बरोबरच कर्जतमध्ये केली.अनेक आंदोलने,मोर्चे,रस्ता धरणे यांत अग्रेसर राहून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते " आक्रमक " राहिले . त्यांची हिच धडाडी बघून कालांतराने त्यांना मुद्रे खुर्द " शाखाप्रमुख " पद देण्यात आले. याकाळात देखील त्यांनी अनेक कामे केली , आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या , व्यायाम शाळेचा प्रश्न , छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा प्रश्न , उल्हास नदी स्वच्छता , स्मशानभूमी , रस्ते , पाणी , वीज यामध्ये त्यांची मुख्य भूमिका राहिली . तरुणांना " मैदानी खेळाची " आवड असावी म्हणून " कबड्डी " खेळाला प्राधान्य देत तरुणांचा कबड्डी संघ तयार केला व प्रमोद दादा खराडे यांनी मुद्रे खुर्द कबड्डी संघाचे अध्यक्षपद देखील भूषवले.

         कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना घरपोच गरजेच्या वस्तू पोहोचविले , यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे काम त्यांनी केले. त्यांच्या या धडाडीच्या कार्याची पोच पावती म्हणून " शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे " यांच्या आदेशाने " उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत " यांनी पक्ष वाढीसाठी डॅशिंग शिवसैनिक व सर्वांना मदतीला धावणारे प्रमोद दादा नाना खराडे यांची " कर्जत उपशहरप्रमुख " पदी नेमणूक करण्यात आली.

         कर्जत नगर परिषदेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठल्या पक्षाबरोबर युती करणार की नाही..? की स्वबळावर निवडणुका लढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मतदार ठाम असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे मोठं महत्त्व राहणार आहे . म्हणूनच त्यांची उमेदवारी मुद्रे प्रभागात महत्वाची ठरणार असून जो आदेश पक्ष प्रमुख देतील ते नम्रपणे पाळणारे प्रमोद दादा खराडे हे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून पक्ष काय भूमिका घेते , याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे . भावी नगरसेवकासाठी असलेले कार्य व नेतृत्वगुण असल्याने नागरिकांच्या " हाकेला " धावून जाऊन समस्या सोडविणाऱ्या अशा " लढवय्या नेतृत्वास " नगर परिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणे योग्य ठरेल. नगरसेवक म्हणून पक्षाने त्यांना संधी देऊ केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक गतिशील करून पक्षाचा " भगवा झेंडा " पालिकेवर नक्कीच डौलाने फडकण्यास शिवसैनिक प्रमोद दादा नाना खराडे यांचा हातभार असेल,यांत शंकाच नसेल.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home