Saturday, August 30, 2025

श्रीपत सूर्यवंशी शिळफाटा खोपोली येथे गणरायाचे आगमन

 

खोपोली /मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025  ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असुन शिळफाटा नवनाथ कॉलनी येथे श्रीपत गणपत सुर्यवंशी, संतोष श्रीपत सूर्यवंशी यांच्या घरी 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.

यावेळी गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा करून मोदकाचा नैवेद्य देण्यात आला. आरती घेऊन आलेल्या लोकांना महाप्रसाद देण्यात आला. श्रीपत गणपत सूर्यवंशी, संतोष श्रीपत सूर्यवंशी, भावना संतोष नायडू सूर्यवंशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनास येण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home