Friday, August 29, 2025

भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी स्वप्नील फराट यांची नियुक्ती

 

खालापुर/ दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी खालापुर तालुका पूर्व मंडळात विविध पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती जाहीर करण्यात आले असता यामध्ये ओबीसी मोर्चा खालापूर तालुका, कामगार आघाडी खालापूर तालुका व ट्रान्सपोर्ट आघाडी खालापूर तालुका याची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

       भाजपाचे नेते तथा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी मोर्चा खालापुर तालुका अध्यक्ष भरत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी महेश निरगुलकर, उपाध्यक्ष दिनेश  जंगम, उपाध्यक्ष योगेश महाडिक, चिटणीस रोणित म्हात्रे चिटणीस भगवान गणेशकर, कोषाध्यक्ष रोहित बोरीटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष निलेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी मोहन घाडगे व स्वप्नील फराट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home