Friday, August 22, 2025

खोपोली नगर परिषदेसाठी मजुरांचा जीव स्वस्त ?

 



 तात्पुरत्या आणलेल्या मजूर सुरक्षेपासून वंचित ?

सुरक्षा साधनांशिवाय राबताहेत मजूर कामगार ?

पर्मनंट कामगारांचा जीव महत्वाचा, पण तात्पुरत्या मजुरांचा गेला तरी चालेल ? 

मुख्याधिकारी साहेब सुरक्षा फक्त पर्मनंट कामगारांसाठी आहे का ?

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद कार्यालयाचे काम करण्यासाठी रोजंदारीवर तत्काळ स्वरूपात आणलेले कामगार मजुर सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पहायला मिळत असून त्यांना मिळणा-या सोयीसुविधा अपु-या असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे. रोजंदारी स्वरूपात कामास घेऊन तात्काळ कामापुरते त्यांचा वापर केला जात आहे. पण हे काम करतांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक, संबधित विभागाचे अधिकारी व प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. खोपोली नगर परिषदेत पर्मनंट (कायमस्वरूपी) कामाला असणारी व्यक्तीच माणूस आहे, तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर आणलेले मजूर माणूस नाहीत...त्यांचा जीव महत्वाचा नाही...त्यांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही...ते काम करता करता सुरक्षे अभावी मेले तरी त्याचे सोयरसुतक खोपोली नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी व पर्मनंट नोकरदार वर्गांला नसल्याचे दिसून येत आहे. 

या रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजूरांना काम करण्यासाठी सुरक्षेची गरज लागत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोपोली नगर परिषद कार्यालयाच्या दादऱ्यावर कार्पेट लावण्याचे काम सुरू असतांना दोन मजूर भर पावसात काम करतांना दिसत आहेत. हे काम करतांना कार्यालयातून घेण्यात आलेली विजेच्या 

तारचे जॉईंट दादऱ्यावर पाण्यात ठेवून तारेच्या जॉईंटला प्लास्टिक पिशवीने असुरक्षितपणे बांधण्यात आले आहे. तसेच रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजुरांच्या पायात चप्पल आहे. पायात सेफ्टी शूज...हातात हॅन्ड ग्लोज..डोक्यात हेल्मेट, डोळ्याला सेफ्टी गॉगल (चष्मा) नसतांना दादऱ्यावर असलेल्या मार्बलला ड्रिलिंग मशीनने कार्पेट लावण्याचे काम भर पावसात करतांना दिसत आहेत. हे काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना सुरक्षेची गरज नाही का ? त्यांच्या पायात चपल...हातात हॅन्डग्लोज नसतांना पाण्यात काम करत्यावेळी विजेचा झटका लागून दुर्घटना झाल्यावर नगर परिषदेला जाग येईल का ? कार्यालय काम सुरू असतांना अनेक नागरिक कार्यालयामध्ये येतात. दादऱ्यावरून येता वेळी यातील कुणाला विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला असता तर गेलेला जीव नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परत आणला असता का ?खोपोली नगर परिषदेच्या उद्यान भंडार विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वैयक्तिक तात्काळ आणलेल्या मजूर कामगारांचा जीव स्वस्त आहे का ? त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे नगर परिषदेची जबाबदारी नाही का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.


या विषयी खोपोली नगर परिषदेचे उद्यान व भंडार विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, कार्पेटचे टेंडर काढण्यात आले होते. लेबर आपण बाहेरून वैयक्तिक हायर केले होते. नाक्यावरून लेबर घेतला तर त्याला आपण काय सुरक्षा काय सांगणार...काम करतांना तो त्याच्या जीवाची काळजी घेतोच. आपण ज्यावेळी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ठेका देतो टर्म्स अँड अप कंडिशन (नियम व अटी) मध्ये सगळे ठरवून देतो. परंतु मजूर आपण हायर करतो, एखादा दिवस एखादा तास, अर्धा तास किंवा दोन तास इर्मजन्सी काम असते म्हणून आपण ते मजूर घेतो. प्रत्येकाची सेफ्टी ही प्रत्येकाला पाहिजे...कामाच्या सुरक्षितेच्या ज्या बाबी आहेत, त्या आपण आपल्या कर्मचाऱ्यांना देतो. त्यांना आपण काय करायचे आहे ते सांगितले होते पण तिथे कंटिन्यूशनमध्ये कोण उभ नव्हते...त्या ठिकाणी एखादे अपघात घडले असते, त्यांना काम सांगणारे म्हणजे मी जबाबदार ठरतो. माझ्या डिपार्टमेंटचे काम आहे म्हणजे मीच बोलवले मला ही जबाबदारी कार्यालयाने दिली आहे.


खोपोली नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर दादऱ्यावर भर पावसात कार्पेट बसविण्याचे काम मे, जून, जुलै व ऑगस्टचा अर्धा महिना उलटल्यानंतर इर्मजन्सी नगर पालिकेला का वाटले ? पावसाला सुरुवात होण्याआधी हे कार्पेट नगर परिषदेने का बसविले नाही ? रोजंदारीवर आणलेल्या मजुरांचा जीव मोलाचा नाही का ? कार्पेट बसविण्यासाठी इतके कोणते इर्मजन्सी आले होती की सुरक्षेवर दुर्लक्ष करून मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करण्यात आले ? नगर परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती येणार होते का ? बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील कारवाई करणार का ? की तेरी भी चूप मेरी भी चूप करीत...डोळे झाकत दुर्लक्ष होणार ? असा सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home