Thursday, August 14, 2025

डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

 

डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई / मानसी कांबळे :- महाराष्ट्र बागवान वर्कींग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष, बीव्ही (BV) न्यूज 24 चे मुख्य संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून डॉं. शरीफ बागवान यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार उत्तर महाराष्ट्र विभागातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार गरीब, गरजू लोकांना न्याय देण्याचे ते काम करतील आणि उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण देखील डॉं. शरीफ बागवान करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. 

दरम्यान, नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यासह राज्यभरात संघटनेची बांधणी व प्रचार, प्रसार करेल. तसेच उत्तर महाराष्ट्र व खान्देशात संघटना बांधण्याची माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असेही डॉं. बागवान म्हणाले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home