नांदेडहून मुंबईपर्यंत सेवा व सामाजिक एकोप्याची गौरवयात्रा
शेख सलीमाबी चाँद साब यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार
नांदेड/जावेद अहमद :- नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा थडी येथील ग्रामीण भागातून सामाजिक सेवेची सुरुवात केलेल्या बिलोली तालुक्यातील अटकळी येथील रहिवासी शेख सलीमाबी चाँद साब (वय 32) यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेतर्फे जाहीर झाला आहे.
भारतीय डाक विभागात कार्यरत असलेल्या शेख सलीमाबी गेल्या पाच वर्षे ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करत, विभागाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी जात आणि धर्म या सीमांच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘एक्सप्रेस’ वृत्तपत्राद्वारे हिरकणी पुरस्कार मिळाला होता. तसेच, 2023–24 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे डाक विभागाच्या वतीने उत्कृष्टता पुरस्कारही सन्मान स्वरूपात देण्यात आला आहे.
नुकतंच त्यांनी सामाजिक सद्भावनेची जागरूकता जपत रक्षाबंधन साजरे केले, ही बाब कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष खुशी कांबळे यांनीही आपले कौतुक व्यक्त केले आणि शेख सलीमाबी यांच्या कार्याचा सामाजिक दृष्टीकोनातून मान्यताप्राप्त सन्मान केला.
पदोत्थानाच्या परीक्षेत यश मिळवून शेख सलीमाबी हे गेल्या वर्षापासून मुंबई येथील कुर्ला पोस्ट ऑफिसमध्ये एमटीएस पदावर कार्यरत आहेत. मुंबईतही त्यांनी सामाजिक एकोप्याचे कार्य सुरू ठेवले असून स्थानिक समुदायामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेच्या वतीने शेख सलीमाबी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. या पुरस्काराद्वारे सामाजिक बांधिलकी, समर्पण आणि समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली गेली आहे. हा पुरस्कार 24 ऑगस्ट 2025 रोजी विरार पश्चिम येथे प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home