आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार..
खालापुर/ सुधीर देशमुख:- तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाण्यासाठी येथील रहिवाश्यांना रास्त न्हवता. रस्ता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता. याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मंडळी त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी सदरील रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वनविभाग मधून जात असल्याचे समजले. याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन , महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिल्याने येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला व सदरील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले.
यावेळी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे , खरिवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना किरण पाटील , उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खरीवली सुशांत विचारे , युवा सेना तालुका संपर्कप्रमुख मनीष विचारे , स्वप्निल चव्हाण , सचिन परबलकर , रामदास पालांडे , विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत , संकेत पालांडे , शिरीष पाटील , निलेश दिघे , निखिल पाटील , अनिल परबळकर , सम्राट गायकर , शुभम परबलकर , यश महाडिक , सुमित परबलकर , धाऊ माडे , मोहन माडे , नारायण वीर , शंकर हिरवा , गोपाळ हिरवा , चिमा हिरवा , नया हिरवा , बबन माळी , धर्मा हिरवा , बाळू हिरवा , पांडू वीर , तुकाराम मांडे , केशव मांडे , आतीश मांडे , चंद्रकांत मांडे , चंद्रकांत उघडा , हेमा हिरवा , नामदेव हिरवा , चंद्रकांत दोरे , करण माडे , रोहिदास माडे , मनोज आघान , चंद्रकांत आघान यांसह उजळोली , करंबेळी ठाकूरवाडी येथील स्थानिक उपस्थित होते..



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home