सुरक्षेचे बंध आणि स्नेहबंधन; कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन
कर्जत महिला आघाडीचा अनोखा रक्षाबंधन सोहळा
कर्जत शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. शर्वरी कांबळे यांचा पुढाकार
नरेश जाधव / कर्जत:- आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत शहराध्यक्ष सौ. शर्वरी संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
रोजच्या जीवनात पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात. जेव्हा नागरिक आपापले सण-उत्सव साजरे करतात, तेव्हा हे पोलीस बांधव आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी आणि भाव-भगिनीच्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सौ. शर्वरीताई कांबळे यांच्या पुढाकाराने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भोसले साहेब तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ. शर्वरी कांबळे यांनी आपल्या भाषणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी पोलीस बांधवांनी प्रत्येक महिलेच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहून तिचे रक्षण करावे, असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये माजी प्रदेश उपाध्यक्षा सौ. कल्पनाताई दास्ताने, रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ. स्नेहाताई गोगटे, कर्जत तालुका चिटणीस वर्षाताई सुर्वे, तालुका उपाध्यक्षा सौ. रजनीताई गायकवाड, तालुका सरचिटणीस सौ. राधा बहुतुले, शहर उपाध्यक्षा सौ. मनीषाताई अथणीकर, सौ. धनश्री जोशी, सौ. सुमनताई यादव, सौ. स्मिताताई औरंगाबादकर तसेच सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले असून, हा उपक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home