Thursday, July 31, 2025

खोपोलीकरांचे 70 लाख रुपये परत करा !

 


* मुख्याधिकारी यांच्याविरोधात 'आप' आक्रमक

* टाटा पॉवरची परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम

* उच्च न्यायालयाचा खोपोली नगर परिषदेला दणका

* अनाधिकृत बांधकामाला दिली स्थगिती

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये आपल्या खिशातून परत करावे अथवा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर मैदानावरून टाटा पावर कंपनी व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्ट असलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी जात असून नगर परिषदेने सदर बांधकाम करण्याकरीता कोणतीही परवानगी घेतली नाही. टाटा पावर कंपनीतर्फे नगर परिषदेला सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

नगर परिषदेने सदर बांधकाम करण्यापूर्वी टाटा पावर कंपनीची व मध्य रेल्वेची परवानगी घेणे अनिवार्य होते, परंतु तसे न केल्यामुळे नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये वाया गेले आहे. तरी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून 70 लाख रुपये परत करावे अथवा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

उच्च न्यायालयाने खोपोली नगर परिषदेला दणका दिला असून सदर कामावर स्थगिती लावली आहे. मुख्याधिकारी यांनी केलेले बांधकाम हे अनियमित असून अनधिकृत आहे व त्यांनी सदर कामाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केली.


आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व तेथे सुद्धा न्याय न मिळाल्यास आझाद मैदानावर आंदोलन करू, असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी सांगितले. 


या आंदोलनात आम आदमी पार्टी खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी, प्रभाग क्रमांक पाच अध्यक्ष भगवान पवार, सुमित नांगरे, राम पवार, जितेश सुतार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

अभिजीत दरेकर यांची 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन'च्या रायगड प्रभारीपदी नियुक्ती !

 


 खालापुर/सुधीर देशमुख:- बेधडक वृत्तपत्रविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, अत्यंत परखड आणि बिनधास्त लिखाणासाठी ओळखले जाणारे ‘दैनिक बेधडक महाराष्ट्र’ चे संपादक अभिजीत नारायण दरेकर यांनी आता सामाजिक लढ्याचे एक नवे शिखर गाठले आहे.

त्यांची "मानवी हक्क संरक्षण फेडरेशन"च्या रायगड जिल्हा प्रभारी म्हणून भव्य आणि सन्माननीय नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आली. 

गरीब-शोषित जनतेसाठी लढणारे आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार अशी त्यांची ठसठशीत ओळख आहे.

नियुक्तीप्रसंगी डॉ. मुनीर तांबोळी म्हणाले, “मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी आम्हाला अशाच जागृत व लढवय्या कार्यकर्त्यांची गरज आहे. श्री. अभिजीत दरेकर हे पत्रकारितेतून आणि कार्यातून समाजाचे भले घडवतात. त्यांची ही नेमणूक रायगड जिल्ह्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल.”

Tuesday, July 29, 2025

अनोखा संकल्प अनोखी वचनपूर्ती,रुक्मिणी फाउंडेशनचा उपक्रम.

 


 खालापुर/सुधीर देशमुख:- अनेकजण आपल्या आयुष्यात संकल्प करतात तर अनेकजण समाजाला आश्वासन देत असतात. मात्र ते पूर्णतःवस नेण्याची जबाबदारी त्यांना पेलवत नसल्याने ते आपले आश्वासन अर्धवट सोडतात आणि त्यातूनच जनतेची भ्रमनिराशा होते.मात्र रुक्मिणी फाउंडेशनने जनतेला दिलेला शब्द पाळत आपण दिलेले आश्वासन पूर्णतःवास नेण्याकडचे पहिले पाऊल आज टाकले आहे.खालापूर तालुक्यातील निसर्गाच्या सांनिध्यात वसलेले होनाड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवळी गोहे हे गाव.या गावातील नागरिक अनेक समाजपयोगी कार्यक्रम वर्षभर राबवीत असतात.त्यांना साथ देत गावातील तरुणवर्ग दरवर्षी एकता चषकाचे आयोजन करीत असते.गावातील तरुनांची एकता या सामन्यातून सर्वांना दिसत आली आहे.याच सामन्या दरम्यान संपूर्ण सामन्यात जेव्हडे शटकार खेळाडू मारतील तेव्हडी झाडे रुक्मिणी फाउंडेशनकडून लावण्यात येतील असे आश्वासन रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष राज रमेश पाटील यांनी उपस्थिताना दिले होते.याच आश्वासनाची वचनपूर्ती करीत होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील आणि वनविभाग अधिकारी भगवान दळवी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा पहिला टप्पा पूर्ण करीत वृक्षरोपण केले.यावेळी वृक्षरोपण करताना खोदलेला खड्डा आणि रोपाची विधिवत पूजा होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करून शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्षरोपण केले.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील,वर्षा पाटील,आशा पाटील,पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करीत ही रोप वाढविण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्तेही वृक्षरोपण करण्यात आले.अध्यक्ष राज पाटील यांच्या कुटुंबियांनीही या उपक्रमात सहभाग घेत वृक्षरोपण केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,रुक्मिणी फाउंडेशनचे भरभरून कौतुक करीत वृक्षरोपण ही काळाची गरज बनली आहे.


यामुळे जनतेला शुद्ध हवा मिळणार आहे आणि आरोग्य चांगळे राहणार आहे.त्यामुळे रुक्मिणी फाउंडेशनचे कार्य पाहत विविध संस्थानीही रुक्मिणी फाउंडेशनचा आदर्श घेत वृक्षरोपण सारख्या समाजपयोगी कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे असे वक्तव्य केले.तर उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांनी,राज पाटील हा उच्चाशिक्षित तरुण आहे.तो फक्त शिक्षण आणि नोकरी मध्ये अडकून नराहता अनाथ मुळे किंवा वृद्धाश्रमातील वृद्धाकरिता नेहमीच काहीनाकाही करत असतो.हे सर्व करताना क्रिकेट सारख्या सामन्यामध्ये अनेकजण आश्वासन देत असतात मात्र पूर्ण कोण करीत नाही असे असताना राज पाटील यांनी दिलेला शब्द पालीत रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातूम चिंचवळी गोहे गावाला हरित क्रांती घडविण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे हे अभिमानास्पद आहे असे वक्तव्य केले.

त्याचप्रमाणे चिंचवळी गोहे गावाचे पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी आपले विचार मांडताना,रुक्मिणी फाउंडेशनने दिलेला शब्द पालीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नुसते वृक्षरोपण केले नाही तर त्या रोपांना वटवृक्षापर्यंत नेण्याची जबाबदारीही घेतली आहे.ही उल्लेखनीय बाब आहे.यामुळे चिंचवळी गोहे गावात हरितक्रांती घडायला वेळ नाही लागणार आणि अध्यक्ष राज पाटील यांचे कार्य पाहून अनेक तरुण प्रोत्साहित होऊन भविष्यात अशी अनेक समाजपयोगी उपक्रमे राबवतील असे विचार मांडले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील,संदीप पाटील,उमेश पाटील,पांडुरंग पाटील,विजय पाटील, बँक व्यवस्थापक सोहम फराट,वनविभागाचे अधिकारी,होनाड ग्रामपंचायतीचे कर्मचारी,राज पाटील यांचे कुटुंबीय आणि चिंचवळी गोहे गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

आरपीआय (आठवले) रायगडमध्ये नवा जोश / दमदार नियुक्त्या - तुषार तानाजी कांबळे

 



खोपोली /प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कोकण प्रांताच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेत मा. राहुल गौतम सोनावणे साहेब यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुख तर मा. विजय शंकर गायकवाड साहेब यांची पनवेल विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रमिक ब्रिगेड तुषार तानाजी कांबळे यांनी यावेळी सांगितले –

“राहुल सोनावणे साहेब आणि विजय गायकवाड साहेब हे केवळ नावापुरते नेते नाहीत; त्यांच्या मागे वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष, सेवा आणि समाजासाठीची निष्ठा आहे. त्यांच्या कामगिरीची साक्ष लोकांनी अनेकदा दिली आहे, आणि म्हणूनच या जबाबदाऱ्यांसाठी ते योग्य ठरतात.”


 आजवरचे सोनावणे साहेबांचे कार्य व अनुभव

रायगड जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ची तळागाळापर्यंत पोहोचवलेली संघटनात्मक मोहीम.

शेतकरी, कष्टकरी व वंचित समाजाच्या हक्कासाठी राबवलेली सातत्यपूर्ण चळवळ.

शैक्षणिक मदत शिबिरे, आरोग्य तपासणी मोहीमा आणि सामाजिक भल्यासाठी घेतलेली पुढाकार.

पक्षवाढीसाठी युवकांना एकत्र आणत युवा संघटनात्मक नेतृत्वाची पायाभरणी.

यापूर्वी तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना मिळवलेला भक्कम संघटनात्मक अनुभव – याच अनुभवाचा फायदा आता जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून होणार आहे.

 आजवरचे गायकवाड साहेबांचे कार्य व अनुभव

पनवेल विधानसभा क्षेत्रात रिपब्लिकन पार्टीचा विचार प्रत्येक घरापर्यंत नेणारी जबरदस्त संघटन मोहीम.

स्थानिक प्रश्नांवर – पाणी, रस्ता, शिक्षण – यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा.

समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने, निवेदने व लोकसंपर्क मोहिमा.

सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ देऊन पनवेलमध्ये पक्षाची ठसा उमटवला.

पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्यकाळातला समृद्ध अनुभव – जो आता विधानसभा अध्यक्ष पदाला नवी दिशा देणार आहे.

   या नेत्यांच्या संघर्षातून आणि सिद्ध कार्यातूनच त्यांची नवी नियुक्ती झाली असून, रायगड आणि पनवेलमध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा झेंडा आणखी बुलंद होणार आहे.


Sunday, July 27, 2025

रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशी मधे शिक्षण घेतलेला विद्यार्थी खालापुर तालुक्यात प्रथम तर जिल्हात चतुर्थ क्रमांक

 


खालापुर /सुधीर देशमुख :-रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशी केंद्र वावोशी येथील इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी कुमार आर्य अमर पापळ याने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 84.56 टक्के गुण प्राप्त करून तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हा गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक प्राप्त करत शाळेचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उज्वल केले .डोंगराळ भाग व शहरापासुन लांब अश्या दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेतील शीक्षण व शीक्षकानी घेतलेलि मेहनत व विद्यार्थि ची गुणवत्ता ह्या जोरावर स्पर्धा परीक्षेत ह्या मुलाने यश संपादित केले त्याचे सर्व ठिकाणी विभागात अभिनंदन केले जात आहे.

यासोबतच सन 2024 /25 रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत 93.75 टक्के गुण पटकावून जवाहर नवोदय विद्यालय निजामपुर रायगड येथे प्रवेश मिळवला.




2024 /25 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत खालापूर सेंटर मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत 98 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आणि गणित प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावर रौप्य पदक प्राप्त केले .

सन2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत देखील पास होऊन प्रवेश प्रक्रियेस तो पात्र झाला. एकाच वर्षात या सर्व परीक्षा एकाच वर्षात देऊन सर्व परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादित केले.यासाठी तळाशी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता पांडुरंग आखाडे आणि सहाय्यक शिक्षिका अर्चना बाळासो घाटे यांनी मार्गदर्शन केले आणि विशेष परिश्रम घेतले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चौक येथे रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर....

 


खालापूर/दिपक जगताप :- दरवर्षी शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात.शिवसेना पक्षाच्या ध्येयधोरणानुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उद्देशाने या वर्षी चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल विचारे यांच्या संकल्पनेतून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेऊन चौक विभागाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे दृतगती महामार्ग,मुंबई पुणे जुना महामार्ग आणि अलिबाग पुणे महामार्ग असे तीन महत्वाचे महामार्ग जातात.या महामार्गांवर सतत वाहनांची गर्दी असते.अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असते तसेच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असतात त्यासाठीही रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते या रक्ताचा पुरवठा व्हावा आणि आपल्या राज्याचे लाडके शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा व्हावा यादृष्टीकोनातून शिवसेना चौक जिल्हा परिषद विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ओम साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.बदलापूर येथीलमाया ब्लड सेंटर रक्तपेढीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अनेक रक्ताच्या बॅग संकलित करण्यात आल्या. 



तसेच यावेळी इ सी जी, शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर, युरिन टेस्ट आदी आरोग्यावर तपासणी करण्यात आली संपूर्ण राज्यात आपले. ही तपासणी मोफत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना पक्षाचे आभार मानले. यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपसभापती श्यामभाई साळवी, युवा सेना तालुका प्रमुख निखिल मालुसरे, विभाग प्रमुख तुळशीराम पाटील, गोरख रसाळ, सरपंच सुहास कदम, मनोहर देशमुख, सुहास देशपांडे, अजिंक्य चौधरी, अशोक चौधरी, शशिकांत मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, रामदास काईनकर, प्रकाश जाधव, कुमार बोराडे, विष्णू खैर आदी आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

सहज सेवा फाऊंडेशन द्वारा महिलांसाठी अनोखे श्रावणी हळदी कुंकू व पातळगंगा नदीपूजन व आरती उत्साहात साजरी..

 


खोपोली विभागात प्रथमच दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा एकत्रित वाढदिवस साजरा तसेच लकी ड्रॉ द्वारे विजेत्या महिलेस पैठणी साडी बक्षीस..


खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली हद्दीतून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जन जागृती म्हणुन सहज सेवा फाउंडेशन द्वारा नदी पुजन व आरती साजरी केली जाते. नागरिकांनी या उपक्रमास भरभरून दाद देण्यास सुरुवात केली आहे.


या नदी पूजन व आरती निमित्ताने यावर्षी महिलांसाठी सामूहिक श्रावणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले.गगनगिरी आश्रम,खोपोली येथे शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी आगळावेगळा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच पर्यावरणाचे भान ठेवून महिलांना वाण स्वरूपात प्रत्येकी सीड बॉल व कापडी पिशवी भेट देण्यात आली.

ऑगस्ट 2025 पासून खोपोली नगरपरिषद विभागातील महिलांचा वाढदिवस प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी नदीपूजनाच्या वेळी सामूहिकपणे साजरा करण्यात येणार असून त्यावेळी एक लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे.सदर लकी ड्रॉ काढण्यासाठी ज्या महिलांचा वाढदिवस आहे,त्यांनी अथवा त्यांच्या परिचयातील व्यक्तीने वाढदिवसाची माहिती असलेला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे, अशा नवीन महिला उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

या उपक्रमासाठी आनंद शाळा, खोपोली,प. पु. गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली,आर. टी. झवेरी ज्वेलर्स खोपोली,सद्गुरू ग्राफिक्स, खोपोली यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,महिला अध्यक्षा निलम पाटील,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,सह सचिव नम्रता परदेशी,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,सल्लागार नरेंद्र हर्डीकर,प्रकल्प प्रमुख सीमा त्रिपाठी,कल्याणी साखरे,वेदा साखरे,हितेश राठोड सोबत जीनी सॅम्युअल, सुवर्णा मोरे, संदीप दुबे,अंजली शर्मा, संगीता शुक्ला, सुनिता चव्हाण,दमयंती कोळी,मुस्कान सय्यद,निलम समेळ,रंजन चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

सहज सेवा फाउंडेशनच्या महिला विभागाद्वारे वाढदिवस असणाऱ्या महिलांचा लकी ड्रॉ द्वारे नदी किनारी नदी आरती व पुजन हा उपक्रम समाजासाठी वेगळी दिशा देणारा ठरत आहे. महिलांसाठी प्रभावी व प्रेरणादायी उपक्रम राबविणाऱ्या सर्व महिला पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत असे गौरवोद्गार जीनी सॅम्युअल यांनी व्यक्त केले.

Friday, July 25, 2025

विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी मार्फत वितरण करण्यात आले.

 


 खालापुर/सुधीर देशमुख:- दिनांक 25 जुलै 2025 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : डोणवत येथे इयत्ता पहिली ते चौथी मधील सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी मार्फत वितरण करण्यात आल्या या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीचे सरपंच श्री अविनाश आमले यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले, ग्रामपंचायत आपल्या परीने जे काही जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी करता येईल ते करणार परंतु त्या बदल्यात ऊत्तम गुणवत्ता व प्रगती हवी ही अपेक्षा मी करतो असे म्हणुन त्यांनी व ईतर सदस्यांनी शाळेला काहि गोष्टींची गरज आहेका ह्याची विचारपुस केली.

 ह्या प्रसंगी उपसरपंच श्री.नितीन कदम, श्री विश्वास पाटील- शिक्षणप्रेमी, श्री रितेश मोरे - सदस्य, सौ. अरुणा सावंत - सदस्या, श्री. प्रशांत कदम - ग्रामविकास अधिकारी , सौ सुजाता सुधीर देशमुख अध्यक्ष - शाळा व्यवस्थापन समिती डोणवत, सौ सोनाली विनोद गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, श्री सुधीर देशमुख - पत्रकार, ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आदींच्या उपस्थितीत स्वाध्याय पुस्तिका वाटपाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयीचे महत्व सांगितले.



खोपोलीतील ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांना पत्नी शोक

 


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सागर खोपोली कार्यालय प्रमुख जयवंत माडपे यांच्या पत्नी श्रीमती वंदना जयवंत माडपे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर लौजी अंत्यसंस्कार येथे करण्यात आले.

             वंदना माडपे या मूळच्या लौजी गावातील असून विवाहानंतर काही काळ मुंबईत वास्तव्य केल्यानंतर त्या पुन्हा लौजी येथे स्थायिक झाल्या होत्या.अत्यंत साधी, कष्टाळू आणि जिद्दी स्वभावाच्या वंदना माडपे यांनी घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचे शिक्षण याचा समतोल साधत त्यांनी कुटुंब उभे केले.

         त्यांच्या पश्चात पती जयवंत माडपे, मुलगी निशा, मोठा मुलगा विनायक माडपे, छोटा मुलगा प्रसाद माडपे, तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांना अनेक नातेवाईक, मित्रमंडळी आणि पत्रकारितेतील सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने एक सर्वसामान्य पण जिद्दी महिला व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

युवा उद्योजिका सागरिका जांभळे विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित...

 उल्लेखनीय सामाजिक कार्य व जागतिक विक्रम स्थापित करण्यासाठी सज्ज.


चौक/प्रतिनिधी :- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभाग यांच्या 2025-27 पदग्रहण समारंभात गुरुवार दिनांक 24ऑगस्ट 2025 रोजी मँगो वर्ल्ड रिसॉर्ट,आसरे गाव,चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल तसेच इतिहास घडविणारा रायगड जिल्ह्यातील पहिल्या व्यावसायिक मेगा एक्स्पो आयोजनाबद्दल प्रमुख पाहुणे के.आर.ओकार,ऍड.मिलिंद धडपले,शास्त्रज्ञ् धर्मराज पाटील,उद्योजक आशपाक लोगडे यांच्या हस्ते व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंटचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष गौरव पुरस्काराने कु.सागरीका जांभळे हिला सन्मानित करण्यात आले.

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभागाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले रायगड जिल्हाध्यक्ष किशोर शेळके व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या हस्ते सुलभा शरद पाटील,डी. एस गुरव, असलम लोगडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सागरीका योगिता शेखर जांभळे या लिओ क्लब ऑफ खारघरच्या अध्यक्षा असून सहज सेवा फाउंडेशनच्या युवा अध्यक्ष तसेच रायगड बिजनेस असोसिएशनच्या संचालिका आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 पासून सुरु असलेल्या कन्या रत्न सन्मान कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून समाजाप्रती हे आदर्श काम 1 एप्रिल 2025 रोजी अपघात होऊन उपचार सुरु असताना देखील सुरु केलेला कन्यारत्न सन्मान आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरु असून हा सातत्यपूर्ण उपक्रम समाजाला वेगळी दिशा दाखवणारा ठरत आहे. समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

लहानपणापासून रेस्क्यू कार्यात सुध्दा कार्यरत असून समाजाप्रती केलेले उल्लेखनीय कार्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कॉलेज जीवनातच शिकत असतानाच सामाजिक कार्य सांभाळताना वयाच्या अगदी 18 व्या वर्षांपासून व्यवसायात देखील पदार्पण केले असून रायगड बिझनेस एक्स्पो 2025 या प्रेरणादायी उपक्रमाची संकल्पना आणि विशेषतः १९ वर्षांच्या तरुणीने अपघातानंतरही घेतलेली ही जबाबदारी निश्चितच महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक नवा आत्मविश्वास आणि दिशा देणारी आहे.

उद्योग, पर्यटन, महिला सक्षमीकरण व युवकांचे नेतृत्व यांचा संगम असलेले हे प्रदर्शन रायगडच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट भालेराव तर आभार प्रदर्शन अक्षदा म्हात्रे यांनी केले.यावेळी रायगड बिझनेस एक्स्पो 2025 बद्दल आश्पाक लोगडे व दिनेश राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशी आशा असलेल्या दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2025 रोजी खोपोली येथे पार पडत असलेला रायगड बिजनेस एक्स्पो 2025 अभिनव उपक्रम हा नक्कीच अभिमानाची बाब आहे.

आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी मिळणाऱ्या अलौकिक प्रेरणेस व गरुडभरारीचा गौरव करताना आनंद वाटत असल्याची भावना यावेळी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभाग अध्यक्ष किशोर शेळके यांनी व्यक्त केली.

Thursday, July 24, 2025

रायगड भूषण तथा संपादक डॉक्टर रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या पत्रकारांचा व व्यक्तींचा सन्मान !

 


खालापूर /प्रतिनिधी :-रायगड भूषण तथा पत्रकार,संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांचे कल्पक नेतृत्व नेहमीच समाजाला दिशा दर्शक ठरत आहेत.रायगड भूषण तथा संपादक डॉक्टर रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर येथे रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळविलेले पत्रकार फिरोज पिंजारी, पत्रकार खलील सुर्वे, पत्रकार सुधीर गोविंद माने सह पत्रकारांचा तसेच व्यक्तींचा सन्मान करीत डॉ. सुनिल पाटील माजी.नगराध्यक्ष व गट नेते खोपोली नगरपरिषद यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . 


पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानपत्र वाटप करणे, हा एक चांगला उपक्रम आहे. यामुळे पत्रकारांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. पत्रकार समाजासाठी महत्त्वाचे काम करतात. त्यांचे कार्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे, सत्य उघड करण्याचे आणि समाजाला जागरूक करण्याचे असते. त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. सन्मानपत्र देऊन पत्रकारांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा कार्यक्रमांमुळे पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होते. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी छोटे असो की मोठे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. पत्रकारांचे कार्य लोकशाहीसाठी आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा गौरव करणे आहे असे न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश - अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वार्ताचे संपादक पत्रकार सुधीर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वसामान्य कुटूंबात जन्मल्यानंतर स्वत:च्या व कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी पडेल ते कष्ट उपसताना विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व पत्रकारितेत ही यशस्वी होवून सारी क्षितीजे पार करून नावलौकीक प्राप्त करत कायम समाजासाठी झटत असतात म्हणूनच या कुशल नेतृत्वाला शहर व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिक रायगड भूषण तथा पत्रकार संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांचेकडे पाहत आहेत. आज पर्यंत केलेली समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे परमेश्‍वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्तमात्र असतो. परमेश्‍वराने मला जे काही देत आहे त्यामागे त्याची काही योजना असावी त्यामुळेच माझे तन, मन आणि धन मी माझ्या समाजासाठी वापर करत असतो असे जाधव ते नेहमी म्हणतात.

शाहू ,फुले, आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून.

मनानं दिलदार...

बोलणं दमदार...

वागणं जबाबदार...

कामात खबरदार.. 

पत्रकारिता छानदार...

असं सर्वसमावेशक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व रविंद्र जाधव.

पत्रकारिता धंदा नसून एक धारणा मानून एक सक्षम पत्रकार म्हणूून आपली ओळख सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राची भूमी आपल्या साप्ताहिक मध्ये जोरकसपणे लेखणी चालवली.

समाजिक व्यंगावर, आणि अन्याय-अत्याचावर वाभाडे ओढण्याचे निर्भिडपणे काम.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत झालेले जाधव. आपले अमूल्य विचार ते आपल्या वंचित समाजापर्यंत. वैचारिक प्रबोधन करून जागृती. शैक्षणिक,सामाजिक, वैज्ञानिक उपक्रम राबवतात.

घरातील सामाजिक कार्याचा वसा- वारसा नेटाने चालविण्याचा काम ते आज या साप्ताहिक मधून अविरतपणे करत आहे 

सालाबाद प्रमाणे त्यांच्या वाढदिवशी निमित्ताने ते स्तुत्य- प्रशंसनीय उपक्रम.

      विविध क्षेत्रात कार्यरत असणारा आपला बहुजन समाज. त्यांची दख्खल सहसा घेतली जात नाही. म्हणून त्यांच्या रास्त गुणांना आणि कार्य- कर्तुत्वाचीची नोंद . त्यांना त्यांच्या कामात प्रेरणा- उत्तेजना मिळावी या एकमेव शुध्द हेतुने कार्यक्रमाचे आयोजन करून भरगच्च असा सत्कार सोहळा आयोजित.

तुमची लेखणी पुढेही अशीच तलपती तलवार बनो.

आर्युमान भवः

तुझ्या लेखणीला चिरंतन धार लाभो...|

आणि सत्याच्या रणात तू असाच अग्रस्थानी राहो...|

हिच सदिच्छा...

जय भिम, जय संविधान बोलत बी एन पाटील मुख्याध्यापक शारदा विद्यामंदिर कासू पेण यांनी पत्रकार रवींद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कविता गायली.

यावेळी सुनिल पाटील मा नगराध्यक्ष व गट नेते खोपोली नगरपरिषद,पत्रकार सुधीर गोविंद माने महाराष्ट्र - अध्यक्ष( न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन), पत्रकार खलील सुर्वे, राष्ट्रीय - अध्यक्ष ( न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन) ॲड रमेश जनार्दन पाटील प्रभारी सरपंच गोरठण ग्रामपंचायत,बी एन पाटील मुख्याध्यापक शारदा विद्यामंदिर कासू पेण,ॲड राजदत्त झरकर , ॲड रिया पाटील, अश्विन मेश्राम मॅनेजर बॅक ऑफ इंडिया खालापूर,वर्षा तुषार जाधव मा शहराध्यक्षा खानप., सचिन कडू मुख्याध्यापक,बी सी पाटील मॅनेजर, यशवंत मुसळे मा उपसरपंच उंबरे ग्रामपंचायत, रविंद्र देशमुख सर, ॲड सोनावणे, अनिल जाधव शाखा अभियंता पं स खालापूर ,ममता चौधरी,मा नगरसेविका खानप ,सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग जाधव,अशोक मोरे,बाळू गवळी, पत्रकार विविध क्षेत्रातील कार्यकर्ते गावातील कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, July 23, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष श्री संतोष बैलमारे यांची जोरदार तयारी

 


खालापूर /सुधिर देशमुख :- विधानसभेच्या निवडणुकी नंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सर्व साधारण सभा खालापूर येथील यू के रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी पुढील होणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पालिका,नगर पंचायत,नगर परिषद,यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे 100% ताकतीने काम करतील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरला तालुक्यात राहील अशी ग्वाही दिली.याप्रसंगी सुधाकर घारे यांनी तालुका प्रमुख संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.संतोष बैलमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बद्दल असलेल्या निष्ठेने खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्याची एकता मजबूत केली आहे.ह्या सभे प्रसंगी नविन पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र दिले व जुने पदाधिकारी कायम ठेवले आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, जुना व नविन वाद निर्माण न होता पुढे पक्षाचे ध्येय धोरणे कशी साध्य करता येतील ह्या निमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


खालापूर तालुक्यातील कंपनीच्या कामगारांचे प्रश्न हे वेळोवेळी पक्षा मार्फत मध्यस्थीने सोडविण्याचे व कामगारांच्या घरातील चुली कायम चालू राहण्यासाठी व कंपनी पण चालू राहिली पाहिजे व कामगार पण जगला पाहिजे.ह्या तत्वावर माननीय रायगड चे खासदार सुनील तटकरे,माननीय आमदार अदिती ताई तटकरे व कर्जत खालापूरचे जनतेचे सिलेक्टेड ( आमदार ) श्री सुधाकर घारे पक्षासोबत योग्य पावले उचलत आजच्या घडीला बंद पडणाऱ्या कंपन्या चालू करून कामगारांना न्याय मिळून दिला आहे. कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुधाकर घारे हे कधीही कंपनीच्या बरोबर सेट होणार नाही. नको चहा नको पॅकेट पण कामगारांवर अन्याय झाला तर त्या कंपनीच्या गेटवर मी व माझे पदाधिकारी आंदोलन करतील. जगा व जगू द्या या तत्वावर खालापूर मधील कंपनी मॅनेजमेंट व खालापूर इंडस्ट्रीला इशारा दिला आहे.


संतोष बैलमारे यांनी खालापूर मधील अनेक समस्यांपैकी प्रदूषणावर पण त्यांनी आपली तोफ डागली.पाताळ गंगेचे पाणी दूषित होत आहे त्यावर पुढील भविष्यात ठोस निर्णय घेऊन आंदोलन उभे करण्यात येईल.खालापूर तालुक्यात गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय व बुथ मीटिंग,गाव मीटिंग घेऊन योग्य नियोजन करून खालापूर तालुक्यात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढे 21 जुलै ते 31 जुलै 2025 जन विश्वास सप्ताह राबून त्या मार्फत वृक्षा रोपण,आरोग्य शिबिर,महिला सक्षमीकारणातून स्वयं रोजगार,महिला प्रशिक्षण व पावसाळ्यात कार्यकर्त्यांना पक्षाकडून छत्री भेट देऊन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव व घड्याळ हा चिन्ह घराघरात पोहोचवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षश्री सुधाकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष श्रीअशोक भोपतराव,प्रदेश प्रवक्ते, श्रीभरत भगत,जिल्हा सरचिटणीस श्री शरद कदम,महिला जिल्हाध्यक्ष सौ,उमा मुंडे,युवकचे जिल्हाध्यक्ष श्री अंकित साखरे,युवक अध्यक्ष श्री कुमार दिसले,श्री सचिन कर्णुक,खालापुर तालुका कार्याध्यक्ष श्री भूषण पाटील,विधानसभा अध्यक्षा सौ,सुरेखा ताई खेडकर,तालुका अध्यक्ष श्री संतोष बैलमारे, यांच्या सह खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीप अमावास्या - अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण

 


   खालापुर/सुधीर देशमुख :- अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला 'गटारी अमावास्या' असे म्हणण्याची कुप्रथा वाढ़ीस लागली आहे. यातून हिंदु धर्माची अपकीर्ती होत आहे. मुळात 'गटारी' असा काही सण आपल्या धर्मात नाही. हिंदु धर्माची अपकीर्ती करणाऱ्यांकडून या अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहार यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे उदात्तीकरण न करता या दीप अमावास्येला शास्त्रानुसार दीपपूजन करूया. या लेखात दीप अमावास्येचे आध्यात्मिक महत्त्व आणि दीपपूजनामागील शास्त्र समजून घेऊया.

दीपपूजन करण्यामागील शास्त्र - ‘दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.

दीपान्वित अमावास्या - आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हणतात. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ आणि एकत्रित करून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. पूजेत पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात आणि पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात. हे पूजन केल्याने ‘आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते’, अशी फलश्रुती आहे.’ (संदर्भ : भक्तिकोश, चतुर्थ खंड, पृ. 877)

 दीप अमावास्या शास्त्रानुसार साजरी करून आपली संस्कृती जपूया ! - या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ! त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप अमावास्या आपण सर्वांनी शास्त्रानुसार साजरी करूया आणि आपली संस्कृती जपूया.

आवाहन ! - आषाढ अमावास्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण मास चालू होत असल्याने आणि हा पवित्र मास मानला जात असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहार वर्ज्य करतात. काही जणांना पुढे महिनाभर, तर काही जणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहार करायला मिळणार नसल्यामुळे या अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहार यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात येते. हिंदूंनो ! वेळीच सावध व्हा, उद्या हे धर्मद्रोही म्हणतील, 'धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो. धर्म सांगतो की, या दिवशी भरपूर दारू प्यावी.' मुळातच 'गटारी' असा काही सण आपल्या धर्मात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून या सणाला जे विकृत वळण लागले आहे, ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून आपल्या सण आणि संस्कृती यांचा मान राखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊया.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खालापुरात रक्तदान शिबीर.

 


खालापूर/दिपक जगताप :- दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात.या वर्षी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून लाडक्या देवाभाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या.खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे दृतगती महामार्ग,मुंबई पुणे जुना महामार्ग आणि अलिबाग पुणे महामार्ग असे तीन महत्वाचे महामार्ग जातात.या महामार्गांवर सतत वाहनांची गर्दी असते.अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असते तसेच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असतात त्यासाठीही रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते या रक्ताचा पुरवठा व्हावा आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा व्हावा यादृष्टीकोनातून आ प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या उपस्थितीत खिरकिंडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.बदलापूर येथील रक्तपेढीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अनेक रक्ताच्या बॅग संकलित करण्यात आल्या.या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी हजेरी लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांमध्ये आवडीचे नेते असल्याचे दिसत होते.संपूर्ण राज्यात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशा वेळी हा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्यासाठी राज्यात सर्वीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.खालापूर तालुक्यात आम्ही खिरकिंडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.यातून मिळणारे रक्त संकलित करून अनेक रुग्णांना मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने आजचा जन्मदिन साजरा होणार आहे असे वक्तव्य तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी केले.यावेळी उप जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे,युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील,तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील,रक्तदान शिबीर प्रमुख हरिभाऊ जाधव,खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप,अतुल मालकर,जयेश पाटील,निकेश पाटील यांसह मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आम आदमी पार्टी खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार

 


नवीन सदस्यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला मिळाली ताकद 


खोपोली /खलील सुर्वे :- आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये उत्कृष्ट असे काम करून आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका लढणार आहे त्या अनुषंगाने आज खोपोली शिळफाटा येथील हनुमान मंदिर सभागृहामध्ये शहरातील तरुणांनी आम आदमी पार्टी मध्ये पक्षप्रवेश केला. 


परमेश्वर कट्टीमनी यांना खोपोली शहर उपाध्यक्ष, महेश कांबळे यांना कामगार आघाडी अध्यक्ष, दिलावर शेख यांना अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष, सिमरन काजळे यांना महिला आघाडी अध्यक्ष, शहबाज अन्सारी यांना मीडिया आघाडी अध्यक्ष तर गीता कर्णुक यांना महिला आघाडी उपाध्यक्ष अशाप्रकारे खोपोली शहरातील विविध पदांच्या नियुक्त्या आम आदमी पार्टी खोपोली शहराचे अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्यातर्फे करण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर 20 नवीन सदस्यांनी आम आदमी पार्टी मध्ये स्वेच्छेने पक्ष प्रवेश केला.

आज खोपोली मध्ये आम आदमी पार्टीचे होणारे काम पाहून युवावर्ग उत्साहीत झालेला असून तो स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश करत आहे. आम्ही येणाऱ्या काळात खोपोली मध्ये उत्कृष्ट अशा शाळा, उत्कृष्ट हॉस्पिटल, कचरामुक्त खोपोली, अशा आमच्या संकल्पना आहेत व ते आम्ही साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये आमच्याबरोबर यावे व आमच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण मिळून काम करू व खोपोलीला नक्कीच एक उत्कृष्ट असे शहर बनवू असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमा करिता आम आदमी पार्टी रायगड जिल्हा संघटन सचिव श्री चिमाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, प्रभाग क्रमांक पाचचे अध्यक्ष भगवान पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे यांनी केले.

Tuesday, July 22, 2025

Human Rights Protection Federation" भारत सरकार अंतर्गत इशिका शेलार यांची खालापूर तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती

 


 खालापुर / सुधीर देशमुख :- मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या खालापूर तालुका महिला विभागाच्या अध्यक्षपदी इशिका शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या स्वाक्षरीने, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.


इशिका शेलार यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदान, मानवी हक्कांविषयी असलेली संवेदनशीलता व त्यांचे संघटन कौशल्य या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. फेडरेशनच्या ध्येय-धोरणांना बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.


या निवडीबाबत बोलताना डॉ. तांबोळी म्हणाले, "खालापूर तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मानवी हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. इशिका शेलार यांचे नेतृत्व संस्थेसाठी निश्चितच मोलाचे ठरेल."

ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, यापुढे इशिका शेलार या खालापूर तालुक्यातील महिला विभागाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. फेडरेशनच्या कार्याचा विस्तार आणि लोकजागृतीसाठी त्या सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांच्या सौजन्याने करंबेळी ठाकूर वाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप ....

 


खालापुर / दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका यांच्या वतीने आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये खालापूर मंडळाकडून किरखिंडी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांनी सामजिक बांधिलकी जपत करंबेळी ठाकूर वाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप केले. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना भरत महाडिक यांच्या माध्यमातून रेनकोट, वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भरत महाडिक यांच्या माध्यमातून करंबेळी विभागात असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


यावेळी रविंद्र मोरे नितेश पाटील, आर के बाबले, प्रतिभा पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

खोपोली शिळफाटा येथे भर पावसात पोखरलेल्या डोंगराला व विद्युत खांबाला गोणीचा आसरा?

 


मोठी दुर्घटना झाल्यावर तहसीलदारांना जाग येणार का?
पंचनामा करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारीने काय पाहून परवानगी मिळण्यासाठी पंचनामा केला? पत्रकार राजेंद्र जाधवचा सवाल..

खोपोली/(प्रतिनिधी):- कर्जत - खालापूर तालुक्यात अवैध उत्खनन भराव मोठ्या प्रमाणात होत आहेत. श्रीमंत व्यावसायिकांनी एकरी -एकरी जमिनी खरीदी केलेल्या असून त्या जमिनीना सपाट मैदान करण्यासाठी व मोठमोठे बिल्डिंगचे टॉवर, शेड, पंप बांधण्यासाठी दगड,  मरूम मातीचा भराव टाकण्यात सुरुवात केले असल्याचे चित्र तालुक्यातील गांवा - गांवात, शहरात दिसून येत आहे. एकरीभर जमिनीत भराव करण्यासाठी तालुक्यात दगड, मुरूम,मातीला मोठी मागणी आहे. मात्र दगड,मरूम, माती,उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची रीतसर, परवानगी घेऊन रॉयटी भरावी लागते आणि नियमा नुसार उत्खनन करण्याचे सांगण्यात येते. एक ब्रास रॉयटीचे अंदाजे ६०० रुपये व शंभर ब्रास रॉयल्टी भरण्या साठी अंदाजे साठ ते सत्तर हाजार रुपये शासनाला भरावे लागतात.चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. पण हे नियम खालापूर तालुक्यात लागू नाहीत का ? असा प्रश्न झालेले उत्खनन पाहिल्यावर उपस्थित होत आहे.


खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथील हॉटेल ऋषीवन समोरील भरपावसात डोंगर पोखरण्यात आला.शफि मोहम्मद पठाण ह्या नावाने शंभर ब्रासची रॉयटी भरून भळा मोठा डोंगर पोखरून अनाधिकृत अवैध उत्खनन करण्यात आला.खोपोली मंडळ अधिकारी यांनी झालेल्या गौणखनीज उत्खननचा मोज माप घेऊन २९७ ब्रास मधून १००ब्रास वजा करून १९७ ब्रासचा पंचनामा करून ९लाख १२हाजार ६५२ रुपयांचा दंडाचा नोटीस दि. १६जून २०२५ रोजी संबंधित जमीन मालकाला बजावण्यात आला.या डोंगरावर उच्च दाबाचे अनेक विद्युत खांब व मोबाईलचा टावर आहे.या खांबाच्या बाजूचे मुरूम काढल्याने हे खांब पडण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.खालून डोंगराची हाजारो ब्रास मुरूम माती काढण्याने धो-धो बरसणाऱ्या पावसाने वरची माती सरकण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. ही माती खाली येऊ नये विजेचे खांब पडू नय यासाठी खांबला गोळ भरलेल्या गोणी व डोंगराच्या एका बाजूला गोणीचा थर लावण्यात आला आहे. त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला असणारे विद्युत खांबाळा व डोंगरला भरलेल्या गोणीचा आसरा मिळाला आहे.पण इतर ठिकाण्यातल्या भागाची माती उरतून खाली येण्यात सुरवात झाली आहे. ज्या ठिकाणी गौणखनीज उत्खनन होण्या आधी तलाठी,मंडळ अधिकारी जागेवर जाऊन जेगेची पाहणी करून पंचनामा करतात मात्र पंचनामा करतांना तलाठी, मंडल अधिकारी यांना जागेत व जागे लेगत गांव, वस्ती, दुकानें, घर, रस्ता,असणारे मोबाईल टॉवर , हाय टेन्शनचे टॉवर, विद्युत खांब दिसतच नाहीत का? डोळ्यावर पट्टी बांधून पंचनामे केले जातात का? ह्या डोंगराच्या सुरवाती पासून अंदाजे तीनशे ते चारशे मीटर लांब व चालीस ते पन्नास फूट उंच पर्येंत अंदाजे दोन ते तीन महिनेभरा पासून उत्खनन होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.


ह्या डोंगरावर अनधिकृत अवैद्य उत्खनन फक्त १९७ ब्रासच झाला का? ह्या डोंगरावर अनेक ठिकाणी विजेचे हाय टेन्शनचे टॉवर दिसून येतात.एका ठिकाणी हाय टेन्शनच्या टॉवरच्या खालची मुरूम माती सर्कळी असल्याचे चित्र दिसून येत आहे.हे हाय टेन्शनचे टॉवर मुसलधार पावसात दगड माती सोबत कोसळले आणि मोठी दुर्घटना घडी याला जबाबदार कोण राहणार? जागे मालक, उत्खनन करणारा भूमाफिया, की परवानगी देणारा महसूल विभाग? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.


 
खालापूर तालुक्यात इर्शालवाडीत झालेले भूस्खलन आणि त्यात दगवलेले भूमिपुत्र आज ही लोकांच्या डोळ्यासमोरून गेले नाहीत.तरी देखील महसूल विभागाला जाग आलेली नाही ? बे परवा होऊन डोळ्यांना पट्टी बांधून पाहणी करत न करत डोंगर गांव, वाडी वस्ती रस्त्यालगत पावसात डोंगर पोखरण्याची परवानगी दिल्या जात आहेत? महसूल विभागाच्या डोळ्या देखत नाम शून्य रॉयटी भरून भू माफियांकडून हाजारो ब्रासच्या रॉयटीवर लाखो, कोठ्या वधी रुपयांवर डल्ला मारत बेशिस्तपणे डोंगर पोखरून अनधिकृत अवैध उत्खनन करून नागरिकांचे जीव धोक्यात घळणाऱ्या भु माफियांवर ठोस कार्यवाही का केली जात नाही?मुख्यमंत्री,कोकण आयुक्त जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय येथे उत्खननाची लेखी तक्रार देऊन ही तक्रार दाराला तलाठी मंडळ अधिकारी महसूल सहाय्यक माहिती देण्यास टाळा टाळ का करतात ?आखिर डाळ मे क्या काळा हैं?ह्या डोंगरावर झालेल्या अनधिकृत अवैध गौण खनीज उत्खननचा जिल्ह्याच्या पत्रकारांसमोर इन कॅमेरा पंचनामा वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी करावा आणि कामात कसूर करणाऱ्या लोकसेवकांनवर निळंबणांची कारवाई करावी? तेसच हाय टेन्शनचा टावर कोसळून जीवित हानी झाल्यास दोषींनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा?अशी मंगणी पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी पत्रकारांना माहिती देतांना व्यक्त केली.

Monday, July 21, 2025

मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांस ग्रामसमृद्धी पुरस्कारांने सन्मानित

 


खालापुर /दिपक जगताप: - ग्रुप ग्रामपंचायत माजगाव मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या कारकिर्दित झालेल्या विकास कामाची दखल घेत त्यांस नालंदा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी पुरस्कार विद्याशिक्षण क्रांतीचा केंद्र्बिंदू असलेला एस.एम.जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे उपस्थित मान्यवर तथा नालंदा ऑर्गनायजेशनचे सर्वेसर्वा श्रीकांत जायभाय, यांच्या हस्ते सन्मापत्र,सन्मानचिन्ह देवून गौरविण्यांत आले. 

  मा.सरपंच यांनी २०१९ ते २०२२ या वर्षा मध्ये विविध विकास कामे करुन जनतेच्या मनामध्ये आपले घर निर्माण केले.ग्राम विकासाचे वचन दिले.आणि स्थानिक समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट विचारांची देवाणघेवाण केली. गावात असलेल्या समस्या विचारात घेत त्या मार्गी लावण्यांचे काम केले.विशेष म्हणजे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यांचे काम त्यांच्या कारकिर्दित पुर्ण केले.सरपंच पद हे राजकीय असले तरी सुद्धा या मध्ये समाजकारण करुन जनसामन्याचे प्रश्न मार्गी लावण्यांचे काम त्यांनी केले.यामुळे त्यांची दखल या संस्थेनी घेऊन त्यांस सन्मानित केले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कृषी सहसंचालक - श्रीपाद खळीकर,अभिनेता, लेखक, दिग्दर्शक - विनोद वणवे,त्याच बरोबर पनवेल ग्रामसेवक निवृती आंधळे,जनार्धन जाधव,जगदिश पिंगळे,अरुण जाधव,आत्माराम जाधव यावेळी पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरास्कार हा गावाचा सन्मान असून अनेकांनी त्यांच्या निवास स्थानी जावून शुभेच्छा दिल्या.

शिवसेना शिंदे गट यांचा कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा

 


रायगड जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षपदी दिलीप मणेर , कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुखपदी रोहित विचारे तर खालापूर शाखाप्रमुख पदी भालचंद्र भोसले यांची निवड....


खोपोली / प्रतिनिधी :- काल खोपोली येथे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करण्यासाठी व आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना नविन जबाबदारी देत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते पदनियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.


 खालापूर नगर पंचायत चे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मणेर यांची रायगड जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षपदी करण्यात आली असून आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी रोहित विचारे यांची कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खालापूर शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक भालचंद भोसले यांची खालापूर शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा रोशना मोडवे, खालापूर शहर अध्यक्ष पद्माकर पाटील, सभापती किशोर पवार , नगरसेविका सुप्रिया साळुंखे,युवा नेते हरेश मोडवे, अमित जगताप युवासेना शहर प्रमुख दिपक पाटील शहर संघटक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, July 20, 2025

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?



* लाईट, पाणी,गटार, रस्तासारख्या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित ?

* यशवंतनगरसह अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था ?

* संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या भावना, नगरपालिकेचे दुर्लक्ष..

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत येथील स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नगरपालिकेवर खराब रस्ता,गटार, लाईट, पाणीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यशवंत नगर मध्ये काही वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु त्या रस्त्याची यावर्षी अत्यंत दुर्दशा झालेली दिसत आहे. नागरिकांना या रस्त्यावर चालणे सुद्धा शक्य नाही रस्त्यावर चालतांना मुले कोसळतात लाईट,गटार,पाणी, अशा मूलभूत सुविधा पासून नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याचे संताप नागरिकांनी सांगत अशी अस्वस्था झाल्याचे चित्र दाखवत पत्रकारांना माहिती देताना सांगितले.यावर स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. खोपोली नगर परिषदेने यावर तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना सोयीस्कर रस्ता व अन्य सुविधा करून द्यावा अशी मागणी करीत येथील नागरिकांनी भावना व्यक्त करत रस्ता झाला नाही तर आंदोनक करू असा ईशारा देण्यात आला आहे..


खोपोली शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारसाठी चांगले टिकाव रस्ते खोदण्यात आले पावसाला सुरुवात होण्या आधी रस्ते नवीन होतील अशी आशा नागरिकांनी लावली होती.मात्र पावसाला सुरवात होताच रस्त्यांवर खड्डेच खड्ड्याचे चित्र दिसून येत आहेत. नक्की खोपोली शहरात विकास कुठे व कोणाचा होतो? प्रशासनाच्या डोळ्यादेखत ठेकेदार सुरक्षाचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम करतात तरी त्यांचे बिल कामे होण्या आधी अदा कसे केली जातात?बिल्डिंग होण्या आधी oc देण्यात येतात? 1 वर्षावरील जन्म मृत्यू दाखल्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली असतांना दाखले कोणाच्या आशीर्वादाने दिले गेले आहेत? शहरात नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा पासून नागरिकांना वंचित ठेऊन आंदोलन उपोषणाची वेळ निर्माण केली जात आहे? वरिष्ठ अधिकारी अशा बेर जबाबदार अधिकाऱ्यांची त्वरित बदली का करीत नाही? जनता जनार्दनांच्या सेवेसाठी व शहरातील जबाबदारी ने विकास कामे होण्यासाठी लोकसेवकांना शासना कडून सर्व सोयी सुविधा देण्यात येतात मात्र कामात कामचोरी करणाऱ्या लोकसेवकाची हकालपट्टी का केली जात नाही? खोपोली वासियांना मूलभूत सुविधा मिळणार तरी कधी? प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संताप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे.







Friday, July 18, 2025

अनधिकृत माती भरावावरची 'इन-कॅमेरा' चौकशी करा


पत्रकार राजेंद्र जाधव यांची मागणी : बार्णे गावाच्या हद्दीतील स. नं. १३/२ व १३/३ जागेतील भरावावर ४९ लाख ३८ हजार ५११ रुपयाची महसूलची नोटीस ? 

कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी भरमसाठ उत्खनन व भराव राजरोसपणे करण्यात येत आहे. भू - माफियांकडून या उत्खनन व भरावासाठी नाममात्र रॉयल्टी भरून महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर सर्रासपणे डल्ला मारला जात आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, निवासी नायब तहसीलदार (RNT), तहसिलदार भू माफियांनी केलेल्या उत्खनन व भरावाची चौकशी करण्यासाठी कानाडोळा करीत तक्रारदारास फिरवाफिरवी करीत उडवाउडवीची उत्तरे देत पंचनामे करण्यास व केलेल्या पंचनामे यांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. 


तक्रारदार पत्रकार राजेंद्र जाधव यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीची दखल घेऊन कर्जत तालुक्यातील बार्णे गावाच्या हद्दीत मागील काही महिन्याआधी सर्व्हे नं. १३/२ व १३/३ जागेत झालेल्या अनधिकृत भरावाची लेखी माहिती देण्यात आली. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी १०६६ ब्रासचा पंचनामा केला व त्यानुसार ४९ लाख ३८ हजार ५११ रुपयाची दंडात्मक नोटीस सुनील गोविंद कटारिया यांना १० जुलै २०२५ बजाविण्यात आली आहे. उपरोक्त दंडाची रक्कम कसूरदार सुनील गोविंद कटारिया यांनी सदरचे आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आता शासनास जमा करावी, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कटारिया यांनी उक्त नमूद दंडनीय रक्कम ७ दिवसांच्या आत शासन जमा नाही केल्यास ग्राम महसूल अधिकारी गौरकामत यांनी सदरील रकमेच्या बोजाची नोंद उक्त नमूद जमीन मिळकतीच्या गा. न. नं. ७/१२ च्या इतर अधिकारात घेऊन तसा गा. न. नं. ७/१२ उतारा व फेरफार या कार्यालयास सादर करण्यात यावा असे देखील नोटीसमध्ये कर्जत तहसीलदार यांनी म्हटले आहे.


कर्जत व खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असेच अवैध अनधिकृत उत्खनन, मुरूम व मातीचे भराव करण्यात आले आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्य्क यांना सुरु असलेल्या उत्खननाची  गोपनीय माहिती दिल्यास गोपनीय माहिती देणाऱ्यांचे नाव, नंबरसह भू-माफियाना देऊन गोपनीय माहिती देणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केला जात आहे, असेही पत्रकार राजेंद्र जाधव यांनी सांगितले. भू-माफियांनी सोडलेले दलाल परिसरात प्रसाद वाटप करीत दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. भू माफियाकडून प्रकरण मिटवण्यासाठी एका भुरट्याला दहा व चाळीसचा आशिर्वाद देऊन प्रसाद देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच या भुरट्याला मौजमजा करण्यासाठी शेजारील राज्यात फिरण्यासाठी पाठविण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे सत्याचे पाठ शिकवणारा भुरटा भ्रष्टाचाराच्या गंगेत बडबडला असून ज्ञान वाटत फिरत असल्याची चर्चा जोमाने सुरु आहे. 


नाममात्र रॉयल्टी भरून शासनाच्या कोटृयवधी रुपयांच्या महसूलावर डल्ला मारणाऱ्या भू-माफियांची माहिती देऊन महसूल विभागाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर करून देणारा गोपनीय देशभक्त गुन्हेगार आहे का ? गोपनीय माहिती देणाऱ्यांचे नाव, नंबर भू-माफियांना देणारे तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक यांची सखोल चौकशी करून भू-माफियांनी केलेल्या अधिकृत उत्खनन व भरावाचे पंचनामे तपासून पुन्हा नवाने 'इन कॅमेरा' पंचनामे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे व कामात कसूर करणाऱ्या लोकसेवकांवर कार्यवाही करून त्यांना निलंबित करावे. अनधिकृत उत्खनन व भरावाची तक्रार कर्जत-खालापूर तहसील कार्यालयात दिल्यावर तक्रारदाराला माहिती देण्यास विलंब का केला जातो ? या लोकसेवकांना शासनाकडून मोठा पगार, शासनाचे सर्व लाभ मिळत नाहीत का ? दुपारी जेवणाच्या नावाखाली सर्रासपणे दालनात उपस्थित नसतांना लाईट, पंखे तासन्तास सुरु का ठेवले जाते ? महिन्याला येणारे अंदाजे वीज बिल 16 हजार हे कुणाच्या खिश्यातून भरण्यात येते ? उत्खनन व भरावाची तक्रार प्रत्येकवेळी मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनी केल्यावर कर्जत - खालापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार माहिती देणार का ? कर्जत - खालापूर तहसील कार्यालयातून अनधिकृत उत्खनन व भरावाची माहिती सर्वसामान्य जनता जनार्दन व पत्रकारांना देण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ का केली जाते ? वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता जनार्दन व पत्रकारांच्या विनंतीनुसार याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केली आहे. कार्रवाई न झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Thursday, July 17, 2025

ज्योत से ज्योत जलाते चलो... 🪔🪔

अश्वपरीस फाऊंडेशन चा यशस्वी उपक्रम..

खालापुर/सुधीर देशमुख :- अश्वपरीस फाऊंडेशनच्या वतीने "NAB Old Age School, खंडाळा" येथील यशस्वी उपक्रमानंतर, तेथील ज्येष्ठ अंध नागरिकांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या कॉटन बेडशीट्स समाजात गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी वापराव्यात, या उद्देशाने पुढचे पाऊल उचलण्यात आले.*


दिनांक 16 जुलै 2025 रोजी "मनचक्षू फाऊंडेशन, महड" येथे बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग सदस्यांना अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे मा. आरिफ मोहम्मद यांच्या अमूल्य योगदानाने या बेडशीट्स प्रदान करण्यात आल्या.या माध्यमातून फक्त वस्तूंची मदत नव्हे, तर स्वाभिमान, सहभाग आणि आत्मविश्वासाचे बीज पेरले गेले. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे ही मदत गरजूंपर्यंत पोहोचू शकली. मानवतेच्या सबलीकरणासाठी आपण सर्व कृतज्ञ आहोत.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्वपरीस फाऊंडेशन चे संस्थापक -अध्यक्ष इशिका शेलार, पदाधिकारी, मनचक्षू फाऊंडेशन चे पदाधिकारी, नरेश पाटील व अन्य सदस्य उपस्थित होते.




---

Wednesday, July 16, 2025

पाथरज जिल्हा परिषद हद्दीतील मांडावणे ग्रामपंचायत मधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...

 सावेळे जिल्हा परिषद विभागावर शिवसेनेचा भगवा फडकवणार

— आमदार श्री महेंद्र थोरवे



खालापुर/सुधीर देशमुख :- कर्जत तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद विभागाची आढावा बैठक रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मयूरेश मंगल कार्यालय, मार्केवाडी येथे अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्य प्रणालीवर विश्वास ठेवत विभाग प्रमुख नाथा आगज यांच्या मार्गदर्शनाखाली उ.बा.ठा. गटातील मांडावणे ग्रामपंचायतीतील सचिन बाळकृष्ण भोईर (उपसरपंच, विद्यमान सदस्य), शोभा निलेश तुपे (वि. सदस्य), सुगंधा मंगेश भोईर, विजया रघुनाथ भोईर, पुनम जितेंद्र भोईर (मा. उपसरपंच), वनिता विजय लाडके, चेतन तुकाराम रेवाळे (युवासेना पंचायत समिती विभाग प्रमुख), करण पंढरीनाथ खडे, रघुनाथ नारायण भोईर (ज्येष्ठ शिवसैनिक), गजानन खडे (ज्येष्ठ शिवसैनिक), विलास महादू दाभाडे (ज्येष्ठ शिवसैनिक), अतुल जयराम दाभाडे (ज्येष्ठ शिवसैनिक), जितेंद्र दत्तात्रय भोईर (ज्येष्ठ शिवसैनिक), रोहिदास खडे (ज्येष्ठ शिवसैनिक), अनंत शेळके (ज्येष्ठ शिवसैनिक), एकनाथ भोईर (ज्येष्ठ शिवसैनिक), श्रीधर बार्शी (ज्येष्ठ शिवसैनिक), गोपाल महादू मसने (ज्येष्ठ शिवसैनिक), सदानंद दाभाडे (ज्येष्ठ शिवसैनिक), आदिल भोईर, दीपक साळुंखे (शिवसेना उपशाखाप्रमुख), सागर भोईर (युवासेना शाखाप्रमुख), राकेश पठार, मंगेश गायकवाड, संतोष खडे, अमर शिंदे, गणेश भोईर, विजय लाडके, संतोष मसने, संजय लोहट, संजय भोईर, रमेश बोराडे, दिनेश भोईर, समीर भोईर, संचित आगज, तुषार भोईर, संजय शेळके, भावेश भोईर, परेश पठार, ओमकार दाभाडे, प्रतीक दाभाडे, राहुल दाभाडे, रोहन भोईर, समाधान जोशी, प्रकाश धुले, धनंजय शिंदे, हनुमंत भोईर, अंकुश जाधव, काशिनाथ गायकवाड, चंद्रकांत जाधव, श्रीकांत फाले, राजेश कदम, विशाल मसने, गणेश खडे, मधुकर गायकवाड, धीरज भोईर, मयूर भोईर, धीरज येरुनकर, आनंद शेळके, हर्ष खडे, अर्जुन पाटील, सुदीप देसाई, दीपेश देसाई, रोशन ताते आणि तुषार भोईर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.


या ऐतिहासिक सोहळ्यात प्रसंगी बोलताना “शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे. येथे कधीही जुना की नवा असा भेदभाव केला जात नाही. प्रत्येकाला समान संधी, योग्य सन्मान आणि जबाबदारी मिळते. काम करणाऱ्यांचे नेहमी स्वागत आणि सन्मान होतो.”


या बैठकीस संतोष शेठ भोईर (जिल्हा प्रमुख), संभाजी जगताप (जिल्हा संघटक), मनोहर थोरवे (मा. उपसभापती), प्रसाद थोरवे (जिल्हा प्रमुख युवासेना),शिवराम बदे (विधानसभा संघटक), पंकज पाटील (विधानसभा संपर्कप्रमुख), सुदाम पवाळी (तालुका प्रमुख), सुनील रसाळ (तालुका संघटक), भास्कर दिसले (माजी जि.प. सदस्य), रमेश मते (तालुका समन्वयक), हर्षद विचारे (तालुका सहसंपर्क प्रमुख), अभिषेक सुर्वे (शहर प्रमुख कर्जत), मिलिंद वीरले व रामचंद्र मिणमिणे (उपतालुका प्रमुख), संतोष कोलंबे (उपतालुका संघटक), सुरेखा ताई शितोळे (जिल्हा सल्लागार), पूजा ताई थोरवे (माजी जि.प. सदस्य), प्रिया रसाळ (माजी सरपंच), प्रफुल्ल म्हसे, नाथा आगज, संतोष मोहिते, राजा शेळके (विभाग प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच या बैठकीला दिपक भोईर, विलास श्रीखंडे, संजय तांबोळी, एकनाथ भगत, संतोष मुने, दिपक कालन, संजय गंगावणे, राजा गंगावणे, सुदाम भोईर, जितेंद्र दळवी, नथुराम देशमुख, उत्तम तिखंडे, देविदास बागडे तसेच तालुक्यातील विविध विभागांतील शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देह झाला चंदनाचा..




खालापुर/सुधीर देशमुख :-   कै सोमनाथ मुरलीधर मोरे म्हणजेच आमचे मोरे सर. त्यांच्या अकाली जाण्याने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 खालापूर तालुक्यातील वावोशी गाव ही सरांची कर्मभूमी. स्वामी विवेकानंद संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. तसेच तेथे 27 वर्षे काम करून वावशी येथेच ते जानेवारी 2025 मध्ये निवृत्त झाले.

 मला सरांचा सहवास 24 ते 25 वर्षे लाभला. मी वैद्यकीय व्यवसायाकरिता वावोशी भागात असताना सरांची भेट झाली व आमच्या स्वभावाच्या तारा जुळल्या गेल्या. व या जुळलेल्या तारा अखंड राहिल्या. त्यांनी मला वावोशी व छत्तीशी परिसरात वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यास खूप मदत केली, अगदी रुग्णाच्या ग्रह भेटीला जाण्यास पण ते माझ्याबरोबर बॅग घेऊन तयार असत रात्री अपरात्री ते माझ्याबरोबर गृहभेटी करता येत.

 सरांचा स्वभाव अतिशय संयमी मितभाषी व सात्विक होता. त्यांना रागावताना किंवा क्रोधित होताना मी कधीच पाहिले नाही विद्यार्थ्यांवर कार्यकारण ते रागावले असतील तो भाग वेगळा.पंढरी म्हणजेच पंढरपूरचे रहिवाशी असल्याची छाप त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे विद्यार्थ्यांची व गोरगरिबांची सतत मदत करणे त्यांच्या उपयोगी पडणे अडल्या नडलेल्याला मार्ग काढून मदत करणे इतरांचे हित जपणे कोणाच्या हृदयावर जखम होईल असे न वागणे न बोलणे तसेच ते निर्व्यसनी सत्याचे कैवारी सज्जन सदाचरणी व संयमी असे सर्व गुण असणारे होते.

 त्यांचा विद्यार्थी वर्ग आज ठाणे मुंबई व रायगड परिसरात पसरलेला आहे व त्यांना आजी व माजी विद्यार्थी खूप मान त असत. संस्थेच्या इमारतीसाठी त्यांनी गावोगावी जाऊन देणगी उभारली.
 सरांनी गोदरेज कंपनीच्या माध्यमातून संस्थेसाठी एक भव्य वास्तूची उभारणी करण्यात मोठे योगदान दिले. संस्थेचे नाव रहावे वाढावे त्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. तसेच सर आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक साहित्य देऊन फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असत तसेच त्याचा त्यांनी कधीही गवगवा केला नाही किंवा कुठलीही जाहिरात केली नाही ते त्यांचे मोठे काम होते. ते स्वतः गरिबीतून वर आले असल्याने त्यांना गरिबीची जाण होती सर्वांना शिक्षण मिळावे चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची नेहमीच धडपड होती.

 यामध्ये सरांच्या कुटुंबानेही तेवढीच मोलाची साथ दिली. श्रीमती शुभांगी दाभाडे मोरे - दाभाडे या त्याच भागात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सरांना नेहमीच त्यांचा भक्कम आधार व पाठिंबा राहिला त्यांना दोन मुले आहेत मुलीचे शिक्षण एम फॉर्म झाले असून तिचे लग्न झाले आहे.तिला आयटी क्षेत्रातील मुलगा वर म्हणून मिळाला. सरांचे जावई सुविध्य व विनयशील आहेत.
 त्यांचा मुलगा स्वप्निल हा इंजिनियर झालेला असून तो सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे तो स्वभावाने प्रेमळ व सरांप्रमाणेच सज्जन आहे.
 आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लोक दक्षिणा म्हणून चंद्रभागेमध्ये जे नाणी फेकत त्या ठिकाणी बुडी मारून तेथील वाळू वर आणून व चाळणीने ती वाळू चाळली जाई. त्या चाळण्यातून जी नाणी मिळत ती नाणी व तो पैसा सरांच्या घरी बऱ्याच वेळा चरितार्थासाठी वापरावा लागत असे. एवढी तीव्र गरिबी त्यांनी अनुभवली होती याचे वर्णन बऱ्याचदा त्यांनी मला सांगितल्याचे स्मरते.
 मोरे सरांनी कायम संघर्ष टाळला व दुसऱ्यांच्या मधील असलेला संघर्ष कमी करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिलेले मी पाहिले आहेत.

 सरांचा मित्रपरिवार खूप मोठा होता एक सज्जन सच्चा सरदही मित्र म्हणून सर्वांना त्यांचे कौतुक व आदरभाव असे खोपोलीमध्ये असताना ते सकाळ संध्याकाळ कायम वॉकिंग करता जात असत तेथे श्री गोरे सर, श्री चव्हाण सर, श्री केवले सर, श्री दिवटे सर, श्री वडगावे सर श्री विजय चव्हाण अशोक दरेकर व स्वतः मी पण उपस्थित असे. असा आमचा एक आगळा वेगळा वॉकिंग ग्रुप तयार झाला होता.

   त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे आमच्या या वॉकिंग ग्रुप वर शोक कळा पसरली एक सज्जन सहृदय साथीदार आपल्यापासून दुरावल्याचे दुःख खरोखर खूप मोठे आहे. श्री. आर. एस. पाटील श्री विजयजी पाटील व इतर अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ तालुक्यातील व्यक्ती त्यांच्याशी खूप जवळ होत्या त्यांचे व या व्यक्तींचे खूप स्नेहपूर्वक संबंध होते.

 सरांच्या निवृत्तीच्या वेळचा कार्यक्रम अतिशय सुंदर व अविस्मरणीय असा होता. हा सोहळा त्यांच्या मधल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा असा व डोळे पाणवणारा असा होता.
 एक हाडाचा शिक्षक कसा असावा याचे उत्तम  उदाहरण म्हणजेच आमचे मोरे सर तसेच एक आदर्श माणूस व नागरिक कसा असावा याचे ते उत्तम उदाहरण व आमच्यासाठी ते आदर्श म्हणून राहतील.
 केवळ चार ते पाच दिवसाच्या कालावधीत बघता बघता काही कळायच्या आत अल्प आजाराने काळाने त्यांना आमच्यातून नेले.
   
           म्हणतात  जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला...
 अशा या ज्येष्ठ बंधू व मित्रवर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.


 डॉक्टर सुनील देवडीकर खोपोली.

Tuesday, July 15, 2025

सत्यज्योत सोसायटी पनवेल येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन....

 


खालापुर/ सुधीर देशमुख : दिनांक 13 रविवार रोजी आदई नवीन पनवेल येथे सत्यज्योत सोसायटी चे पदाधिकारी मा विनायक दादा डवंग आणि सहकारी यांनी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले मायबाप जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले अल्प दरात चष्मा वाटप आणि मोतीबिंदू डोळ्यांचा पडदा (रेटीना) काच बिंदू आणि नेत्र दान या विषयीचे अनन्य साधारण महत्त्व जन जागृती अभियान राबविण्यात आले. 


संस्थेचे प्रतिनीधी मारुती गाडगे आणि डॉ मृण्मयी वैद्य, प्रसन्नजीत सर, जयप्रकाश तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय देवराम दादा हाडवळे, सखाराम शेठ गुंजाळ त्यांचे सहकार्थ लाभले.



मैत्री - बै‌‌त्री काही नाही,राजकीय विरोधक होतो - आहे आणि यापुढेही राहणार सुधाकर घारे यांची आमदार महेंद्र थोरवें वर कर्जत मध्ये आढावा बैठकीत टीकास्त्र.

 


 खालापूर/सुधिर देशमुख: - कर्जतमध्ये दर शुक्रवारी तालुक्यातील आदिवासी बांधव व गोरगरिब जनता आपल्या व्यथा व कामे घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांना भेटायला येतात.सामान्य माणसांच्या अडीअडचणी व सुखदुःखात सहभागी होणारा नेता कर्जत तालुक्यातील जनतेचा जो मतदानाचा कौल आहे तो जनतेनं त्यांना आमदार म्हणूनच मानला आहे.विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा मी मान्य केला आहे पण आमदार महेंद्र थोरवे यांना विजय पचवता येत नाही." खोट पण रेटून " बोलण्याची आमदार महेंद्र थोरवे यांची पद्धत असल्याने त्यांनी मला कधीच कुठल्याच भांडणात मदत केली नसून ते माझे कधीच मित्र नव्हते,मैत्री काही नाही, राजकीय विरोधक होतो आहे आणि यापुढेही राजकारणात कायमचा प्रतिस्पर्धी सुधाकर घारेच असेल.अशा शब्दात कर्जतच्या रॉयल गार्डनच्या भव्य आढावा बैठकीत आपले मत ठणकावून सांगितले.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन,नविन पद निवड,अनेकांचा पक्ष प्रवेश व निवडणुका संदर्भात विचार मंथन यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.पावसाचा भरपूर प्रमाण व भात लागवडीचे दिवस असताना सुद्धा प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.


यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले जुन्या कार्यकर्त्यांनी चांगल काम करत असल्याने आपल्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणूकित विजय मिळवण्यासाठी एक जुटीने काम करावा,आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावे विरोधकांना समज देताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले 2012 पासून तुम्हाला आम्ही घरीच बसवले आहे आणि भविष्यात कायमचा घरी बसवणार आमदार महेंद्र थोरवे यांच्या वर सडकून टीका करताना त्यांना सांगितले की त्यांनी त्यांची घरगुती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद करावी.


 यावेळी व्यासपीठावर या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते तथा विधान सभा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे,जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव,जिल्हा सरचिटणीस एकनाथ दादा धुळे,कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर,माजी सभापती नारायण डामसे,युवा विधान सभा अध्यक्ष कुमार दिसले,नवनिर्वाचित कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे,अशोक सावंत,सचिन कर्णिक,महिला विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर, कर्जत तालुका अध्यक्ष ॲड.रंजना धुळे, अजय सावंत,मधुकर घारे,उमेश गायकवाड,स्वप्नील पालकर,युवानेते केतन बेलोसे,सोमनाथ पालकर,सोमनाथ ठोंबरे, सुवर्णा निलंदे, मनिषा ठोंबरे,रवी झांजे,जिल्हा उपाध्यक्ष हिंदोळा विधानसभा संघटक धोंडू राणे,युवा अध्यक्ष योगेश देशमुख,कल्पेश डुकरे, नैनेश दिघे,सुहास वांजळे,महेश म्हसे,कविता शिंगवा,आदिवासी महिला तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा भोंगळ कारभार..

 वयाल ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे भर पावसात हाल...


खालापुर / प्रतिनिधी :- वाघेश्वरी लोधीवली ते वयाल कडे जाणाऱ्या रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीचे जलवाहिनीचे भर पावसात काम सुरू केले . हा रस्ता नक्की कोणाचा प्रश्न लोधीवली व वयात ग्रामस्थ यांना पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीला नोटीस दिली तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीने सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला नोटीस दिली आहे.आमदार महेश बालदी यांच्या फंडातून ह्या रस्त्यासाठी 4 कोटी निधी मंजूर असून रस्ता कोणाच्या मालकीचा म्हणून ठेकेदार यांना काम करता येत नाही. 


आज वाघेश्वरी ढाबा येथे याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता दुरुस्त करावा ही मागणी केली.चौक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्या मध्यस्थीने बैठक पार पडली.ही बैठक जरी शांततेत पार पडली असली तरी रस्ता मात्र कोणाच्या मालकीचा हा प्रश्न यावेळी अनुत्तरित राहिला असून याबाबत चौक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी खालापूर तहसीलदार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन लवकर करण्याचे सांनितले आहे.तर हा रस्ता दोन दिवसात दुरुस्त करून देऊ असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीचे ठेकेदार यांनी सांगितले.


यावेळी रमेश गायकवाड सरपंच टेंबरी, नितीन तवळे, ग्रामसेवक गोकुळदास राठोड, प्रशांत राखाडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सतीश गायकवाड अभियंता, आर टी वायदंडे उप विभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ,मनोज मोहोळ प्रोजेक्ट मॅनेजर,प्रवीण जांभळे, निखिल पाटील, रोशन गायकवाड, रुपेश पवार, देवा पवार, योगेश फाटे, दिलीप ठोंबरे, विलास म्हात्रे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी घोषणा बाजी देत खालापुर तहसील कार्यालय समोर भीमशक्तीचे ठिय्या आंदोलन !

 

ठिय्या आंदोलन स्थगित पण लढा सुरू ठेवणार .... गोपाळ यशवंतराव तंतरपाळे .



खालापुर/प्रतिनिधी :- कुंभिवली येथील मौजे वीरगाव व मौजे चिंचवली खोपोली येथील शेतकऱ्यांची फसवणूक ज्ञानेश्वर गायकवाड व सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप भीमशकी संघटनेने केला आहे.या विरोधात सोमवार दिनांक 14 जुलै रोजी खालापूर तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी दिला आहे.रात्री उशिराने खालापूर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने भीमशक्तीचे ठिय्या सध्या तरी आंदोलन स्थगित केले असून पुढील लढा सुरू राहील असे आंदोलन कर्त्यानी सांगितले व हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी जोरदार घोषणा बाजी आंदोलन कर्त्यानी केली.


तसेच याबाबत ज्ञानेश्वर गायकवाड यांनी खुलासा देताना सांगितले की भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस गोपाल तंतरपाळे हे गोरगरीबांना ज्ञाय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करतात. परंतू त्यांनी या प्रकरणाची कागदपत्रे तपासून माझ्या विरोधात आरोप करायला हवे होते अशी भूमिका मांडली आहे. माझ्यावरील आरोप सूडभावनेने केले आहेत याबाबत मी अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे असे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी खुलासा करताना सांगितले आहे...