Friday, July 25, 2025

युवा उद्योजिका सागरिका जांभळे विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित...

 उल्लेखनीय सामाजिक कार्य व जागतिक विक्रम स्थापित करण्यासाठी सज्ज.


चौक/प्रतिनिधी :- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभाग यांच्या 2025-27 पदग्रहण समारंभात गुरुवार दिनांक 24ऑगस्ट 2025 रोजी मँगो वर्ल्ड रिसॉर्ट,आसरे गाव,चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल तसेच इतिहास घडविणारा रायगड जिल्ह्यातील पहिल्या व्यावसायिक मेगा एक्स्पो आयोजनाबद्दल प्रमुख पाहुणे के.आर.ओकार,ऍड.मिलिंद धडपले,शास्त्रज्ञ् धर्मराज पाटील,उद्योजक आशपाक लोगडे यांच्या हस्ते व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंटचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष गौरव पुरस्काराने कु.सागरीका जांभळे हिला सन्मानित करण्यात आले.

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभागाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले रायगड जिल्हाध्यक्ष किशोर शेळके व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या हस्ते सुलभा शरद पाटील,डी. एस गुरव, असलम लोगडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सागरीका योगिता शेखर जांभळे या लिओ क्लब ऑफ खारघरच्या अध्यक्षा असून सहज सेवा फाउंडेशनच्या युवा अध्यक्ष तसेच रायगड बिजनेस असोसिएशनच्या संचालिका आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 पासून सुरु असलेल्या कन्या रत्न सन्मान कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून समाजाप्रती हे आदर्श काम 1 एप्रिल 2025 रोजी अपघात होऊन उपचार सुरु असताना देखील सुरु केलेला कन्यारत्न सन्मान आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरु असून हा सातत्यपूर्ण उपक्रम समाजाला वेगळी दिशा दाखवणारा ठरत आहे. समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

लहानपणापासून रेस्क्यू कार्यात सुध्दा कार्यरत असून समाजाप्रती केलेले उल्लेखनीय कार्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कॉलेज जीवनातच शिकत असतानाच सामाजिक कार्य सांभाळताना वयाच्या अगदी 18 व्या वर्षांपासून व्यवसायात देखील पदार्पण केले असून रायगड बिझनेस एक्स्पो 2025 या प्रेरणादायी उपक्रमाची संकल्पना आणि विशेषतः १९ वर्षांच्या तरुणीने अपघातानंतरही घेतलेली ही जबाबदारी निश्चितच महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक नवा आत्मविश्वास आणि दिशा देणारी आहे.

उद्योग, पर्यटन, महिला सक्षमीकरण व युवकांचे नेतृत्व यांचा संगम असलेले हे प्रदर्शन रायगडच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट भालेराव तर आभार प्रदर्शन अक्षदा म्हात्रे यांनी केले.यावेळी रायगड बिझनेस एक्स्पो 2025 बद्दल आश्पाक लोगडे व दिनेश राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशी आशा असलेल्या दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2025 रोजी खोपोली येथे पार पडत असलेला रायगड बिजनेस एक्स्पो 2025 अभिनव उपक्रम हा नक्कीच अभिमानाची बाब आहे.

आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी मिळणाऱ्या अलौकिक प्रेरणेस व गरुडभरारीचा गौरव करताना आनंद वाटत असल्याची भावना यावेळी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनजमेंट, रायगड विभाग अध्यक्ष किशोर शेळके यांनी व्यक्त केली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home