मैत्री - बैत्री काही नाही,राजकीय विरोधक होतो - आहे आणि यापुढेही राहणार सुधाकर घारे यांची आमदार महेंद्र थोरवें वर कर्जत मध्ये आढावा बैठकीत टीकास्त्र.
खालापूर/सुधिर देशमुख: - कर्जतमध्ये दर शुक्रवारी तालुक्यातील आदिवासी बांधव व गोरगरिब जनता आपल्या व्यथा व कामे घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांना भेटायला येतात.सामान्य माणसांच्या अडीअडचणी व सुखदुःखात सहभागी होणारा नेता कर्जत तालुक्यातील जनतेचा जो मतदानाचा कौल आहे तो जनतेनं त्यांना आमदार म्हणूनच मानला आहे.विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा मी मान्य केला आहे पण आमदार महेंद्र थोरवे यांना विजय पचवता येत नाही." खोट पण रेटून " बोलण्याची आमदार महेंद्र थोरवे यांची पद्धत असल्याने त्यांनी मला कधीच कुठल्याच भांडणात मदत केली नसून ते माझे कधीच मित्र नव्हते,मैत्री काही नाही, राजकीय विरोधक होतो आहे आणि यापुढेही राजकारणात कायमचा प्रतिस्पर्धी सुधाकर घारेच असेल.अशा शब्दात कर्जतच्या रॉयल गार्डनच्या भव्य आढावा बैठकीत आपले मत ठणकावून सांगितले.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन,नविन पद निवड,अनेकांचा पक्ष प्रवेश व निवडणुका संदर्भात विचार मंथन यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.पावसाचा भरपूर प्रमाण व भात लागवडीचे दिवस असताना सुद्धा प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले जुन्या कार्यकर्त्यांनी चांगल काम करत असल्याने आपल्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणूकित विजय मिळवण्यासाठी एक जुटीने काम करावा,आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावे विरोधकांना समज देताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले 2012 पासून तुम्हाला आम्ही घरीच बसवले आहे आणि भविष्यात कायमचा घरी बसवणार आमदार महेंद्र थोरवे यांच्या वर सडकून टीका करताना त्यांना सांगितले की त्यांनी त्यांची घरगुती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद करावी.
यावेळी व्यासपीठावर या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते तथा विधान सभा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे,जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव,जिल्हा सरचिटणीस एकनाथ दादा धुळे,कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर,माजी सभापती नारायण डामसे,युवा विधान सभा अध्यक्ष कुमार दिसले,नवनिर्वाचित कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे,अशोक सावंत,सचिन कर्णिक,महिला विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर, कर्जत तालुका अध्यक्ष ॲड.रंजना धुळे, अजय सावंत,मधुकर घारे,उमेश गायकवाड,स्वप्नील पालकर,युवानेते केतन बेलोसे,सोमनाथ पालकर,सोमनाथ ठोंबरे, सुवर्णा निलंदे, मनिषा ठोंबरे,रवी झांजे,जिल्हा उपाध्यक्ष हिंदोळा विधानसभा संघटक धोंडू राणे,युवा अध्यक्ष योगेश देशमुख,कल्पेश डुकरे, नैनेश दिघे,सुहास वांजळे,महेश म्हसे,कविता शिंगवा,आदिवासी महिला तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home