Friday, July 25, 2025

खोपोलीतील ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांना पत्नी शोक

 


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सागर खोपोली कार्यालय प्रमुख जयवंत माडपे यांच्या पत्नी श्रीमती वंदना जयवंत माडपे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर लौजी अंत्यसंस्कार येथे करण्यात आले.

             वंदना माडपे या मूळच्या लौजी गावातील असून विवाहानंतर काही काळ मुंबईत वास्तव्य केल्यानंतर त्या पुन्हा लौजी येथे स्थायिक झाल्या होत्या.अत्यंत साधी, कष्टाळू आणि जिद्दी स्वभावाच्या वंदना माडपे यांनी घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचे शिक्षण याचा समतोल साधत त्यांनी कुटुंब उभे केले.

         त्यांच्या पश्चात पती जयवंत माडपे, मुलगी निशा, मोठा मुलगा विनायक माडपे, छोटा मुलगा प्रसाद माडपे, तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांना अनेक नातेवाईक, मित्रमंडळी आणि पत्रकारितेतील सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने एक सर्वसामान्य पण जिद्दी महिला व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home