महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा भोंगळ कारभार..
वयाल ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे भर पावसात हाल...
खालापुर / प्रतिनिधी :- वाघेश्वरी लोधीवली ते वयाल कडे जाणाऱ्या रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीचे जलवाहिनीचे भर पावसात काम सुरू केले . हा रस्ता नक्की कोणाचा प्रश्न लोधीवली व वयात ग्रामस्थ यांना पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीला नोटीस दिली तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीने सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला नोटीस दिली आहे.आमदार महेश बालदी यांच्या फंडातून ह्या रस्त्यासाठी 4 कोटी निधी मंजूर असून रस्ता कोणाच्या मालकीचा म्हणून ठेकेदार यांना काम करता येत नाही.
आज वाघेश्वरी ढाबा येथे याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता दुरुस्त करावा ही मागणी केली.चौक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्या मध्यस्थीने बैठक पार पडली.ही बैठक जरी शांततेत पार पडली असली तरी रस्ता मात्र कोणाच्या मालकीचा हा प्रश्न यावेळी अनुत्तरित राहिला असून याबाबत चौक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी खालापूर तहसीलदार यांच्यासोबत बैठकीचे आयोजन लवकर करण्याचे सांनितले आहे.तर हा रस्ता दोन दिवसात दुरुस्त करून देऊ असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीचे ठेकेदार यांनी सांगितले.
यावेळी रमेश गायकवाड सरपंच टेंबरी, नितीन तवळे, ग्रामसेवक गोकुळदास राठोड, प्रशांत राखाडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सतीश गायकवाड अभियंता, आर टी वायदंडे उप विभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ,मनोज मोहोळ प्रोजेक्ट मॅनेजर,प्रवीण जांभळे, निखिल पाटील, रोशन गायकवाड, रुपेश पवार, देवा पवार, योगेश फाटे, दिलीप ठोंबरे, विलास म्हात्रे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home