Sunday, July 20, 2025

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?



* लाईट, पाणी,गटार, रस्तासारख्या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित ?

* यशवंतनगरसह अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था ?

* संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या भावना, नगरपालिकेचे दुर्लक्ष..

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत येथील स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नगरपालिकेवर खराब रस्ता,गटार, लाईट, पाणीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यशवंत नगर मध्ये काही वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु त्या रस्त्याची यावर्षी अत्यंत दुर्दशा झालेली दिसत आहे. नागरिकांना या रस्त्यावर चालणे सुद्धा शक्य नाही रस्त्यावर चालतांना मुले कोसळतात लाईट,गटार,पाणी, अशा मूलभूत सुविधा पासून नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याचे संताप नागरिकांनी सांगत अशी अस्वस्था झाल्याचे चित्र दाखवत पत्रकारांना माहिती देताना सांगितले.यावर स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. खोपोली नगर परिषदेने यावर तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना सोयीस्कर रस्ता व अन्य सुविधा करून द्यावा अशी मागणी करीत येथील नागरिकांनी भावना व्यक्त करत रस्ता झाला नाही तर आंदोनक करू असा ईशारा देण्यात आला आहे..


खोपोली शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारसाठी चांगले टिकाव रस्ते खोदण्यात आले पावसाला सुरुवात होण्या आधी रस्ते नवीन होतील अशी आशा नागरिकांनी लावली होती.मात्र पावसाला सुरवात होताच रस्त्यांवर खड्डेच खड्ड्याचे चित्र दिसून येत आहेत. नक्की खोपोली शहरात विकास कुठे व कोणाचा होतो? प्रशासनाच्या डोळ्यादेखत ठेकेदार सुरक्षाचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम करतात तरी त्यांचे बिल कामे होण्या आधी अदा कसे केली जातात?बिल्डिंग होण्या आधी oc देण्यात येतात? 1 वर्षावरील जन्म मृत्यू दाखल्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली असतांना दाखले कोणाच्या आशीर्वादाने दिले गेले आहेत? शहरात नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा पासून नागरिकांना वंचित ठेऊन आंदोलन उपोषणाची वेळ निर्माण केली जात आहे? वरिष्ठ अधिकारी अशा बेर जबाबदार अधिकाऱ्यांची त्वरित बदली का करीत नाही? जनता जनार्दनांच्या सेवेसाठी व शहरातील जबाबदारी ने विकास कामे होण्यासाठी लोकसेवकांना शासना कडून सर्व सोयी सुविधा देण्यात येतात मात्र कामात कामचोरी करणाऱ्या लोकसेवकाची हकालपट्टी का केली जात नाही? खोपोली वासियांना मूलभूत सुविधा मिळणार तरी कधी? प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संताप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे.







0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home