मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांस ग्रामसमृद्धी पुरस्कारांने सन्मानित
खालापुर /दिपक जगताप: - ग्रुप ग्रामपंचायत माजगाव मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या कारकिर्दित झालेल्या विकास कामाची दखल घेत त्यांस नालंदा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी पुरस्कार विद्याशिक्षण क्रांतीचा केंद्र्बिंदू असलेला एस.एम.जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे उपस्थित मान्यवर तथा नालंदा ऑर्गनायजेशनचे सर्वेसर्वा श्रीकांत जायभाय, यांच्या हस्ते सन्मापत्र,सन्मानचिन्ह देवून गौरविण्यांत आले.
मा.सरपंच यांनी २०१९ ते २०२२ या वर्षा मध्ये विविध विकास कामे करुन जनतेच्या मनामध्ये आपले घर निर्माण केले.ग्राम विकासाचे वचन दिले.आणि स्थानिक समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट विचारांची देवाणघेवाण केली. गावात असलेल्या समस्या विचारात घेत त्या मार्गी लावण्यांचे काम केले.विशेष म्हणजे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यांचे काम त्यांच्या कारकिर्दित पुर्ण केले.सरपंच पद हे राजकीय असले तरी सुद्धा या मध्ये समाजकारण करुन जनसामन्याचे प्रश्न मार्गी लावण्यांचे काम त्यांनी केले.यामुळे त्यांची दखल या संस्थेनी घेऊन त्यांस सन्मानित केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कृषी सहसंचालक - श्रीपाद खळीकर,अभिनेता, लेखक, दिग्दर्शक - विनोद वणवे,त्याच बरोबर पनवेल ग्रामसेवक निवृती आंधळे,जनार्धन जाधव,जगदिश पिंगळे,अरुण जाधव,आत्माराम जाधव यावेळी पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरास्कार हा गावाचा सन्मान असून अनेकांनी त्यांच्या निवास स्थानी जावून शुभेच्छा दिल्या.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home