खोपोली शिळफाटा येथे भर पावसात पोखरलेल्या डोंगराला व विद्युत खांबाला गोणीचा आसरा?
मोठी दुर्घटना झाल्यावर तहसीलदारांना जाग येणार का?
पंचनामा करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारीने काय पाहून परवानगी मिळण्यासाठी पंचनामा केला? पत्रकार राजेंद्र जाधवचा सवाल..
खोपोली/(प्रतिनिधी):- कर्जत - खालापूर तालुक्यात अवैध उत्खनन भराव मोठ्या प्रमाणात होत आहेत. श्रीमंत व्यावसायिकांनी एकरी -एकरी जमिनी खरीदी केलेल्या असून त्या जमिनीना सपाट मैदान करण्यासाठी व मोठमोठे बिल्डिंगचे टॉवर, शेड, पंप बांधण्यासाठी दगड, मरूम मातीचा भराव टाकण्यात सुरुवात केले असल्याचे चित्र तालुक्यातील गांवा - गांवात, शहरात दिसून येत आहे. एकरीभर जमिनीत भराव करण्यासाठी तालुक्यात दगड, मुरूम,मातीला मोठी मागणी आहे. मात्र दगड,मरूम, माती,उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची रीतसर, परवानगी घेऊन रॉयटी भरावी लागते आणि नियमा नुसार उत्खनन करण्याचे सांगण्यात येते. एक ब्रास रॉयटीचे अंदाजे ६०० रुपये व शंभर ब्रास रॉयल्टी भरण्या साठी अंदाजे साठ ते सत्तर हाजार रुपये शासनाला भरावे लागतात.चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. पण हे नियम खालापूर तालुक्यात लागू नाहीत का ? असा प्रश्न झालेले उत्खनन पाहिल्यावर उपस्थित होत आहे.
खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथील हॉटेल ऋषीवन समोरील भरपावसात डोंगर पोखरण्यात आला.शफि मोहम्मद पठाण ह्या नावाने शंभर ब्रासची रॉयटी भरून भळा मोठा डोंगर पोखरून अनाधिकृत अवैध उत्खनन करण्यात आला.खोपोली मंडळ अधिकारी यांनी झालेल्या गौणखनीज उत्खननचा मोज माप घेऊन २९७ ब्रास मधून १००ब्रास वजा करून १९७ ब्रासचा पंचनामा करून ९लाख १२हाजार ६५२ रुपयांचा दंडाचा नोटीस दि. १६जून २०२५ रोजी संबंधित जमीन मालकाला बजावण्यात आला.या डोंगरावर उच्च दाबाचे अनेक विद्युत खांब व मोबाईलचा टावर आहे.या खांबाच्या बाजूचे मुरूम काढल्याने हे खांब पडण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.खालून डोंगराची हाजारो ब्रास मुरूम माती काढण्याने धो-धो बरसणाऱ्या पावसाने वरची माती सरकण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. ही माती खाली येऊ नये विजेचे खांब पडू नय यासाठी खांबला गोळ भरलेल्या गोणी व डोंगराच्या एका बाजूला गोणीचा थर लावण्यात आला आहे. त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला असणारे विद्युत खांबाळा व डोंगरला भरलेल्या गोणीचा आसरा मिळाला आहे.पण इतर ठिकाण्यातल्या भागाची माती उरतून खाली येण्यात सुरवात झाली आहे. ज्या ठिकाणी गौणखनीज उत्खनन होण्या आधी तलाठी,मंडळ अधिकारी जागेवर जाऊन जेगेची पाहणी करून पंचनामा करतात मात्र पंचनामा करतांना तलाठी, मंडल अधिकारी यांना जागेत व जागे लेगत गांव, वस्ती, दुकानें, घर, रस्ता,असणारे मोबाईल टॉवर , हाय टेन्शनचे टॉवर, विद्युत खांब दिसतच नाहीत का? डोळ्यावर पट्टी बांधून पंचनामे केले जातात का? ह्या डोंगराच्या सुरवाती पासून अंदाजे तीनशे ते चारशे मीटर लांब व चालीस ते पन्नास फूट उंच पर्येंत अंदाजे दोन ते तीन महिनेभरा पासून उत्खनन होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home