सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांच्या सौजन्याने करंबेळी ठाकूर वाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप ....
खालापुर / दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका यांच्या वतीने आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये खालापूर मंडळाकडून किरखिंडी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते भरत महाडिक यांनी सामजिक बांधिलकी जपत करंबेळी ठाकूर वाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप केले. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना भरत महाडिक यांच्या माध्यमातून रेनकोट, वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भरत महाडिक यांच्या माध्यमातून करंबेळी विभागात असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी रविंद्र मोरे नितेश पाटील, आर के बाबले, प्रतिभा पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home