Sunday, July 27, 2025

सहज सेवा फाऊंडेशन द्वारा महिलांसाठी अनोखे श्रावणी हळदी कुंकू व पातळगंगा नदीपूजन व आरती उत्साहात साजरी..

 


खोपोली विभागात प्रथमच दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा एकत्रित वाढदिवस साजरा तसेच लकी ड्रॉ द्वारे विजेत्या महिलेस पैठणी साडी बक्षीस..


खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली हद्दीतून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जन जागृती म्हणुन सहज सेवा फाउंडेशन द्वारा नदी पुजन व आरती साजरी केली जाते. नागरिकांनी या उपक्रमास भरभरून दाद देण्यास सुरुवात केली आहे.


या नदी पूजन व आरती निमित्ताने यावर्षी महिलांसाठी सामूहिक श्रावणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले.गगनगिरी आश्रम,खोपोली येथे शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी आगळावेगळा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच पर्यावरणाचे भान ठेवून महिलांना वाण स्वरूपात प्रत्येकी सीड बॉल व कापडी पिशवी भेट देण्यात आली.

ऑगस्ट 2025 पासून खोपोली नगरपरिषद विभागातील महिलांचा वाढदिवस प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी नदीपूजनाच्या वेळी सामूहिकपणे साजरा करण्यात येणार असून त्यावेळी एक लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे.सदर लकी ड्रॉ काढण्यासाठी ज्या महिलांचा वाढदिवस आहे,त्यांनी अथवा त्यांच्या परिचयातील व्यक्तीने वाढदिवसाची माहिती असलेला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे, अशा नवीन महिला उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

या उपक्रमासाठी आनंद शाळा, खोपोली,प. पु. गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली,आर. टी. झवेरी ज्वेलर्स खोपोली,सद्गुरू ग्राफिक्स, खोपोली यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,महिला अध्यक्षा निलम पाटील,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,सह सचिव नम्रता परदेशी,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,सल्लागार नरेंद्र हर्डीकर,प्रकल्प प्रमुख सीमा त्रिपाठी,कल्याणी साखरे,वेदा साखरे,हितेश राठोड सोबत जीनी सॅम्युअल, सुवर्णा मोरे, संदीप दुबे,अंजली शर्मा, संगीता शुक्ला, सुनिता चव्हाण,दमयंती कोळी,मुस्कान सय्यद,निलम समेळ,रंजन चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

सहज सेवा फाउंडेशनच्या महिला विभागाद्वारे वाढदिवस असणाऱ्या महिलांचा लकी ड्रॉ द्वारे नदी किनारी नदी आरती व पुजन हा उपक्रम समाजासाठी वेगळी दिशा देणारा ठरत आहे. महिलांसाठी प्रभावी व प्रेरणादायी उपक्रम राबविणाऱ्या सर्व महिला पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत असे गौरवोद्गार जीनी सॅम्युअल यांनी व्यक्त केले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home