Tuesday, July 22, 2025

Human Rights Protection Federation" भारत सरकार अंतर्गत इशिका शेलार यांची खालापूर तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती

 


 खालापुर / सुधीर देशमुख :- मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या खालापूर तालुका महिला विभागाच्या अध्यक्षपदी इशिका शेलार यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या स्वाक्षरीने, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.


इशिका शेलार यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदान, मानवी हक्कांविषयी असलेली संवेदनशीलता व त्यांचे संघटन कौशल्य या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. फेडरेशनच्या ध्येय-धोरणांना बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.


या निवडीबाबत बोलताना डॉ. तांबोळी म्हणाले, "खालापूर तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मानवी हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. इशिका शेलार यांचे नेतृत्व संस्थेसाठी निश्चितच मोलाचे ठरेल."

ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, यापुढे इशिका शेलार या खालापूर तालुक्यातील महिला विभागाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. फेडरेशनच्या कार्याचा विस्तार आणि लोकजागृतीसाठी त्या सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home