Thursday, July 24, 2025

रायगड भूषण तथा संपादक डॉक्टर रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या पत्रकारांचा व व्यक्तींचा सन्मान !

 


खालापूर /प्रतिनिधी :-रायगड भूषण तथा पत्रकार,संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांचे कल्पक नेतृत्व नेहमीच समाजाला दिशा दर्शक ठरत आहेत.रायगड भूषण तथा संपादक डॉक्टर रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर येथे रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळविलेले पत्रकार फिरोज पिंजारी, पत्रकार खलील सुर्वे, पत्रकार सुधीर गोविंद माने सह पत्रकारांचा तसेच व्यक्तींचा सन्मान करीत डॉ. सुनिल पाटील माजी.नगराध्यक्ष व गट नेते खोपोली नगरपरिषद यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . 


पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानपत्र वाटप करणे, हा एक चांगला उपक्रम आहे. यामुळे पत्रकारांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. पत्रकार समाजासाठी महत्त्वाचे काम करतात. त्यांचे कार्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे, सत्य उघड करण्याचे आणि समाजाला जागरूक करण्याचे असते. त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. सन्मानपत्र देऊन पत्रकारांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा कार्यक्रमांमुळे पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होते. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी छोटे असो की मोठे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. पत्रकारांचे कार्य लोकशाहीसाठी आवश्यक आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा गौरव करणे आहे असे न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश - अध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वार्ताचे संपादक पत्रकार सुधीर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वसामान्य कुटूंबात जन्मल्यानंतर स्वत:च्या व कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी पडेल ते कष्ट उपसताना विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व पत्रकारितेत ही यशस्वी होवून सारी क्षितीजे पार करून नावलौकीक प्राप्त करत कायम समाजासाठी झटत असतात म्हणूनच या कुशल नेतृत्वाला शहर व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिक रायगड भूषण तथा पत्रकार संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांचेकडे पाहत आहेत. आज पर्यंत केलेली समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे परमेश्‍वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्तमात्र असतो. परमेश्‍वराने मला जे काही देत आहे त्यामागे त्याची काही योजना असावी त्यामुळेच माझे तन, मन आणि धन मी माझ्या समाजासाठी वापर करत असतो असे जाधव ते नेहमी म्हणतात.

शाहू ,फुले, आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून.

मनानं दिलदार...

बोलणं दमदार...

वागणं जबाबदार...

कामात खबरदार.. 

पत्रकारिता छानदार...

असं सर्वसमावेशक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व रविंद्र जाधव.

पत्रकारिता धंदा नसून एक धारणा मानून एक सक्षम पत्रकार म्हणूून आपली ओळख सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राची भूमी आपल्या साप्ताहिक मध्ये जोरकसपणे लेखणी चालवली.

समाजिक व्यंगावर, आणि अन्याय-अत्याचावर वाभाडे ओढण्याचे निर्भिडपणे काम.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत झालेले जाधव. आपले अमूल्य विचार ते आपल्या वंचित समाजापर्यंत. वैचारिक प्रबोधन करून जागृती. शैक्षणिक,सामाजिक, वैज्ञानिक उपक्रम राबवतात.

घरातील सामाजिक कार्याचा वसा- वारसा नेटाने चालविण्याचा काम ते आज या साप्ताहिक मधून अविरतपणे करत आहे 

सालाबाद प्रमाणे त्यांच्या वाढदिवशी निमित्ताने ते स्तुत्य- प्रशंसनीय उपक्रम.

      विविध क्षेत्रात कार्यरत असणारा आपला बहुजन समाज. त्यांची दख्खल सहसा घेतली जात नाही. म्हणून त्यांच्या रास्त गुणांना आणि कार्य- कर्तुत्वाचीची नोंद . त्यांना त्यांच्या कामात प्रेरणा- उत्तेजना मिळावी या एकमेव शुध्द हेतुने कार्यक्रमाचे आयोजन करून भरगच्च असा सत्कार सोहळा आयोजित.

तुमची लेखणी पुढेही अशीच तलपती तलवार बनो.

आर्युमान भवः

तुझ्या लेखणीला चिरंतन धार लाभो...|

आणि सत्याच्या रणात तू असाच अग्रस्थानी राहो...|

हिच सदिच्छा...

जय भिम, जय संविधान बोलत बी एन पाटील मुख्याध्यापक शारदा विद्यामंदिर कासू पेण यांनी पत्रकार रवींद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कविता गायली.

यावेळी सुनिल पाटील मा नगराध्यक्ष व गट नेते खोपोली नगरपरिषद,पत्रकार सुधीर गोविंद माने महाराष्ट्र - अध्यक्ष( न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन), पत्रकार खलील सुर्वे, राष्ट्रीय - अध्यक्ष ( न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन) ॲड रमेश जनार्दन पाटील प्रभारी सरपंच गोरठण ग्रामपंचायत,बी एन पाटील मुख्याध्यापक शारदा विद्यामंदिर कासू पेण,ॲड राजदत्त झरकर , ॲड रिया पाटील, अश्विन मेश्राम मॅनेजर बॅक ऑफ इंडिया खालापूर,वर्षा तुषार जाधव मा शहराध्यक्षा खानप., सचिन कडू मुख्याध्यापक,बी सी पाटील मॅनेजर, यशवंत मुसळे मा उपसरपंच उंबरे ग्रामपंचायत, रविंद्र देशमुख सर, ॲड सोनावणे, अनिल जाधव शाखा अभियंता पं स खालापूर ,ममता चौधरी,मा नगरसेविका खानप ,सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग जाधव,अशोक मोरे,बाळू गवळी, पत्रकार विविध क्षेत्रातील कार्यकर्ते गावातील कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home