Thursday, July 31, 2025

अभिजीत दरेकर यांची 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन'च्या रायगड प्रभारीपदी नियुक्ती !

 


 खालापुर/सुधीर देशमुख:- बेधडक वृत्तपत्रविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, अत्यंत परखड आणि बिनधास्त लिखाणासाठी ओळखले जाणारे ‘दैनिक बेधडक महाराष्ट्र’ चे संपादक अभिजीत नारायण दरेकर यांनी आता सामाजिक लढ्याचे एक नवे शिखर गाठले आहे.

त्यांची "मानवी हक्क संरक्षण फेडरेशन"च्या रायगड जिल्हा प्रभारी म्हणून भव्य आणि सन्माननीय नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आली. 

गरीब-शोषित जनतेसाठी लढणारे आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार अशी त्यांची ठसठशीत ओळख आहे.

नियुक्तीप्रसंगी डॉ. मुनीर तांबोळी म्हणाले, “मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी आम्हाला अशाच जागृत व लढवय्या कार्यकर्त्यांची गरज आहे. श्री. अभिजीत दरेकर हे पत्रकारितेतून आणि कार्यातून समाजाचे भले घडवतात. त्यांची ही नेमणूक रायगड जिल्ह्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल.”

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home