Wednesday, July 23, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खालापुरात रक्तदान शिबीर.

 


खालापूर/दिपक जगताप :- दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात.या वर्षी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून लाडक्या देवाभाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या.खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे दृतगती महामार्ग,मुंबई पुणे जुना महामार्ग आणि अलिबाग पुणे महामार्ग असे तीन महत्वाचे महामार्ग जातात.या महामार्गांवर सतत वाहनांची गर्दी असते.अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असते तसेच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असतात त्यासाठीही रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते या रक्ताचा पुरवठा व्हावा आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा व्हावा यादृष्टीकोनातून आ प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या उपस्थितीत खिरकिंडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.बदलापूर येथील रक्तपेढीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अनेक रक्ताच्या बॅग संकलित करण्यात आल्या.या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी हजेरी लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांमध्ये आवडीचे नेते असल्याचे दिसत होते.संपूर्ण राज्यात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशा वेळी हा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्यासाठी राज्यात सर्वीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.खालापूर तालुक्यात आम्ही खिरकिंडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.यातून मिळणारे रक्त संकलित करून अनेक रुग्णांना मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने आजचा जन्मदिन साजरा होणार आहे असे वक्तव्य तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी केले.यावेळी उप जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे,युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील,तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील,रक्तदान शिबीर प्रमुख हरिभाऊ जाधव,खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप,अतुल मालकर,जयेश पाटील,निकेश पाटील यांसह मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home