Wednesday, July 23, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष श्री संतोष बैलमारे यांची जोरदार तयारी

 


खालापूर /सुधिर देशमुख :- विधानसभेच्या निवडणुकी नंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सर्व साधारण सभा खालापूर येथील यू के रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी पुढील होणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पालिका,नगर पंचायत,नगर परिषद,यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे 100% ताकतीने काम करतील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरला तालुक्यात राहील अशी ग्वाही दिली.याप्रसंगी सुधाकर घारे यांनी तालुका प्रमुख संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.संतोष बैलमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बद्दल असलेल्या निष्ठेने खालापूर तालुक्यातील कार्यकर्त्याची एकता मजबूत केली आहे.ह्या सभे प्रसंगी नविन पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र दिले व जुने पदाधिकारी कायम ठेवले आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, जुना व नविन वाद निर्माण न होता पुढे पक्षाचे ध्येय धोरणे कशी साध्य करता येतील ह्या निमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


खालापूर तालुक्यातील कंपनीच्या कामगारांचे प्रश्न हे वेळोवेळी पक्षा मार्फत मध्यस्थीने सोडविण्याचे व कामगारांच्या घरातील चुली कायम चालू राहण्यासाठी व कंपनी पण चालू राहिली पाहिजे व कामगार पण जगला पाहिजे.ह्या तत्वावर माननीय रायगड चे खासदार सुनील तटकरे,माननीय आमदार अदिती ताई तटकरे व कर्जत खालापूरचे जनतेचे सिलेक्टेड ( आमदार ) श्री सुधाकर घारे पक्षासोबत योग्य पावले उचलत आजच्या घडीला बंद पडणाऱ्या कंपन्या चालू करून कामगारांना न्याय मिळून दिला आहे. कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुधाकर घारे हे कधीही कंपनीच्या बरोबर सेट होणार नाही. नको चहा नको पॅकेट पण कामगारांवर अन्याय झाला तर त्या कंपनीच्या गेटवर मी व माझे पदाधिकारी आंदोलन करतील. जगा व जगू द्या या तत्वावर खालापूर मधील कंपनी मॅनेजमेंट व खालापूर इंडस्ट्रीला इशारा दिला आहे.


संतोष बैलमारे यांनी खालापूर मधील अनेक समस्यांपैकी प्रदूषणावर पण त्यांनी आपली तोफ डागली.पाताळ गंगेचे पाणी दूषित होत आहे त्यावर पुढील भविष्यात ठोस निर्णय घेऊन आंदोलन उभे करण्यात येईल.खालापूर तालुक्यात गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय व बुथ मीटिंग,गाव मीटिंग घेऊन योग्य नियोजन करून खालापूर तालुक्यात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढे 21 जुलै ते 31 जुलै 2025 जन विश्वास सप्ताह राबून त्या मार्फत वृक्षा रोपण,आरोग्य शिबिर,महिला सक्षमीकारणातून स्वयं रोजगार,महिला प्रशिक्षण व पावसाळ्यात कार्यकर्त्यांना पक्षाकडून छत्री भेट देऊन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव व घड्याळ हा चिन्ह घराघरात पोहोचवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षश्री सुधाकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष श्रीअशोक भोपतराव,प्रदेश प्रवक्ते, श्रीभरत भगत,जिल्हा सरचिटणीस श्री शरद कदम,महिला जिल्हाध्यक्ष सौ,उमा मुंडे,युवकचे जिल्हाध्यक्ष श्री अंकित साखरे,युवक अध्यक्ष श्री कुमार दिसले,श्री सचिन कर्णुक,खालापुर तालुका कार्याध्यक्ष श्री भूषण पाटील,विधानसभा अध्यक्षा सौ,सुरेखा ताई खेडकर,तालुका अध्यक्ष श्री संतोष बैलमारे, यांच्या सह खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home