रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशी मधे शिक्षण घेतलेला विद्यार्थी खालापुर तालुक्यात प्रथम तर जिल्हात चतुर्थ क्रमांक
खालापुर /सुधीर देशमुख :-रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशी केंद्र वावोशी येथील इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी कुमार आर्य अमर पापळ याने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 84.56 टक्के गुण प्राप्त करून तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हा गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक प्राप्त करत शाळेचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उज्वल केले .डोंगराळ भाग व शहरापासुन लांब अश्या दुर्गम भागात जिल्हा परिषद शाळेतील शीक्षण व शीक्षकानी घेतलेलि मेहनत व विद्यार्थि ची गुणवत्ता ह्या जोरावर स्पर्धा परीक्षेत ह्या मुलाने यश संपादित केले त्याचे सर्व ठिकाणी विभागात अभिनंदन केले जात आहे.
यासोबतच सन 2024 /25 रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत 93.75 टक्के गुण पटकावून जवाहर नवोदय विद्यालय निजामपुर रायगड येथे प्रवेश मिळवला.
2024 /25 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत खालापूर सेंटर मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत 98 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आणि गणित प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावर रौप्य पदक प्राप्त केले .
सन2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेत देखील पास होऊन प्रवेश प्रक्रियेस तो पात्र झाला. एकाच वर्षात या सर्व परीक्षा एकाच वर्षात देऊन सर्व परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादित केले.यासाठी तळाशी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता पांडुरंग आखाडे आणि सहाय्यक शिक्षिका अर्चना बाळासो घाटे यांनी मार्गदर्शन केले आणि विशेष परिश्रम घेतले.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home