वेध विज्ञानाचा
सूर्य उगवला ज्ञानाचा,अंधार आता संपला. शक्ती मिळाली चालायला, वाट लागली दिसायला !! विश्व हे धुक्यात हरवले होते, अंधश्रद्धेने गुरफटले होते, विज्ञानातून सत्य आले प्रत्ययला, आता अंधार अज्ञानाचा संपला !! गुपित कळाया सृष्टीचे, श्वास झाले ध्यास ज्यांचे. दुःख पीडितांचे जाता, सौख्य लाभलेले तयाना. हात मानवाचे आता,आकाशी पोहचलेले. नविन आव्हान पेलायाला,सवय झाली आम्हाला !! =शब्दांकन= प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे (पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ) साकुरी. ता. राहता. जिल्हा.अहिल्या नगर.. संपर्क.9604797316