गाडगेबाबा यांचे जयंती निमित्ताने स्वच्छता गीत
स्वच्छतेचे काम करू
सुंदरतेने परिसर भरू.
गाव स्वच्छ करू हातांनी
गाणी सुंदर गाउ मुखांनी
आमचा आहे सुंदर बाणा
नाही घानीचा ठाव ठिकाणा
स्वच्छतेत जो चुकार
त्याचा सर्वत्र धिक्कार
आवड स्वच्छतेची
निवड सुंदरतेची
स्वच्छ निर्मळ जीवन
सदा सुंदरतेचे वळण
आमचे स्वच्छता काम
मुखी सुंदरता नाम
स्वच्छ परिसर हा ठेऊ
गीत सुंदरतेचे गाऊ
प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
(पोलिस क्राईम न्यूज चीफ ब्यूरो )
साकुरी. ता. रहाता. जिल्हा. अहिल्या नगर.
मो 9604797316

Comments
Post a Comment