डोंगरगण घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली ...

 


 दोन गोण्यात घालून मृतदेह फेकला घाटात


अहिल्यानगर / ज्ञानेश्वर बनसोडे :- राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरा तील डोंगरगण घाटात दोन गोण्यांमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटलीअसून सदरचा मृतदेह हा राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो मृतदेह टाकळीया येथील किरण शिवाजी कवाणे या (वय 32) युवकाचा असल्याचे निदर्शनास आले आहे.या घटनेने राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून मृत्यू मागचे गुढ मात्र गुपितच आहे. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दोन वेगवेगळ्या गोण्यांमध्ये मृतदेह घाटात फेकून दिला असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली.


त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. एमआयडीसी पोलीसानी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासणीत सदरचा मृत् देह हा दोन वेगवेगळ्या गोण्यांमध्ये घालून घाटात फेकून दिला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.त्या मुळे सुरुवातीपासूनच हा घात पात असावा. अशी शक्यता वर्तवली जात होती. मृत व्यक्तीच्या उजव्या हातावर "छत्रपती"असे नाव गोंदलेले असून छातीवर इंग्रजीत "सोनाली" असे नाव गोंधले असल्याची नोंद पोलिसांनी घेतली. पोलिसांना ओळख पटविण्यासाठी या खुणा महत्त्वाच्या ठरल्या. पोलीसानी विविध माध्यमातूनमाहिती गोळा करत तपासाची चक्र फिरविली.


आणि संबंधित तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश मिळवले .आणि त्यानंतर नातेवाईकांना या संदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्या नंतर मंगळवारी मध्यरात्री किरण शिवाजी कवाने याच्यावर टाकळीमिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावावर शोक काळा पसरली असून कवाणें कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किरण कवाणे टाकळीमिया या ठिकाणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होते.


 दरम्यान या संदर्भात पोलिसांनी टाकळीमिया येथील दोन संशयतांना ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण काय किंवा कौटुंबिक वाद किंवा अजून काही इतर माहिती मिळते की काय या संदर्भात पोलीस कसोशीने तपास करत आहेत. या थरारक अशा प्रकारच्या घटनेमुळे संपूर्ण वांबोरी परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि या घटनेचा त्वरित तपास लावावा .अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. व या घटने संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई करावी. अशी नागरिकांची मागणी जोर धरू लागली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी