कुलदीप शेंडे यांनी केली पत्रकारांची नाराजी दुर बैठकीत सकारात्मक निर्णय....

 


खोपोली /मानसी कांबळे :- खोपोली नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नगरप्रशासनाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यायचा अथवा नाही, याबाबतचा निर्णय हा नगराध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात येतो. नुकत्याच पार पडलेल्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या निर्णयाविरोधात खोपोलीतील पत्रकारांनी एकत्र येत भूमिका घेतली.


दि. २५ फेब्रुवारी रोजी खोपोलीतील विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. वैयक्तिक संघटनांना बाजूला ठेवत “खोपोली-खालापूर पत्रकार कृती संघटना” या नावाने संयुक्त व्यासपीठ स्थापन करण्यात आले. या बैठकीत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासमोर कोणते मुद्दे मांडायचे, तसेच पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश नाकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, यावर सखोल चर्चा करण्यात आली.


यानंतर दि. २६ फेब्रुवारी रोजी खोपोली-खालापूरमधील सर्व पत्रकारांनी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. सभेत प्रवेश नाकारण्यामागील नेमके कारण काय, याबाबत नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


दीर्घ चर्चेनंतर तडजोडीचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार, सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या दिवशी सर्व पत्रकारांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावून पार पडलेल्या सभेची सविस्तर माहिती देण्यात येईल आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असे निश्चित करण्यात आले. या निर्णयास उपस्थित सर्व पत्रकारांनी सहमती दर्शवली

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी