शिळफाट्यात शिवजयंती मिरवणूक उत्साहात संपन्न..

 


शिवप्रेमी मित्र मंडळाकडून डीवायएसपी विशाल मेहुल पाटील यांचा सत्कार ; नगरसेविकांची उपस्थिती

खोपोली / मानसी कांबळे :- शिवप्रेमी मित्र मंडळ, शिळफाटा यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची भव्य मिरवणूक यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, शिवरायांच्या शौर्याची झलक दाखवणारे फलक व घोषवाक्ये यामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या यशस्वी नियोजनाबद्दल आणि शांतता राखण्यासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल डीवायएसपी विशाल मेहुल पाटील यांचा शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


या सत्कारप्रसंगी नगरसेविका ॲंड. अनिताताई पवार, नगरसेविका उज्जवलाताई महाडिक नगरसेवक हरीश काळे शिवप्रेमी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवजयंती उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातही अशाच शिस्तबद्ध आणि सामाजिक ऐक्य जपणाऱ्या उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, एकोपा आणि शिस्त यांचे दर्शन घडल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. शिवप्रेमी मित्र मंडळाने केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून, उत्सव शांततेत पार पडल्याने परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी